स्वगृह » संबोधन » पेट्रोल महागलं हो!
पेट्रोल महागलं हो!
लेखक: विशाल तेलंग्रे » शनिवार, ४ जुलै, २००९टॅग्ज: आवाहन, टीका, महागाई, विडंबन, संबोधन
अवघे १०० दिवस पुर्ण केलेल्या नपुंसक सरकारची कमजोरी त्यांनी आज पुन्हा दाखवली तर...! यात नवल तरी काय म्हणा...!
देशद्रोही काँग्रेसी गांधी घराण्याने भारताला जे मागासत ठेवले आहे त्याची आज पुन्हा त्यांनी पुनरावृत्ती केली.
मागील ३ ते ४ महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाचे भाव जागतिक बाजारपेठेत १६० डॉलर प्रति बॅरेल वरून ३९ डॉलर प्रति बॅरेल एवढे घसरले होते (त्यावेळी डॉलरमागे फक्त ३९ एवढेच रूपये मोजावे लागत होते), आठवतयं ना! आणि हो त्यावेळी पेट्रोलचा भारतातील भाव अंदाजे ४५ रूपये प्रति लिटर एवढा होता.
म्हणजे अंदाजे ३००% (१६० वरून ३९ डॉलर प्रति बॅरेल) भाव घसरून सुद्धा आपल्या नासमजंस काँग्रेसी सरकारने का त्यावेळीच पेट्रोल व इतर तेलांचे भाव त्यापटीने कमी केले नाही? काय झोपले होते की मेले होते ते केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवडा (बेवडाच म्हणा की त्या नपुंसकाला)....? अहो १ रूपयाने तरी किमती कमी कराव्यात की नाही हो त्या बावळटाने? पण नाही, त्यांचा घसा कोरडाच हो .......!!!
काही दिवसांत पुन्हा आश्वासनांचा पाऊस (यावर्षीचा मॉन्सूनचा पाऊस तर कोरडाच गेला हो) म्हणजे नविन वित्तिय बजेट आपले नपुंसक सरकार सादर करणार, तेवढ्यात आज ही बातमी, याचा अर्थ असाच होतो ना की आज किमती वाढल्या त्या बजेटच्या वेळी कमी (४ रूपये नव्हे तर २ रूपये तरी समजा) केल्या जातील व जनतेच्या उघड्या डोळ्यांत सरकार भुरळ पाडण्यास यशस्वी होईल.
(आज कच्चे तेल जागतिक बाजारपेठेत ७१.०२ डॉलर प्रति बॅरेल आणि भारतीय चलन डॉलरमागे ४७.८७ रूपयांवर होते.)
तर माझ्या समजंस व राष्ट्रवेड्या मित्रांनो, तुमच्यापर्यंत माझे विचार पोहोचावे यासाठी मी माझ्या www.vishaltelangre.tk या संकेतस्थळाचा उपयोग करीत आहे.
माझे तुम्हां लोकांना एवढेच आवाहन आहे कि आपण सतत जे काय चोहोबाजूंनी घडतेय, त्याचा अचूक वेध घेऊन त्याचे निरसन करण्यास सदैव तत्पर व एकजुट असण्याची तयारी दर्शविली पाहिजे.
जर आपल्या काही प्रतिक्रिया, तक्रारी किंवा अन्य काही बाबी असतील तर त्या मला अवश्य कळवा. आपला प्रतिसादच मला काहितरी लिहिण्यास प्रोत्साहित करीत असतो.
धन्यवाद!
-आपला विशाल तेलंग्रे
जय हिंद, जय महाराष्ट्र!
(1 जुलै, २००९)
Blogger द्वारे प्रायोजित.
1 प्रतिक्रिया:
जय भवानी, जय शिवाजी!
टिप्पणी पोस्ट करा
»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.
मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!
लिहिण्या आगोदर, मराठी लिखाण चालु - बंद करा!
टिप्पणी देण्यासाठी, वरती लिहिलेले लिखाण खालच्या बॉक्समध्ये कॉपी-पेस्ट करा.