"Add Page Element" तुमच्या ब्लॉगरच्या हेडरला जोडायचे आहे ?

» बुधवार, १६ सप्टेंबर, २००९

नमस्कार मित्रहो, तुम्ही बघितले असेल की, तुमच्या ब्लॉगरच्या लेआउट -> Page Elements (पृष्ठ घटक) येथे तुमच्या ब्लॉगच्या साइडबार आणि फुटर ला पेज एलिमेण्ट्स जोडण्यासाठी पर्याय उपलब्ध असतात. पण, असे असले तरी तेथे हेडर आणि ब्लॉग पोस्ट्स साठी मात्र असे पर्याय उपलब्ध नसतात. या ठिकाणी पेज एलिमेण्ट चे ऑप्शन असणं हे खुप महत्वाचं आणि फायदेशिर ठरू शकतं. कारण, तुम्ही अशावेळी तुमच्या ब्लॉगच्या टॉपला प्रतिमा जोडू शकता, किंवा तुमच्या ब्लॉग पोस्ट्सच्या टॉप किंवा बॉटमला गुगल ऍडसीन जाहीरात लावू शकता. तेव्हा तुम्हाला हे सर्व करण्यासाठी खालील माहीती नक्कीच उपयोगी पडेल. मी ही ट्रिक सक्सेसफुली युज करून बघितली आहे, त्यामुळे कोडमध्ये फॉल्ट असणं किंवा त्रुटी उद्भवण्याचा तर प्रश्नच नाही....!

"Add a Page Element" हे ऑप्शन असण्यासाठी, तुमच्या डॅशबोर्ड वरून "Template" किंवा लेआउट मधील "Edit HTML" ही टॅब क्लिक करा. तुमच्या ब्लॉग टेम्प्लेट कोड मध्ये काहीही बदल करण्याअगोदर टेम्प्लेट डाउनलोड करून विशिष्ट जागी जतन करून ठेवा, जेणेकरून जर तुम्हाला केलेले बदल नको हवे असतील तर ते टेम्प्लेट तुम्ही पुन्हा अपलोड करून वापरू शकता. बरं, आता तुमच्या "Expand Widget Template" हे केलेले आहे का ते प्रथम पाहून घ्या, जर तुम्ही विजेट टेम्प्लेट एक्स्पाण्ड नाही केले, तर कदाचित तुम्हाला खाली दिलेले काही कोड्स सापडणार नाहीत, तेव्हा सर्वप्रथम याची दक्षता घ्या. आणि सर्वात महत्वाची सुचना म्हणजे जोपर्यंत सर्व बदल होत नाहीत तोपर्यंत टेम्प्लेट जतन करू नका, प्रिव्ह्यू (पुर्वावलोकन) मात्र पाहू शकता.

ठिक आहे, तर आता पुढे दिलेल्या काही कोडिंग लाइन्स तुमच्या ब्राउजर मध्ये "ctrl+F" ही की दाबून शोधा, किंवा पहिलीच लाइन शोधली तरी चालेल.



<div id='header-wrapper'>
<b:section class='header' id='header' maxwidgets='1' showaddelement='no'>

  या कोडला पुढीलप्रमाणे चेन्ज करा:

<div id='header-wrapper'>
<b:section class='header' id='header' maxwidgets='3' showaddelement='yes'>

 या बदलामुळे तुम्ही तुमच्या हेडरला आणखी २ शिल्लकचे पेज एलिमेण्ट्स जोडू शकाल. आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हा नंबर वाढवू शकता.


बरं हे झालं हेडर बद्दल, आता ब्लॉगपोस्टवर करण्यासाठी पुढील कोड शोधा:

<div id='main-wrapper'>
<b:section class='main' id='main' showaddelement='no'>

 या कोडला पुढीलप्रमाणे चेन्ज करा:

 <div id='main-wrapper'>
<b:section class='main' id='main' showaddelement='yes'>

 जर वरील बदल यशस्वीरित्या पार पडले असतील तर आता तुम्ही हेडर तसेच ब्लॉगपोस्ट्सच्या आधी किंवा नंतर पेज एलिमेण्ट्स जोडण्यास समर्थ आहात. तुमच्या लेआउट मध्ये खालील प्रमाणे दोन ठिकाणी चेन्जेस तुम्ही पाहू शकाल. (खालील प्रतिमा पहा.)


सुचना: काही ब्लॉग टेम्प्लेट्स मध्ये 'header-wrapper' या टॅगला 'header-wrap' किंवा 'header' असेही असेल, तेव्हा तुम्हाला वरील कोड सापडेलच असेही नाही, अशावेळी निराश नका होऊ, 'showaddelement' ही किवर्ड शोधा आणि बघा तुम्हाला हवं असलेलं कोडिंग मिळतं का ते...!


अद्ययावतता: बरं तुम्हाला जर तुमच्या कॉपीराइटच्या वर सेंटर अलाइन्ड "Add a Page Element" ऑप्शन हवं असेल तर त्यासाठी तुमच्या टेम्प्लेटच्या कॉपीराइट कोडच्या जरा वर पुढील कोड पेस्ट करा:

<div id='content-wrapper'>

<div id='crosscol-wrapper' style='text-align:center'>
<b:section class='crosscol' id='crosscol' showaddelement='yes'/>
</div>

याद्वारे तुम्हाला काहीसे असे चेन्जेस बघायला मिळतील. (खालील प्रतिमा पहा.)



तर अशाप्रकारे बदल केल्यानंतर तुमचे टेम्प्लेट जतन करा आणि बदल बघा.

जर तुम्हाला वरील माहिती आवडली असेल किंवा काही अडचणी येत असतील, तर खाली प्रतिक्रिया जरूर टाका. आपल्या सुचनांवर योग्य निर्णय घेतले जातील.

जय महाराष्ट्र...

6 प्रतिक्रिया:

आदिती म्हणाले...

वा! छान माहिती मिळाली, सकाळी सकाळी. मी असे विजेट कोड शोधतच असते. खरं सांगते, असे निराळे कोड वापरून जेव्हा आपला ब्लॉग आणखी सुंदर बनवता येतो, तेव्हा ते रुक्ष दिसणारे html tags सुद्धा सुंदर वाटू लागतात. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मनापासून आभार!
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@आदिती, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद्द.... अगदी बरोबर म्हणता तुम्ही... जर आपल्याला हवे असलेले चेन्जेस मिळत असतील तर त्या किचकट वाटणार्‍या एच.टी.एम.एल. टॅग्ज सुंदर वाटू लागतात....
>>> प्रतिक्रियेबद्दल तुमचे मनापासून आभार...
तुमचे नेहमी स्वागत आहे, असाच नेहमी उत्साह वाढवत राहा....!
D D म्हणाले...

धन्यवाद विशाल!
मी खूप दिवसांपासून या माहितीच्या शोधात होते, ती ह्या तुमच्या पोस्टमुळे कळली. ऍड पेज एलेमेंट बद्दल मला एक शंका आहे. तुम्ही जे पेज एलेमेंट ब्लॉगर हेडरला जोडले आहे, ते ओपन केल्यावर तुमच्या ब्लॉगपोस्टचे विशिष्ट पेज दिसते. पण जर त्याऐवजी एक ब्लॉगपोस्टचे पेज दाखवायचे असेल आणि त्याबरोबर दुसरे ब्लॉगरचे डिफ़ॉल्ट माय प्रोफ़ाईल पेज दाखवायचे असेल, तर तसे करता येईल का?

अजून एक वेगळीच शंका विचारायची होती. माझ्या ब्लॉगचा लेआऊट ओपन केल्यावर त्यात वरती सेंटर अलाईन्ड हेडर दिसते, नंतर खाली डावीकडे ब्लॉग पोस्टची चौकट दिसते व उजवीकडे ऍड गॅजेटचा सिंगल कॉलम दिसतो. त्यानंतर त्याखाली फ़ूटरसारखी सेंटर अलाईण्ड चौकट दिसते ज्यावर ऍड गॅजेट असे लिहिले आहे आणि त्याखाली ब्लॉग टेम्प्लेटचे अधिकार दर्शविणारी ओळ दिसते जी त्या फ़ूटरच्या चौकटीत नाही. पण माझ्या ब्लॉगच्या या विशिष्ट टेम्प्लेटमुळे मूळ क्लासिक टेम्प्लेटमधील फ़ूटरप्रमाणे मी त्यात सेंटर अलाईन्ड एक्स्ट्रॉ गॅजेट फ़ूटर म्हणून ऍड करू शकत नाहीये. तरी त्याच्या एचटीएमएल मध्ये बदल करून व साईडबारसाठी असलेली इमेज वापरून किंवा टेम्प्लेटच्याच ग्रेडेशन दर्शवणार्‍या रंगावर दिसेल अशा प्रकारे मी खाली गॅजेट ऍड करण्यासाठी एक्स्ट्रॉ फ़ूटर लावू शकेन का? तसे शक्य झाल्यास मला ब्लॉगच्या तळाला असलेल्या "टेम्प्लेट कॉपीराईट नोट"च्या वरती, "लेबल्सचे" गॅजेट सेंटर अलाईन्ड पद्धतीने लावायचे आहे.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@DD, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद देवयानी ताई...
मी तुमचा ब्लॉग पाहिला, तुमच्या टेम्प्लेटच्या फूटरला तुम्हाला "शब्दांचे ढग" हे विझेट लावण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पेज एलिमेण्ट जोडण्याची गरज नाहीये...
>>> ते विझेट जोडण्यासाठी तुमच्या लेआऊट मध्ये जाऊन तुमच्या साईडबारमधून "ऍड न्यू विझेट" करून तेथे "शब्दांचे क्लाउड" विझेट जोडा. ते तुमच्या साईडबारमध्ये ऍटॅच होईल. आता तुम्हाला ते फूटरला लावण्यासाठी फक्त त्याला साईडबारमधून ड्रॅग करून ते फूटरच्या ठिकाणी ड्रॉप करावयाचे आहे... काम फत्ते... ते आता तुमच्या टेम्प्लेटच्या फूटरला दिसेल... सेव्ह करा अन बघा...
>>> आणि "कॉपीराईट"ला "Diseño de: A. Zambrana, adaptando una plantilla de Finalsense" याच्या जागी टाकायचे असल्यास तुमच्या टेम्प्लेटचे एचटीएमएल एडिट करून वरील "Diseño de" शोधा, व तुम्हाला तेथे "कॉपीराईट" टाकता येईल...
>>> अजुन काही शंका असतील, तर त्या जरूर विचारा, मी पण एक नवशिक्याच आहे, जर हे जमलं नाही तर "भुंग्या" दादाला विचारावं लागेल.
D D म्हणाले...

विशाल,
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लेबल्स चे विजेट साईडबार मधून ड्रॅग करून ते फूटरच्या ठिकाणी ड्रॉप करून सेव्ह करण्याचा प्रयत्न केला. पण ब्लॉगर bX-tl63fe या क्रमांकाची error दाखवत आहे.
पण हरकत नाही, मी तुमच्या पोस्टमध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे पेज एलेमेंट ब्लॉगरच्या हेडरला जोडून पहणारच आहे.
पण तुम्ही ताबडतोब माझ्या शंकेला प्रतिसाद देऊन मला उत्तर देण्याचा प्रयत्न केलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@देवयानी ताई, हो, पोस्टमधल्या सुचना तुम्हाला समजतील, अशी आशा आहे... कारण हे चेन्जेस मी माझ्या टेम्प्लेटसोबत अगोदरच करून पाहिलेले आहेत... जर काही अडचण आलीच तर मग मात्र भुंग्याला पर्याय नाही..
धन्यवाद..

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre