नविनच संकल्पना असलेला हा प्लान्ट आहे. सन १९७०-८० मध्ये या प्रकल्पावर संशोधन चालू होते. मध्यंतरी त्यावर दुर्लक्ष देखील झाले. पण वीस वर्षांनंतर एकविसाव्या शतकात वीजेची पुरती गरज भागवणारा हा एक्स्ट्रीम प्लान्ट पर्वणीच म्हणावा लागेल.
सध्या तरी दगडी कोळसा वापरून आणि इरिगेशन प्रकल्पांद्वारे वीजेची निर्मिती आपण तयार होतांना बघतो आहोत. आपल्या घराला मिळणारी वीज देखील हीच तर आहे ना ! माहीत असेलच, त्यात काय नवल ? बहुतेक जणांना तर हे पण माहीत असेल, की गेल्या दोन ते तीन दशकांपासून अणुऊर्जेद्वारे देखील वीजनिर्मितीवर संशोधनाला जोर येतोय.
पण आता तुम्ही पुढे जे काय वाचणार आहात, ते देखील तुमच्या किंचित परिचयाचे असेल. हो, सौर ऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करणे. शालेय काळात कुठे तरी वाचले किंवा ऐकले तरी असेलच ! काय, तुम्हाला वाटतयं तेवढं बिल्कुल सोपं नाही हे काम, म्हणूनच तर १९७०-८० नंतर आता कुठे याची चुणुक दिसते आहे. कारण विचाराल तर एक नव्हे किती असे विचारावे लागेल, आहेच हो तेवढी कारणे ! एक तर पहिल्यांदाच अशा नविनतम प्रकल्पाची संकल्पना मांडणे (मग त्यात किंवा नंतर, प्रथम संशोधन, आणि मग निकाल ऍप्रुव्ह्ड किंवा अन-ऍप्रुव्ह्ड...!), आणि जर ऍप्रुव्ह्ड केला गेला त्यानंतर देखील प्रकल्पासाठी जागा, नविनच साधन सामग्री (अद्याप तयारच न झालेली), निष्ठावान कर्मचारी, कामगार, प्लान्ट साइट पर्यंत दळण-वळणाची साधने व मार्ग, आणि याहूनही सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अर्थ-सहाय्य...(पैसा हो !), आणि या सर्व गोष्टींचा पाठ-पुरवठा करणारे त्या राष्ट्राचे शासन नेमकी काय भूमिका घेते ही प्रामुख्याने भेडसावणारी कारणे असतात. आणि ही सर्व कारणे प्रत्येक नविन प्रकल्पाला भेडसावत असतात, हे तर आपल्या सर्वांना माहीत आहेच. पण हा प्लान्ट इतरांप्रमाणे तर नक्कीच नाही, कारण यासमोर सर्वात मोठी समस्या आहे (अजुनही आहेच), ती म्हणजे एवढं काही करून OUTPUT काय मिळणार?
संकल्पना
सुर्यापासून मिळणारी सौर ऊर्जा मोठाल्या खास बनवलेल्या सोलार पॅनेल्स वर एकवटून त्यापासून वाफेची निर्मीती करून व त्याद्वारे टर्बाइन्स फिरवून वीजनिर्मिती करणे.
कार्य-प्रणाली
प्रती मैल प्रती कॅपिटा हजारो ज्युल ऊर्जा प्रती सेकंदाला जमिनीवर वाया जाते. (विनाकारण...!) अशा परिस्थितीत ही ऊर्जा आपल्या निजी कामासाठी वापरली जावी अशी प्रत्येकाला अपेक्षा असेल. आजची स्थिती पाहता, वीज महावितरण कंपनीला वीज महाभारनियमन म्हणण्याची वेळ आली आहे. एवढी वीजटंचाई असताना या प्रकारच्या धाडसी प्रकल्पाबद्दल कोणाचीही उत्सुकता शिगेला पोहोचण्यात काही वावगे नाही.
तर या प्रकल्पाचे कन्स्ट्रक्शन करताना प्रथम जागेचा विचार करावा लागेल, तो त्या जागेची सभोवतालची तसेच भौगोलिक माहिती मिळवावी लागेल. साधारणतः प्रकल्पास अशी जागा लागेल, जेथे वर्षभर पुष्कळ सुर्यप्रकाश मिळण्यास काहीही अडचण येणार नाही. योग्य ओळखले, रेगिस्तानच (वाळवंट हो !) योग्य...! ऑस्ट्रेलियात आणि अमेरिकेच्या न्युयॉर्क नजिकच्या परिसरात हा प्लान्ट रेडी टू युज आहे...