परवा दिवशीच कॉलेजमध्ये आमच्या चार जणांच्या ग्रुपने एक मिनी प्रोजेक्ट सबमिट केला. त्यासाठी आम्ही घेतलेल्या मेहनतीवर एखादी पोस्ट लिहावी, असे काल मनात आले, पण पोस्ट लिहितांना काय लिहावे, हा विचार माझ्या मनात घोळत होता. मग म्हटलं, आपण प्रोजेक्ट साठी जशी तयारी केली होती, तशीच इथे पोस्टली तर.. पण त्यासाठी चित्रे काढणे तर खुप अवघड काम!! मग मला
सोमेश दादाने सांगितलेले एक सॉफ्टवेअर आठवले! तुम्हीही त्याच्या "
द लाईफ!" संस्थळावर अनेक माईंडमॅप्स पाहिले असतील.. तसाच एखादा माईंड मॅप मीसुद्धा काढावा असे ठरवले. त्यासाठी त्याने सुचवलेले ते सॉफ्टवेअर शेवटी मी माझ्या उबुन्टू मशीनवर इन्स्टॉल केले. त्याचाच वापर करून मी खालील माईंडमॅप तयार केला आहे.
|
माईंडमॅप स्पष्ट दिसण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
वरील माईंडमॅपच्या आधारे तुम्हाला मिळालेला एखादा कोणत्याही विषयाशी संबंधित असणारा प्रोजेक्ट (उदा. एखादा ब्लॉग किंवा संस्थळ!) कसा तयार करावा याचा अंदाज आला असेलच, तरीही त्याबद्दल मी आणखी डिप मध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करतो...