परिक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
परिक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ऐसे दिस जाती...

» शुक्रवार, ११ जून, २०१०

काही प्रश्न आहेत:

नुकत्याच परिक्षा संपल्या... महिनाभरापासून नुसतं टेन्शन होतं परिक्षेचे... झाल्या एकदाच्या! असो... प्रत्येक वेळी नव-नविन अनुभव मिळताहेत, अनेकांकडून मोलाचे सल्ले मिळताहेत, त्यांचा मला पुढे नक्कीच फायदा होईल, यात शंका नाही... पण हाच मार्ग योग्य आहे का जगण्याचा, शिकण्याचा, अनुभव मिळवण्याचा, आणि दररोज दिवस (वाया) घालवण्याचा?

मला इंजिनिअरिंगला अजुन दोन वर्षे जायची आहेत, तोपर्यंत मला माझ्या फिल्डमधले आवश्यक तेवढे ज्ञान प्राप्त होईल खरे, पण ते तेवढेच असावे की मी माझ्या इच्छा-आकांक्षा अजून उंचावून इतरही अनेक गोष्टींवर लक्ष द्यायला हवे? तुम्हा लोकांचे जीवन दररोजचे रेग्युलर ऑफिस, नोकरी, घरकामे इत्यादी एवढ्यावरच थांबते का, की तुम्ही त्यात रंग भरण्यासाठी अजुन काही करता?

माझा ह्या लेखात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा सारांश एवढाच आहे, की हे जे दिवस जाताहेत, ते असेच जाऊ द्यावेत का?

सल्ले, अनुभव, आणि मला व माझ्यासारख्या इतरांना उपयोगी ठरतील अशा प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत...

एक्जाम्स...

» शुक्रवार, २ एप्रिल, २०१०

बहुदा याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माझे चौथ्या सेमिस्टरचे पेपर चालू होतील... कित्येक दिवसांपासून ब्लॉगवर काहीच लेखन केलेले नाही, त्यामुळे मलाही बोर होतंय, पण माझा एक सबजेक्ट बॅक आहे आणि तुम्हाला तर माहित असेलच की इंजिनिअरिंगला अभ्यास, मुले पी.एल. च्या सुट्ट्यामंध्येच करतात म्हणून... सेम हिअर टू..! चौथ्या सेमच्या कोणत्याच विषयाचा अजुन अभ्यास मी चालू केलेला नाहीये, पण आता करावा लागेल. शिवाय प्रोजेक्ट्स, असाइनमेण्ट्स, प्रॅक्टिकल्स, इत्यादींच्या सबमिशनची डेट लाईन पण काही दिवसांवरच आहे!!!

असो... मी अभ्यासाला लागतोय आता... नेटवर ऑनलाईन तर मी असतोच तसा, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट आणि बझ वरही...!!! पण ब्लॉगवर नविन लेख लिहू शकण्याची शक्यता कमी आहे!

मराठी मंडळी, टेक मराठी या संस्थळांवर थोडेफार लेखन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे काही दिवसांत.. परिक्षा झाल्यानंतर तर तेच कामं आहेत म्हणा..!
Vishal Telangre