(वाचलेल्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यासाठी व अमेरिकेवरील द्वेष जाहीर करण्यासाठी म्हणून हा लेख लिहिण्याचा यथेच्छ खटाटोप!)
६ ऑगस्ट... तारीख ऐकतानाच त्या निष्पाप लक्षावधी लोकांच्या आर्त किंकाळ्या तुमच्या कानांत घुमल्या नाहीत, तर नवलच...! दुसर्या जागतिक महायुद्धाच्या काळात आशिया (खासकरुन चीन) व आखाती देशांमध्ये साम्यवादाची बीजे अंकुरत होती, त्याला पायबंद घालणे गरजेचे होते, शिवाय जपानचे चीनशी पार्श्व-ऐतिहासिक शत्रुत्व उघड होते, जपानसाठी योग्य संधी चालून आलेली होती. चीनला आधीच रशियाचे सहकार्य होते, त्यामुळे जपानला जर्मनीकडून यावे लागले. चीनसारख्या हत्तीसमोर एखाद्या उंदरासारख्या वाटणार्या जपानने कसल्याही शिल्लक मदतीशिवाय एक तृतियांश चीन काही महिन्यांतच काबीज करुन टाकला होता. या काळात जपानने आपला सर्व राग चीनवर काढला.. शेवटी जय झाल्यावर गर्व सामावलेली जयाची आणखी भूक वाढतेच... पॅसिफिक महासागरात त्यावेळी अमेरिकेचे वाढणारे वर्चस्व जपानला मुळीच पचण्यासारखे नव्हते, शिवाय पर्ल हार्बर बेटावर अमेरिकेच्या कारवायांमध्ये होत असलेली वाढ जपानसाठी धोक्याची घंटा होती. जपानने वेळीच सावध होऊन पर्ल हार्बर वर एका-पाठोपाठ आकस्मित हवाई हल्ले करुन अमेरिकेच्या तेथील सर्व युद्धसाहित्याची अक्षरशः नासाडी केली, यामध्ये अमेरिकेच्या नौदलातील सैनिकांव्यतिरिक्त शेकडो सामान्य नागरिकांचे बळी गेले. या घटनेचा अमेरिकेने तीव्र निषेध नोंदवत दोस्त राष्ट्रांच्या बाजूने दुसर्या महायुद्धामध्ये अचानक उडी घेतली. येथेच हिटलरची पंचाईत झाली. आता रशिया पाठोपाठ अमेरिकेसारख्या आणखी एका बलाढ्य राष्ट्राशी जर्मनी व इतर अक्ष कराराने जोडल्या गेलेल्या राष्ट्रांना कुरघोडी करणे भाग होते. तरीसुद्धा हिटलरने न डगमगता व खचून न जाता हे आव्हान पेलले व आपली विजयाची घोड-दौड चालू ठेवली.
स्मृती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
स्मृती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
स्वगृह » स्मृती
२००४ च्या त्सुनामीचा सगळ्यांना विसर पडला की काय??

परवा रात्री थोडाफार अभ्यास केल्यानंतर टिव्ही पाहत होतो... नेहमीप्रमाणे बातम्यांचे चॅनेल्स अन मग डिस्कव्हरी, नॅट जिओ अशी सर्फिंग चालू केली... बाकी कोणत्याच चॅनेलांवर बोअर प्रोग्रॅम्स चालू हो्ते, म्हणून डिस्कव्हरीवर ट्यून केलं.. सर्वात पहिले तर नेमकं कळालं नाही की चालू असणारी डॉक्युमेण्ट्री फिल्म कोणत्या विषयावर आहे ते... पण हळू-हळू कळायला लागलं. दि. २६ डिसेंबर, २००४ ची ती काळी पहाट, ’अ’पासून ’ज्ञ’पर्यंत सर्व माहिती बघितली, फक्त डिस्कव्हरी अन नॅट जिओवर... नाताळाच्या अन ३१st च्या रंगात लोक आनंदात होते, पण सुमात्रा बेटांजवळ झालेल्या टेक्टॉनिक प्लेटांच्या ओव्हरलॅपिंगमुळे व त्यामूळे निर्माण झालेल्या भूकंपामुळे (सलग ७ मिनिटे चालला होता हा भूकंप - रिश्टर स्केलवर याची तिव्रता ९.५ एवढी मोजली गेली होती...!), हिंदी महासागरात सुमारे १६०० किमी एवढा भुखंड चिरत गेला.... अन त्यामूळे निर्माण झालेल्या ९ ते १० मजली इमारतींएवढ्या उंच लाटांनी लाखो लोकांचे प्राण घेतले...
दोन्ही चॅनेलांवर यावरील डॉक्युमेण्ट्री फिल्म्स रात्री ९ ते ११ (दोन तास) चालू होत्या, पण कुठलेच न्युज चॅनेल, मराठी, हिंदी, इंग्रजी, किंवा अन्य कोणतेही... कूठेच याविषयी "ब्र"सुद्धा बघायला तर सोडाच, ऐकायलाही मिळाला नाही... घटना आपल्या देशाला शोककळेत लोटणारी होती, पण आपले हे न्युज चॅनेल्स... जरा तरी लाज वाटायला हवी यांना... स्मृती पाळणं किंवा जनतेला त्याची जाणीव करून देणं हे यांचं कर्तव्य असतं, पण त्यांना त्या गोष्टीचा विसर पडलायं कि काय, असा प्रश्न उपस्थित होतो... अन बिचारे, बाहेरील चॅनेल्स (डिस्कव्हरी अन नॅशनल जिओग्राफिक) यांनी यासाठी एवढे कष्ट घेऊन सविस्तरपणे डॉक्युमेण्ट्री फिल्म बनवावी... जास्त काही संबंध नसतांनाही... आतातरी आपल्या मिडियाने या चॅनेलांपासून काहीतरी शिकावे, असे मला वाटते... शेवटी हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या भावनेशी निगडित आहे...
मला त्यावेळी(त्सुनामी आली होती, त्यावेळी) जास्त समज नव्हती, कारण मी तेव्हा त्यामानाने लहान होतो अन आमच्याकडे लाईव्ह न्युज बघायला टिव्ही पण नव्हती... म्हणून मलाही आठवण राहिली नाही... आता उशिरा का होईना, पण आपण सर्वजण मिळून त्यात अनामिकपणे मेलेल्या लाखो जीवांना श्रद्धांजली अर्पण करू...
जय हिंद...

Blogger द्वारे प्रायोजित.