माईंडमॅप स्पष्ट दिसण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
वरील माईंडमॅपच्या आधारे तुम्हाला मिळालेला एखादा कोणत्याही विषयाशी संबंधित असणारा प्रोजेक्ट (उदा. एखादा ब्लॉग किंवा संस्थळ!) कसा तयार करावा याचा अंदाज आला असेलच, तरीही त्याबद्दल मी आणखी डिप मध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करतो...
पायरी १: तयार रहा!
तुम्हाला ज्या विषयाबद्दल नेहमी भिती वाटते, त्याच विषयाशी संबंधित एखादा प्रोजेक्ट तयार करावयास मिळू शकतो, त्यामुळे कसलिही भिती न बाळगता, तयार रहा!पायरी २: लक्षपूर्वक ऐका!
तुम्हाला मिळत असलेल्या प्रोजेक्ट बद्दल माहिती सांगणार्या शिक्षक/अधिकारी/बॉसचा एकन्-एक शब्द काळजीपूर्वक ऐका. यावेळीच तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टबद्दल सर्व काही माहिती मिळू शकते. काही अडचणी असतील (तांत्रिक/वैयक्तिक) तर त्या त्यांना विचारून लगेच दूर करण्याचा प्रयत्न करा.पायरी ३: आवश्यक माहिती टिपून ठेवा.
पायरी २ मध्ये तुम्ही ऐकत/पाहत असलेली सर्व आवश्यक माहिती टिपण्याचा प्रयत्न करा. याच माहितीचा तुम्हाला नंतर खुप फायदा होऊ शकतो.पायरी ४: माहिती नोंदवतांना the, a सारखे बिनकामीचे शब्द सोडून द्या!
पायरी ३ मध्ये माहिती टिपत असतांना the, a सारखे शब्द सोडून दिले तरी चालतील. शिवाय काही शब्द शॉर्ट करून (उदा. definition लिहिण्यापेक्षा def n असे) लिहिण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला माहिती टिपतांना कमी वेळ लागेल, व जास्तीत-जास्त माहिती टिपता येईल!पायरी ५: मिळवलेली माहिती बरोबर आणि अद्ययावत आहे की नाही हे तपासा.
मिळालेल्या प्रोजेक्टसाठी तुम्ही जमा केलेली माहिती ही योग्य आणि अप टू डेट आहे की नाही हे तपासा. यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षक/अधिकार्याशी सुद्धा सल्ला-मसलत करू शकता!पायरी ६: सर्व माहिती मिळाल्यानंतर ती एकत्र करून तीचा व्यवस्थित अभ्यास करा.
प्रोजेक्टसाठी लागणारी सर्व आवश्यक माहिती गोळा केल्यानंतर ती पद्धतशीर लावणेही तेवढेच गरजेचे आहे. त्या माहितीचा मग कसून अभ्यास करा.पायरी ७: अभ्यास केल्यानंतर त्या माहितीच्या आधारे प्रोजेक्टचा नमुना आराखडा तयार करा.
पायरी ६ मध्ये तुम्ही एकत्रित केलेल्या माहितीचा चांगला अभ्यास केल्यानंतर त्याआधारे तुमच्या प्रोजेक्टचा एक छानसा नमुना आराखडा (लेआउट) तयार करा आणि त्यावर तुमच्या ग्रुप मेंबर्सचे काय मत आहे, ते जाणून तो आराखडा फायनल करा.पायरी ८: आराखड्याच्या साह्याने प्रोजेक्ट साठी लागणारे साहित्य मिळवा.
आता तुम्ही प्रोजेक्टचा आराखडा बनवला आहात, त्यामुळे तुम्हाला त्या आराखड्यामध्ये नमूद केलेल्या गोष्टींची गरज पडेल, त्यांची जमवा-जमव करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तत्सम क्षेत्रातील जाणकार व्यक्तींची मदत घ्या.पायरी ९: ग्रुप-प्रोजेक्ट असल्यास आपापली कामे वाटून घ्या.
तुम्ही प्रोजेक्ट जर ग्रुपमध्ये तयार करत असाल, तर कसलाही संशय, द्वेष वा मत्सर किंवा कमीपणा न बाळगता सर्व कामे सर्व ग्रुप-सदस्यांमध्ये सारखी वाटून घ्या.पायरी १०: वेळेचे नियोजन करा.
प्रोजेक्टसाठी दररोज किती वेळ खर्च करायचा, यासाठी वेळेचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे, नाहीतर विनाकारण तुमचा अमूल्य वेळ खर्ची होईल, शिवाय प्रोजेक्टसाठीचे कामे पण योग्य वेळेत पूर्ण होणार नाहीत.पायरी ११: मिळालेले काम मन लावून करा.
आधी सांगितल्याप्रमाणे कसलाही कमीपणा वाटू न देता, वाट्याला आलेले काम मन लावून करा. शेवटी तुमच्या अथक परिश्रमाचे फळ तुम्हाला नंतर नक्कीच मिळेल! थिंक बी पॉसिटिव्ह!पायरी १२: वेळेच्या आत प्रोजेक्टवरील काम संपवून तो सबमिट करा!
प्रोजेक्ट सबमिशनची डेडलाईन यायच्या आत प्रोजेक्टवरील सर्व कामे संपवून तो सबमिट करा. यामुळे तुमचे शिक्षक/अधिकारी/बॉस तुमच्यावर अतिशय खुष होण्याचे बरेचसे चान्सेस असतात! ******************************
तर मित्रहो, कसा वाटला हा माईंड मॅप मग?
5 प्रतिक्रिया:
विशल्या, सुंदरच लिहिले आहेस रे... असा प्रोजेक्ट नक्कीच सक्सेसफुल रहाणार.. शुभेच्छा!
मस्तच रे, माईन्ड मॅपच्या जगात स्वागत असो. काम झकास झालय.
- मुख्य मुद्दे कमीत कमी शब्दात लिहिणे आणि समरी/नोट्स चा वापर करून विस्तार करणे.
एका ब्लॉगवर माइंड मॅप पाहिला होता...अगदी मुद्देसुद लिहिलंस...तुमचा प्रोजेक्ट एकदम सक्सेसफ़ुल झाला असेल यात शंका नाही..
@आनंद, @अपर्णा,
प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला म्हणूनच तर ही पोस्ट लिव्हली ना मी..!
**********
@सोमेश दादा,
हम्म, पुढील वेळी समरी/नोट्स पण वापरून पाहीन...
**********
प्रतिसादांबद्दल आभार!
Hi Vishal. Tujha ha lekh mala khup avadla. Me Pranav Joshi. Netbhet hya blogvar lihito. Aamhi dar mahinyat 1 e magazine pan release karto. Tyach sandarbat thode savistar bolaiche hote. Can you provide me with your e mail id. Mine is pranav@netbhet.com
टिप्पणी पोस्ट करा
»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.
मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!
लिहिण्या आगोदर, मराठी लिखाण चालु - बंद करा!
टिप्पणी देण्यासाठी, वरती लिहिलेले लिखाण खालच्या बॉक्समध्ये कॉपी-पेस्ट करा.