ऐसे दिस जाती...

» शुक्रवार, ११ जून, २०१०

काही प्रश्न आहेत:

नुकत्याच परिक्षा संपल्या... महिनाभरापासून नुसतं टेन्शन होतं परिक्षेचे... झाल्या एकदाच्या! असो... प्रत्येक वेळी नव-नविन अनुभव मिळताहेत, अनेकांकडून मोलाचे सल्ले मिळताहेत, त्यांचा मला पुढे नक्कीच फायदा होईल, यात शंका नाही... पण हाच मार्ग योग्य आहे का जगण्याचा, शिकण्याचा, अनुभव मिळवण्याचा, आणि दररोज दिवस (वाया) घालवण्याचा?

मला इंजिनिअरिंगला अजुन दोन वर्षे जायची आहेत, तोपर्यंत मला माझ्या फिल्डमधले आवश्यक तेवढे ज्ञान प्राप्त होईल खरे, पण ते तेवढेच असावे की मी माझ्या इच्छा-आकांक्षा अजून उंचावून इतरही अनेक गोष्टींवर लक्ष द्यायला हवे? तुम्हा लोकांचे जीवन दररोजचे रेग्युलर ऑफिस, नोकरी, घरकामे इत्यादी एवढ्यावरच थांबते का, की तुम्ही त्यात रंग भरण्यासाठी अजुन काही करता?

माझा ह्या लेखात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा सारांश एवढाच आहे, की हे जे दिवस जाताहेत, ते असेच जाऊ द्यावेत का?

सल्ले, अनुभव, आणि मला व माझ्यासारख्या इतरांना उपयोगी ठरतील अशा प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत...

16 प्रतिक्रिया:

Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले...

आणखीही बर्‍याच गोष्टी करण्यासारख्या आहेत जगात. भटकंती अनलिमिटेड, ट्रेक्स. मी कॉलेजला असताना खूप स्वस्तात ट्रेक करायचो. पन्नास रुपये आणि फुल्ल दिवस धमाल.
पण लक्षात ठेव रिकामे मन हे सैतानाचे घर असते. तेव्हा रिकामा राहू नकोस.

-तुझा पंक्या.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@पंक्या,

ह्म्म, तुझ्या भटकंती बद्दल तू मला यापूर्वीही सांगितलं होतं...
सध्या तरी लिनक्सची पाळे-मुळे खोदण्याचं काम करतोय... लाँचपॅड वर bugs ची कारणमीमांसा करणे, योग्य ती उत्तरे देणे, IRC (इंटरनेट रीले चॅट) वरील Freenode च्या Ubuntu Server वर लोकांची मदत करणे व लोकांचे अनुभव जाणून घेणे, स्पेससंबंधित नविन इश्युज इत्यादी... कामे चालू आहेत... भटकंती करायची, पण आमच्याकडे "व्हर्जिन" व "प्रेक्षणिय" स्थळांचा ____ आहे, त्यामुळे तरी तिकडे माझा जास्त कल नसतो, पण गावाकडे गेलो की, मस्त ट्रेकिंग करण्याचा प्लॅन आहे!

रिकामे मन (डोकं?) हे सैतानाचे घर असते हे एकदम बरोबर! :)
विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

वाचन हि एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपल्याला खूप काही मिळू शकते
शक्यतो आपल्या आवडत्या विषयावरील वाचन वाढव त्याचा तुला खूप उपयोग होईल असे मला वाटते
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@विक्रम,

बरोबर बोललास... वाचन ही खरंच चांगली सवय आहे, आणि मला वाचनाची आवडसुद्धा आहे! :)
Anonymous म्हणाले...

सर्वप्रथम तुझं अभिनंदन की तुला हे प्रश्न तरी पडले. मी कॉलेजात असताना मला असे कधी वाटल्याचे अजिबात आठवत नाही. (आम्ही आला दिवस ढकलणारे...)तुला हे प्रश्न पडतात म्हणजे तुझा उत्साह आणि संवेदनशीलता अजून कायम आहे. ति तशीच ठेव.
वाचन आणि लिखाण हे तर आयुष्यभर करायच्या गोष्टी आहेत. त्या अविरत चालूच ठेव. विशेषतः IT मध्ये तर sky is the limit !! काय काय creative गोष्टी करू आणि काय काय नको याला मर्यादाच नाही. तू programming मध्ये कितीही कीडे करू शकतोस. कोणास ठाऊक यातून एखादा नविन Bill gates जन्माला येईल. तूझ्याकडून एखादे breakthrough innovation बाहेर येईल.
दुसरे म्हणजे, तुझा PR खुप चांगला आहे. त्याचा वापर करून इतर शहरांना भेटी देणे आणि तिथल्या निरनिराळ्या वर्तुळांमध्ये संचार करून enjoy करणे तुला आत्ताच शक्य आहे. तुझे छंद जे काही असतील त्यांना न्याय द्यायला आत्ताच सुरूवात कर.
तुला अध्यात्म किंवा सामाजिक क्षेत्रात रस असेल तर त्यालाही थोडा वेळ देऊन बघ. खुप मज्जा येते. आता पालख्या निघतील पंढरपूरला जायला. मी दरवर्षी अर्धा दिवस त्याबरोबर चालतो. वेगळाच अनुभव असतो. आपण आपल्याला जमेल तेवढे सगळ्यात मुक्तविहार करून यावा !!
विशाल तेलंग्रे म्हणाले...

विक्रांत,

सहीच... माझ्या अशाच इच्छा आहेत, आयटीमध्ये "स्काय इज लिमिट" मुळेच मला भविष्याबद्दल अधिकच उत्सुकता आहे... अजुनही अशा अनंत अनाकलनिय गोष्टी आहेत, ज्यांच्यावर विचार करून नव-नविन इन्व्हेंशन्स घडवता येतील... शेवटी अनुभव, परिश्रम, वाचन, विचार व विश्लेषण करण्याची क्षमता इत्यादी गोष्टींचाच याकरता फायदा होऊ शकतो... KISS व ओपन सोअर्स (त्यातच उबुन्टू म्हणजे ह्युमॅनिटी) अशा संकल्पनांनी मी आधीच भारावलेलो आहे...

अध्यात्म म्हणशील, तर त्यात मी आतापर्यंत जास्त सक्रियपणे कधीच सहभागी झालेलो नाहिये, पण एक वेगळेच आत्मिक समाधान व तृप्ती लाभण्यासाठी अध्यात्माचीच गरज असते, हे मी जाणून आहे...

तुझ्या सल्ल्यांबद्दल खरंच मनःपूर्वक आभार!
अनामित म्हणाले...

जे घडताना पाहता त्या सामील होण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रश्र्नाचे उत्तर तुम्हाला शोधीत येईल.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@अनामित,

ह्म्म, हे पण योग्यच... डोळ्यांसमोर घडणार्‍या किंवा ज्या गोष्टीची चुणूक जरी लागली, तर त्याबद्दल आवश्यक ती माहिती जाणुन घेण्याची माझी पूर्वापारची सवय आहे... त्या गोष्टीला आपलंस केल्याशिवाय तीचा आस्वाद घेणं अशक्य असतं! तुमच्या सल्ल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
Bharati म्हणाले...

विशालजी ,
माणसाची बुद्धी अफाट आहे.जे जे आवडते ते सामावून घेण्याची ग्रहण करण्याची ताकद असतेच.जसे आवडीचे खाल्ले कि पोट बिघडत नाही अगदी तसेच! परीक्षेच्या काळात नि एरवी अभ्यासाची सवय असते.त्याच वेळात पुढील अभ्यासाची तोंड ओळख चालूच ठेवावी सवय मोडून न देता सुटीत आपल्या इच्छा आकाग्शा पूर्ण कराव्यात.अभ्यास करताना कंटाळा आला कि विरंगुळा असतो मग सुटीत विरंगुळा म्हणून अभ्यास ठेवला तर अभ्यासू वृत्ती टिकून त्यातील गोडी वाढून आपले ध्येय आनंदाने पार करता येते.तुमच्या सारखे बुद्धिमान तर अनेकांचे मार्गदर्शक असतात.उत्तम भाषाशैलीचा वापर करून तुम्ही अनुभव लिहिलात तर तो समजून अनेक बोध घेतील.मला वाटते कि तुम्ही तुमचा मुल स्वभाव सोडू नये...आणि तुमच्याकडून तर इंजिनियरिंगचा निकाल चांगला असावा अशी अपेक्षा का करू नये?एका वेळी दोन आघाड्यानचा यशस्वी समतोल सांभाळून दाखवत आहात नक्कीच तुम्ही सर्वःसामान्य नाही.मग अपेक्षा वाढणारच! अभ्यास सांभाळून छंद जोपासावे.
जे करायचे आहे त्याचे प्रथम नियोजन करावे आणि दिवसभर मग त्याचाच पाठ पुरावा करावा ....आपले नियोजन जे असेल ते असेल त्यात बदल मधेच (? ) नाहीच नाही.... माझे मत स्पष्ट मांडले...तुमचा ब्लोग छान वाटला अजून खूप काही वाचायचे आहे हि तर सुरुवात झाली....असेच लिहित रहां .....
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@भारती,

अगदी जे हवं होतं तेच सांगितलं तुम्ही... "मल्टि-टास्किंग" तर तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुतेकांच्या अंगरूपी असते, माझ्याही बाबतीत मी तसंच अंगिकारण्याचा (नाही तसं स्वतःला बनविण्याचा) सतत प्रयत्न करीत असतो... शेवटी माझं घोडं अडतं ते म्हणजे नियोजनाच्या बाबतीत! नियोजन तर कोणीही करू शकतो, पण त्याच्यानुसार शेवटपर्यंत स्वतःहून वागणे म्हणजे अतिशय कठिण काम... तेच आतापर्यंत मी कधीच करू शकलो नाही, टाईम-टेबल साठी एक-दीड तास मात्र व्यर्थ दवडण्याची मला "___" सवय आहे! :P

असो.. ब्लॉगवर आपले स्वागत, माझे इतर संस्थळांवरही भाषा, संस्कृती, तंत्रज्ञान आदी विषयांवर लिखान आपल्याला कधीतरी वाचनात येईलच!

~एक विनंती, मला "विशाल" संबोधनेच योग्य ठरेल! :P
linuxworld म्हणाले...

मला सुद्धा असे प्रश्न खूप वेळा पडत असतात कि आयुष्य म्हणजे फक्त नोकरी..पैसा...स्पर्धा..लग्न ...पोर.. इतकच कि ह्याही पलीकडे आणखी काही आहे.......
परंतु अशा वेळी वाचन नक्कीच मदत करते.....
"लिनक्सची पाळे-मुळे खोदण्याचं काम करतोय"
:)बेस्ट ऑफ लक.......तुम्ही ubuntu वाले आम्ही fedora वाले...हा हा..

धन्यवाद
पुष्पराज
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@पुष्पराज,

ग्रेट... मी फेडोरा ११ वापरून पाहिलीय... UI चांगला आहे... आताची लेटेस्ट रीलिज फेडोरा १३ पण मस्त आहे, उबुन्टू १०.०४ ला टक्कर देणारी... NVIDIA व्हिडियो कार्ड्ससाठी 3D सपोर्ट आहे पायथॉन ३ सोबतच मिळते (?)... असो, मी उबुन्टू सह खूष आहे, आपल्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल! लाँचपॅड/IRC/जीटॉल्क/ट्विटर यांपैकी कुठे आहात का?
linuxworld म्हणाले...

मला "पुष्पराज" म्हणत जा...मी सुद्धा तुझ्याच वयाचा आहे....खर सांगायचं तर मी सुद्धा ubuntu चा मोठा पंखा आहे परंतु पहिल्यापासून fedora बरोबर comfortable असल्यामुळे माझी मूळ os fedora च आहे....पण तरीही तुझ्यासारखा os वर अभ्यास नक्कीच नाही...actually आमचा वापर जास्तीत जास्त administration साठीच होतो त्यामुळे bugs किंवा development करायला वेळच मिळत नाही....पण तरीही वेग वेगळ्या os try करणं हा आवडता छंद...os release झाली की लगेच दुसर्या दिवशी आपल्याकडे आलीच म्हणून समजायचं आमच्याकडे lease line वर एका रात्रीत एक os सहज download होते........ubuntu,fedora,opensuse,cent os हिट लिस्ट वर आहेत...आणि virtualisation मुळे नवीन os try करायला मजा येते.....
server administration,backups,database management,LAMP, managing inhouse softwares etc. हि आमची linux वरची कामे...आणि आमची खूप मोठी IT company आहे असा गैरसमज करून घेऊ नकोस..company hotel industry शी संबधित आहे...
मी gtalk आणि facebook वर आहे...माझा gmail id : pushpraj4u@gmail.com
तुझा email-ID पण मला दे.....म्हणजे आपल्याला संपर्क ठेवता येईल......
आता हे झाल माझ्या बद्दल....तुझी एक clip youtube वर बघितली होती त्यात तुझ्या नाटकाबद्दल वाचल होत...पुढे काय झाल त्या नाटकाच???

पुष्पराज
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@पुष्पराज,

मस्त... मी सुद्धा डायल-अप वापरत असतांना देखील रोजच्या रोज सिस्टिम अपडेटेड ठेवतो, पण os च्या ६००-७००MiB आकाराच्या इमेजेस बिट-टोरण्ट (Deluge इत्यादी) द्वारे डाउनलोड करण्यासाठी मात्र मला ३-४ दिवस लागतात, त्यापेक्षा तुमच्यासारख्याच इतर काही मित्रांकडून मी मागवून घेतो... काड्या करत राहण्याचा छंद पुरवण्यासाठी काड्या करत राहतो नेहमी... असो... यापुढील चर्चा आपण जीटॉल्कवरच केलेली बरी! माझा आयडी: vishaltelangre at gmail dot com आणि माझे फेसबुक! :P
Somesh Bartakke म्हणाले...

'बि ए स्टुडंट ऑफ विसडम' !
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@सोमेश,

अगदी मान्य... स्वतंत्र व मुक्त आणि तेही प्रत्येक क्षण अविस्मरणीय रित्या जगणं म्हणजेच जीवन असावं... खूप काही शिकतोय रे दादा... :)

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre