गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

» मंगळवार, १६ मार्च, २०१०


आधी वंदूया लंबोदरा, नमुया प्रभाती दिनकरा
सर्वधारीनाम संवत्सरा, शुभारंभ नववर्षजागरा !
जुन्यातले नवे ठेवुन,सर्वांगी नवपालवी लेऊन
नव्याची ओढ सनातन, पुरवो हे वर्ष नूतन !
साडेतीन मुहुर्तांपैकी एक, गुढीपाडवा सण सुरेख
या मंगलदिनी काही एक, शुभकार्य अवश्य करावे..
येत्या वर्षी नवीन घडूद्या , टाकाऊ ते सारे झडू द्या
मंगलवार्ता कानी पडूद्या , गुढी यशाची नवी चढू द्या.
नववर्षी इतिहास घडवा, कर्तॄत्त्वाचे इमले चढवा
माणसांतले मैत्र वाढवा- सुरुवात आजच...गुढीपाडवा !

12 प्रतिक्रिया:

विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

हिंदू नविन वर्षदिनाच्या माझ्यातर्फे तूम्हाला आणि तुमच्या कुटूंबीयांना अतिशय मन:पूर्वक शुभेच्छा...
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@विक्रम, धन्यवाद, तुलाही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Yogesh म्हणाले...

या शुभ मुहूर्तावर सारी दुःख विसरून, प्रेमाची गुढी उभारूया!!
हे नववर्ष आपणा सर्वांस सुख समृद्धी, यशाचे व भरभराटीचे जावो
आनंद पत्रे म्हणाले...

नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा तुला विशाल....
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@मनमौजी, आभार.. आपणासही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
रोहन... म्हणाले...

चला धरु रिंगण... गुढी उभी उंचावुन ... हिंदू नववर्षदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ... !
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@आनंद, ह्म्म, तुलाही नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@रोहन, हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
veerendra म्हणाले...

विशाल तुला व परिवारास हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ..
ब्लॉग वर गुढी उभारायचे एक विजेत केले आहे.माझ्या ब्लॉगवर त्याची पोस्ट आहे.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@वीरेंद्र, धन्यवाद.. तुम्हालाही नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

ते गुढीचे विझेट मी "सुरूवात..." वर लवकरच जोडण्याचा प्रयत्न करतो..
Santosh Gosavi म्हणाले...

चैत्राची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नांची नवी वाट
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Santosh Gosavi म्हणाले...

चैत्राची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नांची नवी वाट
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre