मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!

» शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१०

 लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी ।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

'मराठी भाषा दिवस' च्या सर्व मराठीप्रेमींना हार्दिक शुभेच्छा!
( मराठी भाषा दिनाची पार्श्वभूमी.)

सादर करीत आहोत: "मराठीमंडळी.कॉम"

» गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१०

सादर करीत आहोत, मराठी ब्लॉगर्सचे हक्काचे व्यासपीठ, 

यंदाच्या धुळवडीच्या दिवशी, १ मार्च २०१० रोजी.
फाल्गुन कृष्ण द्वितिया, शके १९३१.
रात्रौ: १०:०३ मि. (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
आपली ऑनलाईन

अधिक माहितीसाठी जरुर लिहा अथवा चॅट करा
pankajzarekar[AT]gmail[DOT]com
mebhunga[AT]gmail[DOT]com
aniket.com[AT]gmail[DOT]com
vikrant.deshmukh888[AT]gmail[DOT]com
vishaltelangre[AT]gmail[DOT]com



अमर्याद PDF डॉक्युमेण्ट्स बनवा एका क्लिकसह!

» रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०

सध्या घाईत असल्याने एकदम थोडक्यात सांगतो आहे, काही अडचण आल्यास आपल्या प्रतिक्रिया खाली टाका, त्यांना मी योग्य उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन!

भुंग्या दादाच्या ब्लॉगवर हल्ली खुपच पुस्तके डाऊनलोड करण्यास मिळत आहेत, पण ती सर्व .PDF या एक्स्टेंशन मध्ये असतात. माझ्या बहुतेक ब्लॉगर्स मित्र अन मैत्रिणींना तसेच वाचकांना असा प्रश्न पडला असेल की, हा भुंग्या ही पुस्तके बनवतो तरी कशी?? त्याचेच एक अतिशय सोपे उत्तर मी तुम्हाला या लेखात सांगतो आहे!

तुम्ही कधी ओपन सोअर्स सॉफ्टवेअर्स बद्दल ऐकले आहे का? जाऊ द्या, नका टेन्शन घेऊ! मी सध्या उबुन्टू ९.१ ही लिनक्सची ऑपरेटिंग सिस्टीम वापरत आहे. आणि हे तर सर्वांना माहित असेलच की लिनक्स (लायनक्स?) ही ओपन सोअर्स अणि मोफत मिळणारी ऑपरेटिंग सिस्टीम आहे! त्यात अगोदरच "ओपन ऑफिस.ऑर्ग" हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखे सॉफ्टवेअर पॅकेज मिळते. विन्डोजच्या सर्व फ्लेवर्ससाठी(विन्डोज एनटी, २०००, एक्सपी, व्हिस्टा, सेव्हन..) साठीही हे ऑफिस पॅकेज अगदी मोफत उपलब्ध आहे.

"ओपन ऑफिस डॉट ओआरजी" ला येथून डाऊनलोड करा.

श्रद्धांजली...

»

दिनांक १३ फेब्रुवारी, २०१० रोजी पुण्यातील दुर्दैवी आत्मघातकी अतिरेकी हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांना मनःपूर्वक श्रद्धांजली...

पाणी डोक्यावरून गेलंय आता...!

» रविवार, ७ फेब्रुवारी, २०१०

स्वतंत्र भारताच्या संविधानाने भारतवर्षाच्या प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, हे पुन्हा सांगावे लागू नये व माझ्या अश्या पोस्ट्सवर कसलीही बंधने येऊ नयेत, यासाठी आधीच हे नमूद करतो. पण आजकाल या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणारे भरपूर लोकं नजरेस पडताहेत. काय या लोकांना लोकशाही नकोशी झाली आहे (तसं लोकशाही पद्धती असण्यावर माझासुद्धा विरोध आहे.), या लोकांना अगदीच माज चढलाय की यांचा महाराष्ट्र या एकाच प्रांतावर तिरपा डोळा आहे...??? या प्रश्नांना या नेतेमंडळींकडूनच उत्तरे मिळाली तर माझ्या महाराष्ट्राला या सुवर्णमहोत्सवी वर्षातही पीडत असेलेले बरेचसे प्रश्न मार्गी लागू शकतील, असं माझं स्पष्ट मत आहे. महाराष्ट्राचा एक सुजाण नागरिक म्हणून मला ज्या गोष्टींबद्दल आक्षेप आहे, त्या मी या ब्लॉगच्या स्वरूपाने जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. कित्येकांचा मी मांडलेल्या मुद्द्यांवरही आक्षेप असू शकतो, पण चर्चेने हा विषय-लेख बराचसा परिणामकारक होईल अशी आशा आहे. वाचकांनी आपल्या सद्सदविवेकबुद्धीने प्रतिक्रिया नोंदवावी.

माझे मुद्दे, आक्षेप, सुचना इत्यादी खालीलप्रमाणे:

१) संयुक्त महाराष्ट्राचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. सुमारे १०५ हुतात्म्यांनी आपल्या जीवाची कसलीही तमा न बाळगता संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी (मराठीभाषिकांना एकत्र करण्यासाठी) "संयुक्त महाराष्ट्र लढा" चालू केला, अन आपल्या प्राणांची आहूती देऊन (त्यांचे प्राण कसे व का गेले, कोणी घेतले, त्यांच्या हत्यांमागचा मुख्य सुत्रधार कोण या गोष्टी अजुनही सामान्य मराठी माणसाला अज्ञातच आहेत.) संयुक्त १ मे, १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली . हे वर्ष त्यांच्या बलिदानाचे ५०वं वर्ष, पण आपल्या नेत्यांना, इलेक्ट्रॉनिक मिडियाला थोडी जरी लाज, शरम असती तर भव्य अन दिव्य असे कार्यक्रम आणि उत्सव साजरी केले असते. नाही काही तर हुतात्म्यांच्या मागासलेल्या व सुख-सुविधांपासून वंचित राहिलेल्या परिवारांना भरघोस आर्थिक मदत तरी देऊ केली असती. पण जिंकल्याचा माज सध्याच्या सरकारकडून सध्या तरी उतरेल, असं दिसत नाही. आपण आपल्या खिशातून सरकारच्या तिजोरीत पैसे खाली करतो तो अशा सदुपयोगी अन समाजपयोगी कामांसाठीच ना....! नेतेमंडळी १ मे ची वाट पाहत असणार... १ मे ला सकाळी १०-११च्या सुमारास प्रत्येक शासकिय कार्यालयात झेंडावंदन करायचं... अन बाकी काय, झाला महाराष्ट्र दिन साजरी...

Vishal Telangre