भुंग्या दादाच्या ब्लॉगवर हल्ली खुपच पुस्तके डाऊनलोड करण्यास मिळत आहेत, पण ती सर्व .PDF या एक्स्टेंशन मध्ये असतात. माझ्या बहुतेक ब्लॉगर्स मित्र अन मैत्रिणींना तसेच वाचकांना असा प्रश्न पडला असेल की, हा भुंग्या ही पुस्तके बनवतो तरी कशी?? त्याचेच एक अतिशय सोपे उत्तर मी तुम्हाला या लेखात सांगतो आहे!
तुम्ही कधी ओपन सोअर्स सॉफ्टवेअर्स बद्दल ऐकले आहे का? जाऊ द्या, नका टेन्शन घेऊ! मी सध्या उबुन्टू ९.१ ही लिनक्सची ऑपरेटिंग सिस्टीम वापरत आहे. आणि हे तर सर्वांना माहित असेलच की लिनक्स (लायनक्स?) ही ओपन सोअर्स अणि मोफत मिळणारी ऑपरेटिंग सिस्टीम आहे! त्यात अगोदरच "ओपन ऑफिस.ऑर्ग" हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखे सॉफ्टवेअर पॅकेज मिळते. विन्डोजच्या सर्व फ्लेवर्ससाठी(विन्डोज एनटी, २०००, एक्सपी, व्हिस्टा, सेव्हन..) साठीही हे ऑफिस पॅकेज अगदी मोफत उपलब्ध आहे.
"ओपन ऑफिस डॉट ओआरजी" ला येथून डाऊनलोड करा.
या पॅकेजमध्ये तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिस सेव्हन प्रमाणे सर्व महत्वाचे टुल्स मिळतील, जसे की वर्ड प्रोसेसर, स्प्रेडशीट टूल, मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन रायटर, पॉवरपॉईंट स्लाईड मेकर आणि आणखी भरपूर काही...
PDF डॉक्युमेण्ट तयार करण्यासाठी "Export Directly as PDF" हे बटन दाबा. |
तर मग लगेच डाउनलोड करा, आणि तुमच्या सर्व डॉक्युमेण्ट्सच्या (कसलेही!) PDF प्रती तयार करून शेअर करा, लोकांना डाउनलोड करण्यास द्या...
आणि हो, मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा वापर करण्याची तुम्हाला नंतर मुळीच गरज भासणार नाही, अशी माझी पक्की खात्री आहे!
अरे हो, एक सांगायचे राहूनच गेले, भुंग्या दादा PDF डॉक्युमेण्ट्स तयार करण्यासाठी जीडॉक क्रीएटर हे सॉफ्टवेअर वापरतो, तुम्हाला इच्छा असेल तर हेही वापरून बघा, पण यात नुसतं PDF तयार केले जातील, पण ओपन ऑफिस डॉट ओआरजी प्रमाणे सर्व सुविधांचा लाभ मात्र घेता येणार नाही!! ;)
काही अडचणी असतील, तर त्या खाली टाका, प्रतिक्रिया म्हणून...!!!
जय हिंद, जय महाराष्ट्र!
16 प्रतिक्रिया:
हे ओपनऑफिस मराठीतही उपलब्ध आहे... अगदी मराठी डिक्शनरीसहित... त्यावरही लिही!
@आल्हाद, हो नक्कीच, मराठीत उपलब्ध असलेल्या ओपन ऑफिसची लिंक व त्याला हाताळण्यासंबंधीची माहिती मी लिहिन पुढे कधी तरी! बहुतेक फ्री सोअर्स आप्लिकेशन्स (मग ती ऑपरेटिंग सिस्टीम का असेना!) मराठीत उपलब्ध आहेत. पण हे मराठीत उपलब्ध असलेले आप्लिकेशन्स पहिले-पहिले वापरायला खुप अवघड जातात. मी फायरफॉक्स अजुनही मराठीत वापरतो, पण गीम्प आणि उबुन्टू हे मराठीतून वापरायला मला खुप त्रास झाला, कारण सर्वच शब्दांचे मराठीत अर्थ माहित नव्हते आणि काही ठिकाणी तर काहीपण लिहून ठेवले होते (भाषांतर करणार्याने, जसे की तुम्ही मराठी वर्डप्रेसवर हल्ली पाहत असाल!) व्याकरणाच्या चुका तर भरपूर असतात!
बाय द वे, प्रतिसाद नोंदविल्याबद्दल आभार!
एकदम सही माहिती आहे रे.. माझ्याकडे पण ओपन-ऑफिसच आहे पण हे pdf बद्दल माहित नव्हतं..
@हेरंब, ही गोष्ट म्हणजे अगदी "काखेत कळसा, अन गावाला वळसा" सारखीच झाली म्हणा की... हाय ना!!! ;)
उपयुक्त माहिती धन्यवाद
ही माहिती खूप छान आहे. ओपन ऑफीस हा प्रकार माहित नाही. वापरून पाहिन. माझ्याकडे वर्ड फाईलला सेव्ह ऍज केलं पी.डी.एफ. बनवता येते म्हणून मला हे जाणून घ्यायचं होतं की ओपन ऑफिस आवश्यक आहे का? म्हणजे क्वालिटीमधे फरक बिरक असं... शिवाय आल्हाद महाबळांनी लिहिल्याप्रमाणे तू आणखी माहिती दिलीस तर बरं होईल.
@कांचन ताई, नक्कीच, मी अधिक माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन!
प्रतिसाद नोंदविल्याबद्दल आभार!
do not change ur banner it`s beautiful & attractive
Adobe Acrobat 9 Standard cha vapar karu shakto kay ?
@प्रितेश, माझ्या माहितीनुसार तरी नाही, कारण ऍडोब ही एक इनकॉर्पोरेटेड कंपनी आहे. कंपनीच्या अधिपत्याखाली बनवली गेलेली बहुतेक सॉफ्टवेअर्ससंबंधित सर्वाधिकार कंपनीने स्वतःकडे राखून ठेवले आहेत. ऍडोब ऍक्रोबॅट रीडर (एक प्रकारचे सर्वात लोकप्रिय पीडीएफ रीडर) हे सॉफ्टवेअर कंपनीने फक्त पीडीएफ एक्स्टेन्शन असलेल्या फाईल्स वाचण्याकरिताच पब्लिकली मोफत पुरविलेले आहे. पण या सॉफ्टवेअरद्वारे वापरकर्त्याने पीडीएफ फाईल्स तयार करण्याची सोय मात्र कंपनीने देऊ केलेली नाहिये. यामागचे एक स्पष्ट कारण हे, ते म्हणजे .PDF हे एक्स्टेन्शन असलेल्या फाईल्स तयार करण्यासाठी विशिष्ट कायदे आहेत, त्यामुळे त्या फाईल्स कोणीही बेकायदेशिर तयार करू नयेत, म्हणून अशी सॉफ्टवेअर्स या सोयी (पब्लिकली) उपलब्ध करून देत नाहीत. इंटरनेटवर तुम्हाला अनेक पीडीएफ क्रिएटर्स मिळतील, फुकटात तर कोणीच अमर्याद व सोयींनी लेस असे सॉफ्टवेअर देणार नाहीत, विकत घेतले तरी त्यातही अनेक गोष्टी कमी प्रमाणात मिळतात, कारण तसे स्ट्रिक्ट लिगल कायदे आहेत. जीडॉक क्रीएटर तसेच ओपनऑफिस.ऑर्ग हे पॅकेजेस ओपन सोअर्स कोड तसेच फ्री सॉफ्टवेअर फेडरेशन (FSF) च्या अंतर्गत येतात, वैयक्तिक वापरासाठी तुम्हाला लेखात सांगितल्याप्रमाणे सर्व सुविधा मिळतील. पण जर तुम्हाला व्यवसायाशी निगडित कामांसाठी या पॅकेजेसचा वापर करणार असाल तर मात्र तुम्हाला पॅकेज देऊ करणार्या रीपॉजिटरीकडून ऑथरायजेशन मिळवावे लागते(व्यावसायिक काम असल्याने पैसे तर मोजावे लागणारच!)...
मला वाटते, तुमची शंका दूर झाली असणार.. आणखी काही प्रश्न असतील तर बिनधास्त विचारू शकता.
विशल्या, जबरदस्त रे . मी हे करुन बघितल "It Works"
अरे उबुन्तुच्या फ़ोरुमवर सुध्हा यांची माहीती दीलेली नाही Thanks
tumhi mala PDF file edit kashi karata yeil tyavishayi mahiti sanga
वरील प्रतिसादाला अनुसरून,
पीडीएफ फाइल ही घोस्टस्क्रिप्टमध्ये अनवादित केलेली असते. खालील दुव्यावरील एक्स्टेंशन उतरवून घेऊन ते तुमच्या ओपन ऑफिसला जोडून घ्या आणि त्यानंतर कुठलेही पीडीएफ डॉक्युमेंट आयात करुन त्यात हवे ते बदल करू शकण्यास तुम्ही समर्थ असाल. अधिक माहिती तेथे उपलब्ध आहेच.
(टीप: या सुविधेत (La)TeX सध्या समर्थनीय नाही.)
एक्स्टेंशनसाठीचा दुवा: Oracle PDF Import Extension
खुप छान माहिती आहे
माहिती सचित्र किंवा vdo सह सविस्तर असावी
घोस्टस्क्रिप्ट काय आहे ?
टिप्पणी पोस्ट करा
»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.
मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!
लिहिण्या आगोदर, मराठी लिखाण चालु - बंद करा!
टिप्पणी देण्यासाठी, वरती लिहिलेले लिखाण खालच्या बॉक्समध्ये कॉपी-पेस्ट करा.