नेहमी गरज भासणारी काही साधने

»

शास्त्रीय गणकयंत्र 
© Stephen Ostermiller and Vishal Telangre under GNU General Public License (GPL) by Free Software Foundation (FSF).












गणकयंत्र प्रणाली-दृश्य:



 




वरील गणकयंत्र हाताळण्याबद्दलची माहिती:

  • सुरुवातीच्या टेक्स्ट बारमध्ये इच्छित गणितीय राशी/पदावली (expression) टंकून अपेक्षित परिणामासाठी (result) किबोर्डवरील एन्टर कळ हिट करा.
  • हे गणकयंत्र अंतिम २० गणनप्रक्रियांचा इतिहास स्मरणात ठेवते—त्यासाठी तुमच्या न्याहाळकावर कुकीज् सक्षम केलेल्या असणे गरजेचे आहे.
  • हे गणकयंत्र काही विविध अंक पद्धतिंनुसार संख्यांचे आदान करण्यास/घेण्यास अनुमती देते:
 ✔ दशमान (पाया १०): सुरुवातीचा अंक शून्य नसलेल्या संख्या—जसे की, 15 किंवा 3.14e15. दशमान संख्यांमध्ये 0-9 अंके, दशांशप्रतिके आणि इतर गणितीय/वैज्ञानिक संकेतनांचा अंतर्भाव असू शकतो.
✔ षोडषमान (पाया १६): शून्य x पासून चालू होणर्‍या पूर्णांक संख्या—जसे की, 0x1a5. षोडषमान संख्यांमध्ये 0-9 अंके, इंग्रजीतील a-f (किंवा A-F) मुळाक्षरे यांचा अंतर्भाव असू शकतो, पण दशांश किंवा गणितीय/वैज्ञानिक संकेतनांचा अंतर्भाव नसतो.
✔ अष्टमान (पाया ८): शून्यापासून चालू होणार्‍या पूर्णांक संख्या—जसे की, 073. अष्टमान संख्यांमध्ये 0-7 अंकांचा अंतर्भाव असू शकतो, मात्र दशांश किंवा गणितीय/वैज्ञानिक संकेतनांचा अंतर्भाव नसतो.
✔ द्विमान (पाया २): शून्य b पासून चालू होणर्‍या पूर्णांक संख्या—जसे की, 0b101. अष्टमान संख्यांमध्ये फक्त 0 आणि 1 या केवल दोनच अंकांचा अंतर्भाव असू शकतो, पण दशांश किंवा गणितीय/वैज्ञानिक संकेतनांचा अंतर्भाव नसतो.
  • ^ ही एक bitwise xor क्रिया आहे. एखाद्या संख्येचा घातांक दर्शवण्यासाठी pow() हे फल वापरावे. उदाहरणार्थ, 5² लिहिण्यासाठी pow(5,2) असे टंकावे.



———————————————————————————————————


पारिभाषिक शब्दांचा शोध 

मनोगतरील उपलब्ध पारिभाषिक शब्दकोशाचा उपयोग करुन इंग्रजीत असलेल्या पारिभाषिक शब्दांना मराठीमध्ये प्रतिशब्द शोधा:








Vishal Telangre