स्वगृह » संबोधन » १ मे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
१ मे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लेखक: विशाल तेलंग्रे » शनिवार, ४ जुलै, २००९टॅग्ज: महाराष्ट्र, संबोधन
जय महाराष्ट्र मित्रांनो...!
आगामी १ मे दिनाच्या आपणा सर्व मराठी बाधवांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी म्हणून हा लेख लिहित आहे.
दरवर्षी आपण शिवजयंती (१ नाही तर ३ वेळा) अगदी धुमधामात साजरी करतो, पण महाराष्ट्र दिनाच्या दिवशी असे काहीच वातावरण दिसत नाही, ना जास्त काही कार्यक्रम योजिले असतात, ना काही समारंभ असतात.
जाऊ द्या, माझ्यामते यंदा तरी महाराष्ट्र दिन अत्यंत धूमधडाक्यात साजरा होण्याची चिन्हे दिसताहेत. त्याला कारण पण तसेच आहे ना हो...
मा. राजसाहेबांनी जसे यूपीवाल्यांना त्यांचा राज्यदिन, सण वगैरे त्यांच्याच राज्यात साजरे करण्याची ताकिद दिली होती, त्यामुळे यंदा मनसे कडून महाराष्ट्र दिनाचा सोहळा पाहण्यासारखा असेल.
तसेच शिवसेनेकडूनही त्याचप्रकारच्या अपेक्षा असतील आपल्या...
अजुन एक गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे यावर्षी महाराष्ट्र सरकारने मुंबईचे शिवाजी पार्क २० एप्रिल नंतर महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आपल्या जवळ ठेवले आहे. सध्या निवडणुक प्रचाराचे वारे चालू आहे. रोज ३ ते ४ सभा तेथे होत आहेत, कारण नंतर कोणाला चान्स मिळणार तेथे सभा घ्यायला!
तर मला खात्री आहे कि यावर्षी तरी महाराष्ट्र दिन मोठ्या दिमाखात साजरा होईल, व नंतर मला अजुन काही लिहिता येईल.
प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.
जय महाराष्ट्र!
(Tuesday, April 14, 2009)
Blogger द्वारे प्रायोजित.
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा
»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.
मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!
लिहिण्या आगोदर, मराठी लिखाण चालु - बंद करा!
टिप्पणी देण्यासाठी, वरती लिहिलेले लिखाण खालच्या बॉक्समध्ये कॉपी-पेस्ट करा.