पद्म लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पद्म लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

"पद्म"ला ग्रहण...

» शनिवार, ३० जानेवारी, २०१०

कालच मंगेश पाडगावकरांनी संगमनेरमध्ये अशी खंत व्यक्त केली की, त्यांच्यासारख्या ज्येष्ठ कलावंतांना अजून कसं "पद्म" पुरस्कारांपासून डावललं जातं ते... असो. त्यांना अश्या पुरस्कारांची गरज नाही, हे सांगून त्यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवला.

संत चटवाल सारख्या एनाआरआय उद्योगपतीला (मोठ-मोठाली हॉटेलं आहेत त्याची विदेशात..), जो मागेच बॅंकेतील ९० लाख डॉलर्सची गफलत करण्याच्या गुन्ह्यामुळे तुरूंगवास भोगून आला आहे. त्याचं मागेच वक्तव्य आलं होतं की भारतात पण तो काही हॉटेलं काढणार आहे म्हणे.. त्याला खुष करण्याच्या नांदात तर त्याला "पद्म" दिला गेला नाही ना, अशी तीव्र नाराजी समाजाच्या प्रत्येक वर्गातून तसेच इंटरनेटवरील ट्विटरसारख्या सोशल साईट्सवर व काही ब्लॉग्जवर लोकांनी जाहीर केलेली दिसतेय... तसेच सैफ अली खान, लोकप्रिय आहे पण अजून तशी लायकी नसलेला अन सध्या सिनेमांमध्ये बिभत्स कृत्ये करणारा माणूस "पद्म"चा हक्कदार कसा होऊ शकतो याबद्दलही तीव्र साशंकता आहे.

मंगेश पाडगावकर, वि.दा. करंदीकर (ज्येष्ठ कवी), डॉ. श्रीराम लागू, अशोक सराफ (ज्येष्ठ अभिनेते) आणि अश्याच प्रत्येक क्षेत्रातील काही नामवंत व्यक्तींना अजूनही "पद्म"ने गौरवण्यात आलेले नाही.. याचं मला तीव्र दुःख आहे.. "पद्म" पुरस्कार प्रक्रियेवर गालबोट लागलंय, अन या पुरस्कारांवरून माझा समुळ विश्वासच उडालाय हे नक्की... शेवटी जो माणूस त्या-त्या क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अहोरात्र जगला, अन कष्टाचे चीज केले, त्याला त्याचे मानधन अन गौरव मिळत नसेल तर अश्या पुरस्कारांची नेमकी गरजच काय???
Vishal Telangre