विडंबन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विडंबन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

यस्सऽ नोऽ...

» गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०१०

[डिस्क्लेमर: पुढील कथानकातील कुठल्याही प्रसंगाचा/पात्राचा/स्थळाचा/वचनांचा कशाशीही कसलाही संबंध नाहीये. यातील "मी" हे पात्र देखील काल्पनिक आहे. कसल्याही बाबतील जर तुम्हाला हे तुमच्याशी घडलेल्या घटनेशी संबंधित आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा.]

    पहिलंच लेक्चर... तसं सगळेच लेक्चर्स आम्ही म्हशीसारखे उदास मुस्कटं करुन कसे-बसे मार्गी लावत असतो, कुठलंही लेक्चर त्याला अपवाद नसतंच मुळी! आज मुलांना जरा हूरूपच चढलेला दिसत होता बहुदा, नाही नाही... मला तर दाट शंकाच होती की कित्येकांनी डायलूट (विरल ~ पिण्याच्या पाण्यात मिक्स करुन) ढोसलेली होती... खासकरुन आमचे एमबीबीएस (बॅक बेंचर्स हो!) इंजिनिअर्स...

    मॅऽमनी लेक्चरला सुरुवात केली... एखाद्यावेळी गच्चीवर रात्री झोपतांना १२ वाजता अतिशय कर्कश आवाजात बाजुच्याच मंदिरावरील खडूस पुजार्‍याने झोपेच्या सुरात म्हणलेली "वट पाहे सदना" च्या जागी "वाट पाही सजनी" अशाप्रकारची मॉडिफाइड स्वरूपातली गणपतीची आरती ऐकणं चालेल, पण मॅऽमचं लेक्चर म्हणजे वर्गांच्या खिडक्या डोक्याने आपटून-आपटून फोडाव्या की काय, अशी स्थिती निर्माण करणारं कंटाळवाणं पारायण...! असो... नशिबी पडलंय, ते भोगावं तर लागणारंच... अर्धा तास झाला, मॅऽमचं भारूड चाललंय, पोरा-पोरांची तोंड तर अशी दिसत होती की कोणी जोर-जोरात त्यांच्या थोबाडींत भडकावल्या असाव्यात... पिन-ड्रॉप-सायलेंट का काय जे म्हणतात ना, त्याचा आम्ही तना-मनाने अवलंब केलेला... फळ्यावर मॅऽमनी कसलातरी तक्ता काढला. तक्त्यात मॅऽमनी नावे विचारली... ज्याने-त्याने त्यांची -त्यांची सांगितली देखील. च्यायला, पहिल्या कॉलममध्ये मुलांची नावे भरल्यावर दुसर्‍या कॉलमकडे मॅऽम वळाल्या... मुलींची नावे विचारणं मॅऽमनी चालू केलं... पहिल्या बेंचपासून... हा हा... मनात नसूनही कित्येकींना त्यांची नावे सांगावी लागली. मुली सांगत होत्या, मॅऽम लिहित होत्या...
   

पेट्रोल महागलं हो!

» शनिवार, ४ जुलै, २००९


अवघे १०० दिवस पुर्ण केलेल्या नपुंसक सरकारची कमजोरी त्यांनी आज पुन्हा दाखवली तर...! यात नवल तरी काय म्हणा...!

देशद्रोही काँग्रेसी गांधी घराण्याने भारताला जे मागासत ठेवले आहे त्याची आज पुन्हा त्यांनी पुनरावृत्ती केली.

मागील ३ ते ४ महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाचे भाव जागतिक बाजारपेठेत १६० डॉलर प्रति बॅरेल वरून ३९ डॉलर प्रति बॅरेल एवढे घसरले होते (त्यावेळी डॉलरमागे फक्त ३९ एवढेच रूपये मोजावे लागत होते), आठवतयं ना! आणि हो त्यावेळी पेट्रोलचा भारतातील भाव अंदाजे ४५ रूपये प्रति लिटर एवढा होता.
म्हणजे अंदाजे ३००% (१६० वरून ३९ डॉलर प्रति बॅरेल) भाव घसरून सुद्धा आपल्या नासमजंस काँग्रेसी सरकारने का त्यावेळीच पेट्रोल व इतर तेलांचे भाव त्यापटीने कमी केले नाही? काय झोपले होते की मेले होते ते केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवडा (बेवडाच म्हणा की त्या नपुंसकाला)....? अहो १ रूपयाने तरी किमती कमी कराव्यात की नाही हो त्या बावळटाने? पण नाही, त्यांचा घसा कोरडाच हो .......!!!

काही दिवसांत पुन्हा आश्वासनांचा पाऊस (यावर्षीचा मॉन्सूनचा पाऊस तर कोरडाच गेला हो) म्हणजे नविन वित्तिय बजेट आपले नपुंसक सरकार सादर करणार, तेवढ्यात आज ही बातमी, याचा अर्थ असाच होतो ना की आज किमती वाढल्या त्या बजेटच्या वेळी कमी (४ रूपये नव्हे तर २ रूपये तरी समजा) केल्या जातील व जनतेच्या उघड्या डोळ्यांत सरकार भुरळ पाडण्यास यशस्वी होईल.


"जय महाराष्ट्र ! करा कष्ट अन् खा उष्ट-पाष्टं ! "

»


काय मित्रहो, मजेत ना की...!
तसा जरा तुम्हां वाचकांवर जरा नाराज आहे, कारण माझ्या यापूर्वीच्या "मी शिवाजीराजे"ला म्हणावा तसा प्रतिसाद नाही मिळाला, हो पण सबब पण तशीच होती, माझं मराठी काही एवढं सुसंस्कृत नाहिये हं!
बरं, पण माझा लेखन करण्याचा छंद तरी मला जोपासायला हवाच ना, त्याकरिता मी हा नविन लेख लिहितोय, महाराष्ट्राच्या वर्तमान हवामानाचा आढावा!


तर मित्रांनो, आपला प्रिय महाराष्ट्र देश नेमक्या कोणत्या परिस्थितींशी व महाराष्ट्रद्वेष्ट्या कंटकांशी झुंज देत आहे व त्यामुळे कसा पिछाडीवर पडला आहे, हे जाणून घेण्याची ऊत्सुकता आपल्याला असेलच, त्यात नवल तरी काय हो, प्रत्येक मराठी माणूस हेच अनुभवतोय आजच्या घडीला!

१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, शेकडो हुतात्म्यांचे सांडलेले रक्त अखेर कामी आले. मुंबईसारखी आर्थिकदृष्ट्या प्रबल व सर्वगुणसंपन्न अशी राजधानी मिळाली. भाषावर रचना झाल्यामुळे शिवरायांची मराठी साम्राज्याची स्वप्नपूर्ती झाल्यासारखेच वाटले होते त्या काळी, पण आता मला तरी तसे वाटत नाही राव!

कारण माझ्यामते तरी महाराष्ट्र हा अजुनसुद्धा सार्विकदृष्ट्या मागासलेलाच आहे. अहो महाराष्ट्राला कशाची कमी आहे, हं तुम्ही म्हणाल की महाराष्ट्र खूपच प्रगतिशील राज्य आहे भारतातील, अहो फक्त भारतातलचं ना! जगाशी तुलना करता आपली लायकी पण नाही, हे म्हणायची की आमचा देश किंवा राज्य १९२० पर्यंत सर्व दृष्टीने महासत्ता बनेल म्हणून!


हो तर मी म्हणत होतो की महाराष्ट्राला कमी तरी कशाची आहे, अहो माझ्यामते दीडदमडीची सुद्धा नाही! दीड हजार किमीचा अरूंद असा समुद्रकिनारा, दख्खन पठारी मैदानी माळरान, सह्याद्रिच्या अखंड पर्वतरांगा ही झाली प्राकृतिक रचना, ना कुठे वाळवंट अन् ना कुठे हिमभाग, म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच म्हणावा लागेल महाराष्ट्राला!


Vishal Telangre