मराठीत लिहिणे अगदी सोपे.......!!!

» रविवार, १२ जुलै, २००९

आता माहितीजालावर मराठीत लिहिणे अगदी सोपे झाले आहे ना की विचारूच नका, तरी सुद्धा काही लोकं नुसते विचारत राहतात की मी देवनागरी लिपीमध्ये कसे लिहू?
तुम्हाला सांगतो, अहो आता कुठेही सहजच मराठीमध्ये लिहिता येऊ शकते! त्याला कारण पण तसेच आहे, आपल्या मराठी भूमीत एवढे मौल्यवान रत्न तयार होत आहेत, ज्यांच्या नसल्यामुळे कदाचित आजचे जग जरा वेगळेच (मागासलेलेच म्हणा ना!) दिसले असते! त्यांच्यासाठीच बहुतेक जगानेच मराठी जणांना हा सन्मान देऊ केलाय जणू...!
तर मी तुम्हाला सांगत होतो की मराठीत आता नेटवर कसे लिहायचे ते?
खुप साधे आणि सोपे पर्याय नेटवर उपलब्ध आहेत, ते पुढीलप्रमाणे आहेत, आपण ते सर्व किंवा आपल्या गरजेप्रमाणे थोडेफार वापरू शकता :



  • सर्वात पहिला आणि माझ्या खुप आवडीचा पर्याय म्हणजे बराहा (अधिक माहिती आणि डाउनलोड लिंकसाठी येथे क्लिक करा)
  • दूसरा पर्याय हा अतिशय महत्वाचा आहे, माझ्या मते आपण मोझिला फायरफॉक्स . (डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा ) आता जे की मराठीत उपलब्ध आहे ते आपण आपले डिफोल्ट ब्राउजर म्हणुन वापरावे, कारण त्यामधे आपल्याला सर्व सूचना मराठीत दिसतात, आणि नविन ऍडऑन्स सुद्धा जोडता येतात, जशा की Google Indic Transliteration, Indic Input Extension, Marathi (India) Dictionary, इत्यादी आपण नंतर जोडू शकता..........!
  • तीसरा पर्याय असा की जर आपल्याकडे मोझिला फायरफॉक्स वेब ब्राउजर नसेल तर आपण ऑपेरा १०. (डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा) हे वेब ब्राउजर वापरू शकता, आणि त्यामधे Vims Hindi Keypad हे विझेट आपण वापरू शकता...
  • जर आपण ऑफ़लाइन मोड मध्ये काम करत असाल तर आपणासाठी एक खुप महत्वाची वेबसाइट आहे, जयावर आपण ऑफलाइन मोड (विना नेट कनेक्शन) काम करू शकता..... तिचे संकेतस्थळ आहे, http://www.saraswaticlasses.com/sites/translate.html
  • आणि जर आपल्याकडे नेट कनेक्शनच नसेल तर आपण आपल्या Windows XP संगणकाद्वारे मराठीमध्ये लेखन करू शकता, त्यासाठी आपल्याला Microsoft Word या सॉफ्टवेअरवर Mangal हा True टाइपचा फॉन्ट इन्स्टॉल करावा लागेल (किंवा तो सहसा असतोच सुरुवातीपासून) आणि त्यामध्ये लिखाण करण्यासाठी आपली Windows XP ची लायसेंस्ड सीडी टाकुन कंट्रोल पॅनल मध्ये जावून Regional Options मध्ये मराठी या भाषेची निवड करावी लागेल, आणि नंतर आपण या फोन्टद्वारे मराठीत लिखाण करण्यास समर्थ असाल..... आणि जर असाही नाही जमले तर Microsoft Word मध्ये जावून Edit मध्ये Symbol क्लिक करून त्यामध्ये Mangal हा फॉन्ट शोधा, त्याद्वारे नंतर तुम्ही पुढे लिखाण करू शकता.........................!


>>>>>> अशाप्रकारे भरपुर मार्ग आहेत मराठीत लेखन करण्यासाठी, आणि आपण सुद्धा त्यांचा पुरेपूर उपयोग करुन घेतला पाहिजेत...........!

>>>>>> आणि हो आपल्या यासंदर्भात जर काही अडचणी असतील तर मला या पोस्टच्या खाली लिहायला विसरु नका.............!


- आपला विशाल तेलंग्रे


0 प्रतिक्रिया:

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre