६ ऑगस्ट...

» शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०१०

(वाचलेल्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यासाठी व अमेरिकेवरील द्वेष जाहीर करण्यासाठी म्हणून हा लेख लिहिण्याचा यथेच्छ खटाटोप!)

६ ऑगस्ट... तारीख ऐकतानाच त्या निष्पाप लक्षावधी लोकांच्या आर्त किंकाळ्या तुमच्या कानांत घुमल्या नाहीत, तर नवलच...! दुसर्‍या जागतिक महायुद्धाच्या काळात आशिया (खासकरुन चीन) व आखाती देशांमध्ये साम्यवादाची बीजे अंकुरत होती, त्याला पायबंद घालणे गरजेचे होते, शिवाय जपानचे चीनशी पार्श्व-ऐतिहासिक शत्रुत्व उघड होते, जपानसाठी योग्य संधी चालून आलेली होती. चीनला आधीच रशियाचे सहकार्य होते, त्यामुळे जपानला जर्मनीकडून यावे लागले. चीनसारख्या हत्तीसमोर एखाद्या उंदरासारख्या वाटणार्‍या जपानने कसल्याही शिल्लक मदतीशिवाय एक तृतियांश चीन काही महिन्यांतच काबीज करुन टाकला होता. या काळात जपानने आपला सर्व राग चीनवर काढला.. शेवटी जय झाल्यावर गर्व सामावलेली जयाची आणखी भूक वाढतेच... पॅसिफिक महासागरात त्यावेळी अमेरिकेचे वाढणारे वर्चस्व जपानला मुळीच पचण्यासारखे नव्हते, शिवाय पर्ल हार्बर बेटावर अमेरिकेच्या कारवायांमध्ये होत असलेली वाढ जपानसाठी धोक्याची घंटा होती. जपानने वेळीच सावध होऊन पर्ल हार्बर वर एका-पाठोपाठ आकस्मित हवाई हल्ले करुन अमेरिकेच्या तेथील सर्व युद्धसाहित्याची अक्षरशः नासाडी केली, यामध्ये अमेरिकेच्या नौदलातील सैनिकांव्यतिरिक्त शेकडो सामान्य नागरिकांचे बळी गेले. या घटनेचा अमेरिकेने तीव्र निषेध नोंदवत दोस्त राष्ट्रांच्या बाजूने दुसर्‍या महायुद्धामध्ये अचानक उडी घेतली. येथेच हिटलरची पंचाईत झाली. आता रशिया पाठोपाठ अमेरिकेसारख्या आणखी एका बलाढ्य राष्ट्राशी जर्मनी व इतर अक्ष कराराने जोडल्या गेलेल्या राष्ट्रांना कुरघोडी करणे भाग होते. तरीसुद्धा हिटलरने न डगमगता व खचून न जाता हे आव्हान पेलले व आपली विजयाची घोड-दौड चालू ठेवली.याच काळात जर्मनी, रशिया व या दोहोंच्या पाठोपाठ अमेरिकेमध्ये आण्विक प्रकल्पांना सुरुवात देखील झालेली होती. अमेरिकेच्या मॅनहॅटन प्रकल्पाने यामध्ये आघाडी घेतली. सर्वच बड्या राष्ट्रांमधील गुप्तहेर-संघटना या प्रकल्पांवर नजर ठेऊनच होत्या. शंका, लाचखोरी इत्यादी प्रकारांमुळे या प्रकल्पांमध्ये सामील असणारे अनेक मुख्य संशोधक व शास्त्रज्ञ बळी गेले. अमेरिकेला सर्वप्रथम यश मिळाले व त्यांनी चाचणी घेण्याच्या उद्देशाने म्हणा वा जपानवर आपला सूड काढायच्या हेतूने म्हणा, दिनांक ०६ ऑगस्ट, १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा या गजबजलेल्या शहरावर त्यांचा पहिला अणु-बॉम्ब टाकून स्फोट घडवून आणला. काही क्षणांतच ७० हजारांच्या जवळपास लोकं या नर-संहारक घटनेने दगावले. व त्या काळापासून आजपर्यंत नुसत्या हिरोशिमामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. किरणोत्सारी पदार्थ किती नरसंहारक असतात, याची जाणीव अमेरिकेला झालीच नाही, लगेच दिनांक ०९ ऑगस्ट,१९४५ म्हणजे लगेच दोन दिवसांनी त्यांनी जपानच्याच नागासाकी शहरावर दुसरा अणु-बॉम्ब स्फोट घडवून आणला. सुमारे १४ लक्ष निष्पाप जीव तत्काळ जीवाला मुकले व त्या प्रलयकारी भस्मासुराच्या पोटात जाऊन राख झाले. जपानने या दोन घटनांमुळे आजपर्यंत सुमारे ३० टक्के प्राणहानी नाहक सहन केलीय, आनुवांशिक दोषांचे बळी ठरलेल्यांची तर गणतीच नाही... युद्ध-काळात आण्विक-अस्त्रे वापरणारे अमेरिका हे इतिहासात पहिले राष्ट्र (व अजुनही पहिलेच आहे) ठरले. सहनशीलतेच्या पलीकडील दुःख पचवताना त्या निष्पाप लोकांच्या, निष्पाप बालकांच्या, निष्पाप महिलांच्या किंकाळ्या अजुनही घुमत आहेत. मी ऐकतोय... पुढे दुसरे-महायुद्ध संपुष्टात आल्यानंतर एकमेकांवर कुरघोडी घालण्याच्या उद्देशाने रशिया व अमेरिका यांच्यात चुरस सुरु झाली. काय हे, रशियाच्या चेर्नोबील शहरातील घटना म्हणजे नुसता हाहाकार... थोड्याश्या चुकांमुळे अख्खे चेर्नोबील उडाले... इतिहास साक्ष आहे... पण कोणीच, खास करुन अमेरिकाने या घटनांपासून काहीच व कसलाही बोध घेतल्याचे वाटत नाही. उलट आता तर आशियामध्ये रशिया व चीनला आव्हान देण्यासाठी शिवाय इरानला कमकुवत दर्शवण्यासाठी उत्तर व दक्षिण कोरिया मधील भांडणामध्ये तेल ओतण्याचे काम अमेरिकेने चालू केलेय...

बस्सं, आता एका ठिणगीची गरज आहे, क्षणार्धात अख्खी पृथ्वी भस्म होऊन जाईल!!!

7 प्रतिक्रिया:

linuxworld म्हणाले...

खरच खूप वाईट वाटत रे जपान बद्दल वाचून...पण तरीही माझ अस वयक्तिक मत आहे कि आपण पश्चिमात्य देशांचे आणि मुख्यतः अमेरिकेचे अनुकरण करण्यापेक्ष्य पूर्वीय देशांकडून शिकले पाहिजे ..ज्याप्रमाणे जपानी लोकांनी शून्यातून जपान उभा केला ते खरोखर अनुकरणीय आणि अविश्वसनीय आहे... आज जपान विकासाच्या बाबतीत खूप पुढे आहे...अगदी अमेरिकेच्या सुद्धा ......मला ह्या लोकांच खूप कौतुक वाटत...Workaholic हा प्रकार माहितेय तुला??..जपान मध्ये अधिक वेळ काम करणार्यांचे प्रमाण खूप आहे...म्हणजे हे लोक आपल्या मेह्नातीलाच सर्व काही मानतात.....आणि इथूनच तर प्रगत राष्ट्राची तयारी सुरु होते..........
विषयांतर: तुमच्या कृपेने पहिल्या व दुसर्या महायुद्धाचा (खरा..!!) इतिहास आम्हाला समजू लागला आहे....तुम्ही जर हिटलरचे पहिले कट्टर समर्थक आहात तर आमच नंबर दुसरा लागतो :)......

पुष्पराज
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@पुष्पराज,

दुसर्‍या महायुद्धानंतर प्रत्येक सहभागी राष्ट्र, मग ते जीत असो किंवा जेते, सर्वच जण "कंगाल" झाले होते. पहिल्या म्हायुद्धानंतरच्या परिस्थितीसम इतिहास पुनः दिसला. जेत्यांनी जीत राष्ट्रांवर (जर्मनी, इटली,जपान व इतर अप्रत्यक्षरित्या अक्ष-राष्ट्रांच्या बाजुने असणारी राष्ट्रे) अवजड कर लादले, सर्व शस्त्र-साठा व सुरक्षा-दलांमध्ये कपात करण्यासारखे प्रकार केले. हे सर्व असुनही, एवढ्या हालापेष्टा सहन करुनसुद्धा ही इवलीशी राष्ट्रे (अमेरिका, सोविएत रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, भारत या बड्या राष्ट्रांच्या तुलनेने) प्रत्येक क्षेत्रात फार पुढे आहेत. तू म्हणतोहेस त्याप्रमाणे जपानी लोकांकडून एकन्-एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. पाश्चात्य संस्कृती त्यांनी कधीच अवलंबलेली दिसत नाही, जरी त्यांची आर्थिक सुधारणा झाली असली तरी त्यांनी त्यांची आद्यकालीन वा पुरातन मुल्ये सदैव अंगिकारून त्यांची जपवणूक केल्याचे स्पष्ट दिसते. शिवाय, ग्लोबलायजेशनचा (म्हणजेच इंग्रजी भाषा) एवढा प्रचलित ट्रेण्ड असताना देखील त्यांनी जपानी भाषेला देखील प्रत्येक क्षेत्रात उतरवून तिला देखील जागतिक भाषेचा दर्जा प्राप्त होण्याच्या रांगेत आणून टाकलंय... त्यांनी आतापर्यंत लक्षावधी नागरिक गमावलेत, त्यामुळेच की काय, राष्ट्राला कधीच बाहेरच्यांची (आउटसोर्सिंग प्रमाणे) गरज पडू नये, यासाठी तेथील प्रत्येक नागरिक सुजानतेने राष्ट्राविषयी पक्का आदर बाळगून स्वतःच्या परीने राष्ट्राच्या उन्नतीसाठी शक्य तेवढा हातभार लावण्याचे रात्रंदिवस प्रयत्न करीत असतो...
माझ्यामते सुद्धा, जपान, युएई ही राष्ट्रे प्रत्येक ज्वलंत राष्ट्रवादी (राष्ट्रावर अतोनात प्रेम करणारा) व्यक्तीचा आदर्श असायलाच हवी!

हिटलर, शिवाजी महाराज, वि.दा. सावरकर, सुभाषचंद्र बोस अशा महापुरुषांचा संपूर्ण इतिहास समजावून घेतल्याशिवाय त्यांची महती कोणालाच कळणार नाही, त्यामुळेच की काय, वरवरची माहिती असणारे उनाड-टप्पू लोक अशा महापुरुषांची तुच्छ अपशब्दाचा वापर करुन खिल्ली उडवतांना मी पाहिलेत. शिवाय ज्यांचा आपण तिरस्कार करतो, त्यांचीदेखील संपूर्ण माहिती बाळगणे म्हणजे सुजानतेचे लक्षण होय!

आपल्यालासुद्धा भारत घडवायचाय, हे नेहमी लक्षात असू दे!

बाकी विस्तृत प्रतिक्रियेबद्दल तुझे मनःपूर्वक आभार!
Vikrant Deshmukh... म्हणाले...

जपानवर बॉंब टाकून अमेरीकेने जगाचा इतिहास आणि भुगोल पार बदलून टाकला. आजही त्यांचा माज उतरलेला नाही. आधी इराक, इराण, कोरीया.... यांना पाकडे कसे दिसत नाही हे एक आश्चर्यच आहे.
सावधान म्हणाले...

japan baabat samrath bharat vyaspith-pune yani ek chhan pustak gelyavarshi prasiddha kele aahe.tyat udwast Japanane punha kashi phinix- bharari ghetali yacha chhan varan aahe.
aso. Vishal atishay chhan lekh[Dinika] lihila aahe.
Aavadala.
NY-USA
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@विक्रांत, पुरुषोत्तम,

प्रतिसादाबद्दल दोहोंचेही मनःपूर्वक आभार! :)
अपर्णा म्हणाले...

पुष्पराज +1..
ani ho tujha itihaas ekdam pakka aahe....tujhya posts warun shikyala hoil...:)
BTW Japan baddal Avindash Dharmadhikari yancha ek bhashan aahe...kadhi aik chan aahe....
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@ अपर्णा,

तुझ्याकडे असल्यास मेल कर ना मग मला...

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre