मी शिवाजीराजे भोसले बोलतोय...!

» शनिवार, ४ जुलै, २००९


सुखविंदर सिंगचे "हे राजे" व रक्त खवळवणारा पोवाडा या रोमांचकारी गोष्टींमुळे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ची महती सहज सोप्या शब्दांत सांगणं माझ्यासारख्याला तर जमायचं नाही, तरी तुमच्यासाठी म्हणून या चित्रपटाचे स्तुतिगाण तुम्हाला सांगतो.(समजलं तर आवडेल).

तर महेश मांजरेकरांचा व एरोस इंटरनॅशनलचा पहिला वहिला मराठी बिग बजेट चित्रपट रिलिज झाल्याच्या पहिल्या खेळापासून रोज हाऊसफुल आहे व राहिल यात तिळमात्र शंका असण्याचे कारण नाही.

सचिन खेडेकरची दिनानाथ भोसले या दुबळ्या माणसाची भुमिका बिग स्ट्रेंजच म्हणावे लागेल.(13B नंतर तसा खुप भाव आलाय त्यांना...) जाऊ द्या, सिद्धार्थ जाधवची ऊस्मान पारकर, तसेच शिवाजी राजांचे सहकारी असलेले मकरंद अनासपुरे यांची पोट धरून हसवणारी कॉमेडी आणि भरत जाधवचा अफजल खाँ व शिवाजी राजांच्या भेटीवरील पोवाडा यामुळे बोअर होण्याचा चान्सच नाही...

शिवरायांचे "...वीर दौडले सात, फक्त सातच का? बाकिचे कुठे गेले?" हे डायलॉग्ज ऐकुन मराठीपणाची भावना त्वेषाने जागी होते.

हो पण एक सांगायचे राहिले की या चित्रपटात जात-पात, वर्ण-भेद, परप्रांतियांवर टीका इत्यादि कुठेही दिसले नाही वा वाटले नाही, त्यामुळे चित्रपटात आक्षेपार्य असा कोणताही सीन नाही त्यामुळे चित्रपटाचा विरोध बिल्कुल झाला नाही हे चांगले!

हो पण चित्रपटात जे महाराष्ट्र सोडून जाऊन मराठीला धरून राहिले (जसे विक्रम पंडित, सिटी बँकेचे सिईओ) व जे मराठीला विसरले (जसे दक्षिण भारतिय चित्रपटांचे सुपरहिरो रजनिकांत ज्यांचे मुळ नाव शिवाजीराव गायकवाड आहे) यांच्यातील मराठेपण दाखविण्याचा प्रयत्न मांजरेकरांनी केल्याचे दिसते.

जाऊ दे, हा झाला चित्रपटाचा भाग आता तुम्हाला आमची गंम्मत सांगतो, मी आणि माझा मित्र दिपक दोघे औरंगाबादच्या गोल्डि चित्रपटगृहात हा चित्रपट पाहायला गेलो होतो, तो पण फर्स्ट शो आणि बाल्कनि, एकदम मस्त! नंतर आम्ही थिएटरमध्ये गेल्यानंतर चकितच झालो ना! अहो आमच्या पुढच्या रोमध्ये चक्क फॉरेनर कपल होते, विचारपूस केल्यानंतर ते सॅनफ्रॅन्सिस्कोचे आहे व भारतातील किल्ले व लेण्या पाहायला आल्याचे कळाले. त्यांनी चित्रपट संपल्यानंतर चित्रपटाला हॉलिवुड फिल्म लाईक एक्शन मुवि म्हणुन चित्रपटाचे नाव इंग्रजीमध्ये आमच्याकडून लिहून घेतले.
आणखी मजा नंतर चित्रपट चालु झाल्यानंतर आली, झाले काय आम्ही बसलो होतो तेथे ना एसीची ना पंख्याची हवा! गरमीने किती बेहाल झालो होतो म्हणून सांगू!
अजुन दुसरा प्रॉब्लेम, आवाज एवढा कमी आणि तो पण बाल्कनिमध्ये आतापर्यंत मी कधिच अनुभवला नव्हता! Bassच नव्हता हो...


छे सोडा, जेव्हा शिवाजी महाराजांची पहिली एन्ट्री झाली, तेव्हा पुर्ण थिएटर "जय भवानी, जय शिवाजी" सारख्या जयघोषांनी दणदणून गेले, मजा अशी की थिएटरमध्ये कामाला असलेले दोन तीन उत्तर भारतिय मध्ये येऊन लोकांना शांत करायला लागले तेव्हा लोकांनी अजुन जयघोष केला, कंटाळून ते परत गेले, नंतर मात्र त्या टॉकिजवाल्यांची दाणादाण ऊडाली, पहिल्याच भागात ३ वेळा व दुसऱ्‍या भागात २ वेळा विजप्रवाह बंद पडल्याने प्रेक्षकांनी (मी सुद्धा) त्यांना वेठिस धरले, काय हालत झाली होती त्यांची...
बरं, हो आणि अजुन इंटरमिशनमध्ये आम्ही दोन कोक घ्यायला गेलो, तिथल्या माणसाला पण मराठी येत नसावी बहुतेक! लोकं आणि आम्ही त्याला फक्त मराठीतच बोलत होतो, न कळाल्यामुळे तो नुसता हुँ.. हुँ.. करत होता पण तो नंतर रागाने पाहायला लागला तेव्हा लोकांनी जोरात तेथे पण घोषणाबाजी चालु केली, बिचाऱ्‍याने आपला राग आवरला व सौम्य स्वभाव करत काम करू लागला. याला म्हणतात,

"॥शिवाजी इफेक्ट॥"

जेव्हा एखादा परकिय जर आपल्याच स्वातंत्र्यावर घाणा घालत असेल तर मराठीपणाचा चेव येण्याची मराठी माणसाची तयारी पाहिजे तरच तो पुढे जाऊ शकतो... नाही तर "मराठी पाऊल पडते पुढे" नव्हे तर "मागे" म्हणायची वेळ येईल, ही या चित्रपटाची संकल्पना, कथा, सारांश आणि संदेश आहे. तसे भरपूर शिकण्यासारखे आहे फिल्ममध्ये, पाहिल्याशिवाय काय कळणार हो? तसा टॅक्स फ्रि च आहे ना मग!

परत मी कधी सिंगल स्क्रिन मध्ये चित्रपट पाहणार नाही, मल्टिप्लेक्सचं बरे आहेत, हो कि नाही?


आगामी सिद्धार्थ जाधवच्या प्रमुख भूमिकेत असलेला व अकरा हनुमानांचे दर्शन घडवणारा "हुप्पा हुय्या" ला माझ्या हार्दिक शुभेच्छा.



प्लिज प्रतिक्रिया कळवा.



||जय महाराष्ट्र||

(Thursday, April 9, २००९)

0 प्रतिक्रिया:

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre