एक्जाम्स...

» शुक्रवार, २ एप्रिल, २०१०

बहुदा याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माझे चौथ्या सेमिस्टरचे पेपर चालू होतील... कित्येक दिवसांपासून ब्लॉगवर काहीच लेखन केलेले नाही, त्यामुळे मलाही बोर होतंय, पण माझा एक सबजेक्ट बॅक आहे आणि तुम्हाला तर माहित असेलच की इंजिनिअरिंगला अभ्यास, मुले पी.एल. च्या सुट्ट्यामंध्येच करतात म्हणून... सेम हिअर टू..! चौथ्या सेमच्या कोणत्याच विषयाचा अजुन अभ्यास मी चालू केलेला नाहीये, पण आता करावा लागेल. शिवाय प्रोजेक्ट्स, असाइनमेण्ट्स, प्रॅक्टिकल्स, इत्यादींच्या सबमिशनची डेट लाईन पण काही दिवसांवरच आहे!!!

असो... मी अभ्यासाला लागतोय आता... नेटवर ऑनलाईन तर मी असतोच तसा, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट आणि बझ वरही...!!! पण ब्लॉगवर नविन लेख लिहू शकण्याची शक्यता कमी आहे!

मराठी मंडळी, टेक मराठी या संस्थळांवर थोडेफार लेखन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे काही दिवसांत.. परिक्षा झाल्यानंतर तर तेच कामं आहेत म्हणा..!

9 प्रतिक्रिया:

विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

अभ्यास पहिला रे
सुट्टीत काहीतरी चांगले वाचायला मिळेल अशी आशा करतो
Best luck for exam :)
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@विक्रम, अरे परीक्षेला अजुन महिना बाकी आहे... मध्येही काही झक्कास लिहिण्याचा प्रयत्न राहील..

बेस्ट ऑफ लक साठी धन्यवाद!
अनामित म्हणाले...

Hi Vishal,

दोस्ता PL and backlog ची आठवण करून दिलीस :) ....भरपूर अभ्यास कर...all the best - शेखर
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@शेखर, धन्यवाद!
सागर म्हणाले...

आल द बेस्ट रे...निघतात पेपर..
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@सागर, हम्म निघायलाच पाहिजे पेपर!


बाय दि वे, ऑल दि बेस्ट साठी आभार!
D D म्हणाले...

Best luck for exam!!!
अपर्णा म्हणाले...

विश्ल्या..शुभेच्छा....अभ्यास कर (नाहीतर आमच्या शुभेच्छा फ़ुकट जातील रे....) :)
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@देवयानी,

बेस्ट ऑफ लक बद्दल आभार...!

***********

@अपर्णा,

हम्म.. अभ्यास ही पण काही गोष्ट झाली का मग.. अभ्यास तर करतो आहेच... तुम्हा लोकांच्या शुभेच्छा फुकट जाणार नाहीत याची मी काळजी घेईन...

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre