(हा लेख सलिल कुलकर्णींच्या नेटभेट.कॉम या साईटवरील आहे!)
इंटरनेटवर मराठी गाणी कुठुन डाउनलोड करायची किंवा मराठी गाणी डाउनलोड करण्यासाठी सर्वोत्तम वेब साइट कोणती हा प्रश्न मला बर्याच वाचकांनी विचारला आहे. दुर्दैवाने अशी एकही साइट मला इंटरनेटवर सापडली नाही, जी सर्वच (जुनी आणि नविन) मराठी गाणी एका ठीकाणी उपलब्ध करुन देइल. म्हणुनच मी वाचकांसाठी पाच अशा वेबसाइट्सची यादी बनवीली आहे ज्यावर गाणी डाउनलोड करता येतील किंवा हवे असलेले गाणे इंटरनेटवर नक्की कुठे आहे ते शोधता येइल.खाली उल्लेखीलेल्या पाचही साइट्स व्हायरस आणि मालवेअर (संगणकामध्ये लपुन बसणारे काही खोडसाळ प्रोग्राम्स) यांपासुन अतीशय सुरक्षीत आहेत त्यामुळे येथुन डाउनलोड केलेल्या गाण्यांमुळे संगणकास कोणताही धोका नाही. वाचकांना ही यादी उपयुक्त ठरेल आणि आवडेल अशी अपेक्षा !
१. कुलटोड्.कॉम - Cooltoad.com - (याच साइटला कुलगुज्.कॉम Coolgoose.com असे नाव देखील आहे.)
नावावरुन विचित्र वाटत असली तरी कुलटोड ही एक कामाची साइट आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी, इंग्लीश आणि इतर बर्याच भारतीय भाषांमधील गीतांचा हा एक खजीना आहे. कुलटोड वरुन गाणी डाउनलोड करण्यासाठी आधी त्यांचे सभासद व्हावे लागते. एकदा मोफत रजिस्ट्रेशन केले की मग तुम्ही पाहीजे तितकी गाणी डाउनलोड करु शकता.
कुलटोड वरुन मराठी गाणी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
कुलटोडवर कलाकाराचे नाव, गाण्याचे नाव, गाण्याची प्रसिद्धी (Popularity) तसेच कुलटोडवर गाणे कीती जुने आहे या निकषांद्वारे (Filters) गाणे शोधता येते.
२. इस्निप्स्.कॉम - Esnips.com - ( नियमीत वाचकांसाठी एव्हाना एस्निप्स ओळखीची झाली असेलच !)
इस्निप्स्.कॉम वर देखील गाण्यांचा खजीना आहे. हिंदी गाण्यांचे प्रमाण जास्त असले तरी मराठीतील देखील पुष्कळ गाणी आहेत येथे.फक्त सर्च करा आणि बघा गाण्यांचा खजीना कसा समोर येतो ते.
एका वर्षापुर्वी इस्निप्सवरुन कोणतेही गाणे डाउनलोड करण्याची सोय होती मात्र नंतर MP3 फाइल्स डाउनलोड करण्यावर काही निर्बंध लादण्यात आले. ज्या व्यक्तीने गाणे अपलोड केले आहे त्या व्यक्तीने गाणे डाउनलोड करण्यासाठी परवानगी देणे गरजेचे असते. अर्थात अशी परवानगी बर्याच गाण्यांना आधीपासुनच दीलेली आहे. मात्र एखाद्या गाण्यास परवानगी दीलेली नसल्यास अपलोड करणार्या व्यक्तीस त्यासाठी मेसेज पाठवता येतो.
३. गुगल.कॉम (Google.com) -
गुगलकाकांनी येथेही नंबर पटकावलाय. मागील एका लेखामध्ये मी गुगलच्या सहाय्याने गाणी कशी शोधावीत ते सांगीतले होते, तेच पुन्हा सांगतो.
गाणी डाउनलोड करण्यासाठी आधी आपल्या आवडत्या गूगलकाकांच्या वेबसाइटवर जा. (http://www.google.com/ या साइटला मि प्रेमाने गूगलकाका म्हणतो.) गूगलच्या शोधस्तंभावर (google search bar) खाली दिलेली ओळ टाइप करा.
“parent directory” mp3 OR wma गायकाचे/वाद्यवृंदाचे नाव -html -htm -download -links"
या ओळीमधे "गायकाचे/वाद्यवृंदाचे नाव" काढून त्या जागी तुम्हाला हव्या असलेल्या गायकाचे नाव टाइप करुन एंटर (Enter) करा आणि पहा गूगलकाका कसे आपल्या पेटारयातून गाणी शोधून काढतात ते.
आलेल्या सर्च रीझल्ट्समध्ये फक्त डाउनलोड लिंक असलेल्या वेबसाइट्सच दीसतील.
४. लुल्लार.कॉम (Lullar.com) -
या साइटच्या नावावर जाउ नका, खुप कामाची साइट आहे ही. लुल्लार्.कॉम वर बरेच काही करता येते पण सध्या फक्त गाणी कशी शोधावीत तेवढेच सांगतो. या लिंकवर क्लिक करुन लुल्लार्.कॉम मध्ये गाणी शोधता येतील. तुम्ही शोधत असलेल्यापैकी ९०% गाणी इथे मिळतीलच !
५. बिंग्.कॉम (Bing.com) -
गुगलशी स्पर्धा करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने बिंग हे नवे सर्च इंजीन बनवले आहे. नविनच असले तरी या सर्च इंजीनने चांगलाच जम बसवला आहे. इतकेच नव्हे तर अवघ्या २ महीन्याच्या कालावधीतच याहु सर्चला बिंगने मागे टाकले आहे.
बिंग.कॉम वर एखादे गाणे शोधायचे असल्यास गाण्याचे नाव किंवा चित्रपटाचे/अल्बमचे नाव किंवा गायकाचे नाव लिहुन पुढे contains:mp3 असे लिहा आणि सर्च करा.
________________________________________
स्वगृह » मराठी गाणी » मराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय.......!
मराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय.......!
लेखक: विशाल तेलंग्रे » शनिवार, ११ जुलै, २००९टॅग्ज: इंटरनेट, ट्रिक्स, डाउनलोड, मराठी गाणी
Blogger द्वारे प्रायोजित.
2 प्रतिक्रिया:
Thanks 4 information.
khup chhan mahiti ahe. i like it.
टिप्पणी पोस्ट करा
»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.
मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!
लिहिण्या आगोदर, मराठी लिखाण चालु - बंद करा!
टिप्पणी देण्यासाठी, वरती लिहिलेले लिखाण खालच्या बॉक्समध्ये कॉपी-पेस्ट करा.