विनोदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विनोदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

यस्सऽ नोऽ...

» गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०१०

[डिस्क्लेमर: पुढील कथानकातील कुठल्याही प्रसंगाचा/पात्राचा/स्थळाचा/वचनांचा कशाशीही कसलाही संबंध नाहीये. यातील "मी" हे पात्र देखील काल्पनिक आहे. कसल्याही बाबतील जर तुम्हाला हे तुमच्याशी घडलेल्या घटनेशी संबंधित आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा.]

    पहिलंच लेक्चर... तसं सगळेच लेक्चर्स आम्ही म्हशीसारखे उदास मुस्कटं करुन कसे-बसे मार्गी लावत असतो, कुठलंही लेक्चर त्याला अपवाद नसतंच मुळी! आज मुलांना जरा हूरूपच चढलेला दिसत होता बहुदा, नाही नाही... मला तर दाट शंकाच होती की कित्येकांनी डायलूट (विरल ~ पिण्याच्या पाण्यात मिक्स करुन) ढोसलेली होती... खासकरुन आमचे एमबीबीएस (बॅक बेंचर्स हो!) इंजिनिअर्स...

    मॅऽमनी लेक्चरला सुरुवात केली... एखाद्यावेळी गच्चीवर रात्री झोपतांना १२ वाजता अतिशय कर्कश आवाजात बाजुच्याच मंदिरावरील खडूस पुजार्‍याने झोपेच्या सुरात म्हणलेली "वट पाहे सदना" च्या जागी "वाट पाही सजनी" अशाप्रकारची मॉडिफाइड स्वरूपातली गणपतीची आरती ऐकणं चालेल, पण मॅऽमचं लेक्चर म्हणजे वर्गांच्या खिडक्या डोक्याने आपटून-आपटून फोडाव्या की काय, अशी स्थिती निर्माण करणारं कंटाळवाणं पारायण...! असो... नशिबी पडलंय, ते भोगावं तर लागणारंच... अर्धा तास झाला, मॅऽमचं भारूड चाललंय, पोरा-पोरांची तोंड तर अशी दिसत होती की कोणी जोर-जोरात त्यांच्या थोबाडींत भडकावल्या असाव्यात... पिन-ड्रॉप-सायलेंट का काय जे म्हणतात ना, त्याचा आम्ही तना-मनाने अवलंब केलेला... फळ्यावर मॅऽमनी कसलातरी तक्ता काढला. तक्त्यात मॅऽमनी नावे विचारली... ज्याने-त्याने त्यांची -त्यांची सांगितली देखील. च्यायला, पहिल्या कॉलममध्ये मुलांची नावे भरल्यावर दुसर्‍या कॉलमकडे मॅऽम वळाल्या... मुलींची नावे विचारणं मॅऽमनी चालू केलं... पहिल्या बेंचपासून... हा हा... मनात नसूनही कित्येकींना त्यांची नावे सांगावी लागली. मुली सांगत होत्या, मॅऽम लिहित होत्या...
   

नुकत्याच हाती आलेल्या बातम्या...

» शुक्रवार, २२ जानेवारी, २०१०

ठळक घडामोडी पुढीलप्रमाणे:

१) तीव्र शीतलहरीचा फटका काही मराठी ब्लॉगर्संना... अनेकांचे ब्लॉग थंडीमुळे मृतावस्थेत आढळले...
२) चोरांचा धूमाकूळ सुरूच... महेंद्रजींच्या ब्लॉगवरील लाखो रूपये किंमतीची मालमत्ता दिवस-ढवळ्या लंपास...
३) मराठी ब्लॉग विश्व, मिसळपाव, उपक्रम, अन मनोगत यांचा पुढील "मराठी ब्लॉगर्स" स्नेह मेळाव्यास तीव्र विरोध...
४) ब्लॉगर अन वर्डप्रेस यांनी एकत्रितपणे फक्त मराठी ब्लॉगर्ससाठी आजपासून चालू केलेल्या नविन ब्लॉग-डोमेन "xyz . marathi . com" सेवेला तीव्र प्रतिसाद...
५) भुंग्या - एक सामाजिक किडा, यांच्या ब्लॉगवर वाचकांच्या वाढत्या प्रमाणामुळे त्यांच्या ब्लॉगची एक साईडबार कालच्या रात्री तुटली...
६) वाढत्या महागाईमुळे अनेक वाचकांचा ब्लॉगवर प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय...
७) पंक्या, यांच्या ब्लॉगवरील भाषेबद्दल अन फोटोंवर काही वाचकांचा आक्षेप...


****************************************************

आता बातम्या सविस्तरपणे....

जळगावची सफर - पद्मालय

» शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २००९

नमस्कार मित्रहो, तर याआधीच्या "दिवाळीनंतरची ट्रेक..." मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही (म्हणजे मी अन गौरव) दोघांनी "पद्मालय"ला जायची तयारी केली. त्या दिवशी माझ्या धाकट्या मावसबहिणीकडे गोड-धोड जेवण करून छोट्या भाऊजींनी आम्हां दोघांना मोठ्या भाऊजींकडे नेले. तेथे माझी मोठी ताई ऑल्रेडि शेतात गेलेली होती व मोठे भाऊजी घरासमोरील छोट्याश्या बदामीच्या झाडाला कूंपन करीत होते. त्यावेळी मस्त ऊन पडले होते, दूपार होती ना.....! त्यातच अर्धा तास किंवा जरा जास्तच वेळ गेला. फूल जेवण अन त्यातच ते गोड होतं, त्यामूळे मी, गौरव अन छोटे भाऊजी, तिघांनाही सुस्ती आली, अन तिघेही तिथेच जरासं लोळलो...(!) मोठ्या भाऊजींचे जेव्हा काम आटोपले, तेव्हा बहुतेक दुपारचा सव्वा झालेला असावा. लगेच त्यांनी एकदम फास्ट मध्ये आम्हाला उठवलं अन फ्रेश होऊन पटकण रेडी व्हायचं सांगितलं. आम्ही घाई-घाईत रेडी झालो अन जायला निघालो. गौरव छोट्या भाऊजींच्या (प्रविण भाऊजींच्या) तर मी मोठ्या (अनिल भाऊजींच्या) गाडीवर पाठीमागे बसलो. एक गोष्ट सांगायची राहिलीच, हसू नका, कारण मला अजुनही गाडी चालवता येत नाही......! त्यामूळे भाऊजींच्या हातातून गाडी घेण्याचा प्रश्नच नव्हता, बस्स... पाठीमागे बसून आपलं चुप-चाप बसायचं अन ऐश करायची, ती पण अगदी आरामात.....!

आम्ही "शिरसोली"ला (ता/जि. जळगाव) होतो, ते जळगावपासून १० किमी लांब होते. अन "पद्मालय" (ता. एरंडोल, जि. जळगाव) हे जळगावपासून ४०-४२ किमी दूर आहे. म्हणजे आम्हाला तरी पण ३० ते ३२ किमी जायचे होते. जातेवेळी रस्त्यात गाडी पेट्रोलची टंकी फुल केली. साला रस्ता एकदम हाय-वे टाईप अन रस्त्यावर एवढी वर्दळ पण नव्हती, पण प्रविण भाऊजींची "हिरो होंडा करिज्मा" ३०-४०kmph च्या पुढे जातच नव्हती, अन अनिल भाऊजींची (ज्यांच्या पाठीमागे मी बसलो होतो), "हिरो होंडा स्प्लेण्डर प्लस" ७०-८०kmph या स्पीडने पळत होती. आम्ही पाच-पाच मिनिटांनी मागे वळून पाहू, तर ते आम्ही एखाद्या ठिकाणी थांबल्यावर दहा-एक मिनिटांनी दिसत होते, अन गाडी चालवत असतांना तर ते आम्हांला दिसतच नव्हते, एवढी त्यांची करिज्मा "फास्ट" पळत होती.....!


Vishal Telangre