ब्लॉगला 'Favicon' प्रतिमा जोडण्यासाठी मार्गदर्शन...

» गुरुवार, १७ सप्टेंबर, २००९

काय तुम्ही तुमच्या ऍड्रेसबारवर तुमच्या ब्लॉगच्या/साइटच्या अगोदर ब्लॉगरच्या लोगो ऐवजी तुमचा स्वतःचा लोगो, फोटो लावू इच्छिता, जसे की खालील प्रतिमेत दिसतयं....?
 
ठिक आहे, या अशा लोगोला फ़ेविकॉन (Favicon) लोगो म्हणतात. तो टाकण्यासाठी तुमच्या डॅशबोर्डवरून टेम्प्लेट टॅबवरून एडिट HTML मध्ये जाऊन विजेट टेम्प्लेट एक्स्पाण्ड करून घ्या. त्यानंतर ते टेम्प्लेट डाऊनलोड करून बॅक-अप साठी जतन करून ठेवा. म्हणजे जर तुम्हाला नंतर वाटलं की काहीतरी चुकतयं, तेव्हा ते पुन्हा अपलोड करू शकाल.
बरं आता तुमच्या ब्राऊजरमध्ये 'ctrl+F' ही की दाबून पुढील कोड शोधा:
<title><data:blog.pageTitle/></title>

आता त्याखाली लगेच पुढीलपैकी कोणताही एक कोड टाका:


मराठवाडा मुक्ती-संग्राम दिन

»

आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. भारत स्वतंत्र होऊनदेखील निजाम हैदराबाद रियासत खालसा करण्यास काही तयार नव्हता. तेव्हा त्या हरामखोर निजामाच्या तावडीतून हैदराबाद संस्थान किंवा तेलंगाणा (आताचे मराठवाडा, पण हैदराबाद मात्र आता मराठवाड्यात नसून आंध्रा मध्ये आहे.) सोडविण्यासाठी आमच्या हजारो वीरांनी आपले प्राण ओतून आजच्या १७ सप्टेंबर च्या दिनी मराठवाड्याला निजामाच्या तावडीतून मुक्त करून दिले होते. म्हणून काय आज आम्ही मराठवाड्यातील लोक गुण्या-गोविंदाने बागडत आहोत. त्या वीरांचे आम्हावर ते कधीही न फिटणारे ऋण आहे.
त्या वीरांना शतशः वंदन...

"Add Page Element" तुमच्या ब्लॉगरच्या हेडरला जोडायचे आहे ?

» बुधवार, १६ सप्टेंबर, २००९

नमस्कार मित्रहो, तुम्ही बघितले असेल की, तुमच्या ब्लॉगरच्या लेआउट -> Page Elements (पृष्ठ घटक) येथे तुमच्या ब्लॉगच्या साइडबार आणि फुटर ला पेज एलिमेण्ट्स जोडण्यासाठी पर्याय उपलब्ध असतात. पण, असे असले तरी तेथे हेडर आणि ब्लॉग पोस्ट्स साठी मात्र असे पर्याय उपलब्ध नसतात. या ठिकाणी पेज एलिमेण्ट चे ऑप्शन असणं हे खुप महत्वाचं आणि फायदेशिर ठरू शकतं. कारण, तुम्ही अशावेळी तुमच्या ब्लॉगच्या टॉपला प्रतिमा जोडू शकता, किंवा तुमच्या ब्लॉग पोस्ट्सच्या टॉप किंवा बॉटमला गुगल ऍडसीन जाहीरात लावू शकता. तेव्हा तुम्हाला हे सर्व करण्यासाठी खालील माहीती नक्कीच उपयोगी पडेल. मी ही ट्रिक सक्सेसफुली युज करून बघितली आहे, त्यामुळे कोडमध्ये फॉल्ट असणं किंवा त्रुटी उद्भवण्याचा तर प्रश्नच नाही....!

"Add a Page Element" हे ऑप्शन असण्यासाठी, तुमच्या डॅशबोर्ड वरून "Template" किंवा लेआउट मधील "Edit HTML" ही टॅब क्लिक करा. तुमच्या ब्लॉग टेम्प्लेट कोड मध्ये काहीही बदल करण्याअगोदर टेम्प्लेट डाउनलोड करून विशिष्ट जागी जतन करून ठेवा, जेणेकरून जर तुम्हाला केलेले बदल नको हवे असतील तर ते टेम्प्लेट तुम्ही पुन्हा अपलोड करून वापरू शकता. बरं, आता तुमच्या "Expand Widget Template" हे केलेले आहे का ते प्रथम पाहून घ्या, जर तुम्ही विजेट टेम्प्लेट एक्स्पाण्ड नाही केले, तर कदाचित तुम्हाला खाली दिलेले काही कोड्स सापडणार नाहीत, तेव्हा सर्वप्रथम याची दक्षता घ्या. आणि सर्वात महत्वाची सुचना म्हणजे जोपर्यंत सर्व बदल होत नाहीत तोपर्यंत टेम्प्लेट जतन करू नका, प्रिव्ह्यू (पुर्वावलोकन) मात्र पाहू शकता.

ठिक आहे, तर आता पुढे दिलेल्या काही कोडिंग लाइन्स तुमच्या ब्राउजर मध्ये "ctrl+F" ही की दाबून शोधा, किंवा पहिलीच लाइन शोधली तरी चालेल.


सौर ऊर्जेपासून वीजनिर्मीती

» रविवार, १३ सप्टेंबर, २००९

नविनच संकल्पना असलेला हा प्लान्ट आहे. सन १९७०-८० मध्ये या प्रकल्पावर संशोधन चालू होते. मध्यंतरी त्यावर दुर्लक्ष देखील झाले. पण वीस वर्षांनंतर एकविसाव्या शतकात वीजेची पुरती गरज भागवणारा हा एक्स्ट्रीम प्लान्ट पर्वणीच म्हणावा लागेल.

सध्या तरी दगडी कोळसा वापरून आणि इरिगेशन प्रकल्पांद्वारे वीजेची निर्मिती आपण तयार होतांना बघतो आहोत. आपल्या घराला मिळणारी वीज देखील हीच तर आहे ना ! माहीत असेलच, त्यात काय नवल ? बहुतेक जणांना तर हे पण माहीत असेल, की गेल्या दोन ते तीन दशकांपासून अणुऊर्जेद्वारे देखील वीजनिर्मितीवर संशोधनाला जोर येतोय.

पण आता तुम्ही पुढे जे काय वाचणार आहात, ते देखील तुमच्या किंचित परिचयाचे असेल. हो, सौर ऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करणे. शालेय काळात कुठे तरी वाचले किंवा ऐकले तरी असेलच ! काय, तुम्हाला वाटतयं तेवढं बिल्कुल सोपं नाही हे काम, म्हणूनच तर १९७०-८० नंतर आता कुठे याची चुणुक दिसते आहे. कारण विचाराल तर एक नव्हे किती असे विचारावे लागेल, आहेच हो तेवढी कारणे ! एक तर पहिल्यांदाच अशा नविनतम प्रकल्पाची संकल्पना मांडणे (मग त्यात किंवा नंतर, प्रथम संशोधन, आणि मग निकाल ऍप्रुव्ह्ड किंवा अन-ऍप्रुव्ह्ड...!), आणि जर ऍप्रुव्ह्ड केला गेला त्यानंतर देखील प्रकल्पासाठी जागा, नविनच साधन सामग्री (अद्याप तयारच न झालेली), निष्ठावान कर्मचारी, कामगार, प्लान्ट साइट पर्यंत दळण-वळणाची साधने व मार्ग, आणि याहूनही सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अर्थ-सहाय्य...(पैसा हो !), आणि या सर्व गोष्टींचा पाठ-पुरवठा करणारे त्या राष्ट्राचे शासन नेमकी काय भूमिका घेते ही प्रामुख्याने भेडसावणारी कारणे असतात. आणि ही सर्व कारणे प्रत्येक नविन प्रकल्पाला भेडसावत असतात, हे तर आपल्या सर्वांना माहीत आहेच. पण हा प्लान्ट इतरांप्रमाणे तर नक्कीच नाही, कारण यासमोर सर्वात मोठी समस्या आहे (अजुनही आहेच), ती म्हणजे  एवढं काही करून OUTPUT काय मिळणार?

संकल्पना

सुर्यापासून मिळणारी सौर ऊर्जा मोठाल्या खास बनवलेल्या सोलार पॅनेल्स वर एकवटून त्यापासून वाफेची निर्मीती करून व त्याद्वारे टर्बाइन्स फिरवून वीजनिर्मिती करणे.

कार्य-प्रणाली

प्रती मैल प्रती कॅपिटा हजारो ज्युल ऊर्जा प्रती सेकंदाला जमिनीवर वाया जाते. (विनाकारण...!) अशा परिस्थितीत ही ऊर्जा आपल्या निजी कामासाठी वापरली जावी अशी प्रत्येकाला अपेक्षा असेल. आजची स्थिती पाहता, वीज महावितरण कंपनीला वीज महाभारनियमन म्हणण्याची वेळ आली आहे. एवढी वीजटंचाई असताना या प्रकारच्या धाडसी प्रकल्पाबद्दल कोणाचीही उत्सुकता शिगेला पोहोचण्यात काही वावगे नाही.

तर या प्रकल्पाचे कन्स्ट्रक्शन करताना प्रथम जागेचा विचार करावा लागेल, तो त्या जागेची सभोवतालची तसेच भौगोलिक माहिती मिळवावी लागेल. साधारणतः प्रकल्पास अशी जागा लागेल, जेथे वर्षभर पुष्कळ सुर्यप्रकाश मिळण्यास काहीही अडचण येणार नाही. योग्य ओळखले, रेगिस्तानच (वाळवंट हो !) योग्य...! ऑस्ट्रेलियात आणि अमेरिकेच्या न्युयॉर्क नजिकच्या परिसरात हा प्लान्ट रेडी टू युज आहे...


"Lazarus" - नेव्हर लुज एनिथिंग यु टाइप इन्टू अ वेब फॉर्म अगेन !

» गुरुवार, १० सप्टेंबर, २००९

जर तुम्ही मोझिला फायरफॉक्स वापरत असाल तर ही खुप महत्वाची गोष्ट मी इथे नमूद करू इच्छितो. नेटवर असताना आपण कित्येक वेळा अनेक ठिकाणी कॉमेन्ट, पोस्ट, नोंदणी फॉर्म इत्यादींच्या स्वरूपात काहीना-काही लिहीत असतो. कोणाला असे वाटेल की आपण जे एवढे काही इथे लिहीतोय (माहिती भरतोय), ती डिलीट होऊन (किंवा ऊडून) जावी ! कोणालाच वाटणार नाही...!!! पण असं नेहमी होतं.... आपल्याला नको असलं तरी आपल्यासोबत दैनंदिन असे प्रसंग घडतातच.....!!! लाइट गेली म्हणा, बॅटरी संपण, सर्वर टाइम्ड आऊट, सर्वर नॉट फाउन्ड, मोझिला क्रॅश, किंवा अन्य अजुन काही कारणे असतील, जर असं आपल्या बाबतीत घडलं, आणि तेही जर काही इम्पॉर्टंट डेटा भरताना... तर मग ? हं, मान्य आहे काही ठिकाणी जसे की ब्लॉगर वर ब्लॉग एडिटर मध्ये ड्राफ्टच्या रूपात बॅक-अप असतो... हा तर एक अपवाद आहे. पण जर ब्लॉग टेम्प्लेटच्या एच.टी.एम.एल. एडिटर मध्ये काही चेन्जेस करायचे झाले, तर परत-परत टेम्प्लेट कॉपी डाऊनलोड करणं जरा अवघड आणि कंटाळवाणं असतं... आणि आपल्याला आत्ताच केलेले बदल पुर्ववत स्थितीत आणायचे झाल्यास पुढील प्रोसेसेस अजुनच वेळ-खाऊ आणि कठिण होत जातात.

पण, जर तुम्हाला कोणी सांगितले, की तुम्ही जिथे असाल, आणि जे हवं असेल त्याचा लिखाणाचं बॅक-अप एका क्लिकसह परत मिळवू शकता...! तुम्ही विश्वास ठेवाल काय...? कदाचित प्रथमदर्शनी नाही ठेवणार तुम्ही विश्वास...! अहो, पण हे सत्य आहे.... तुम्ही असे एका टिचकीसरशी करू शकता. आणि ते पण कुठेही न जाता... तिथल्या तिथे... लगेच... ऑन दि स्पॉट...!!!


Vishal Telangre