नुकत्याच हाती आलेल्या बातम्या...

» शुक्रवार, २२ जानेवारी, २०१०

ठळक घडामोडी पुढीलप्रमाणे:

१) तीव्र शीतलहरीचा फटका काही मराठी ब्लॉगर्संना... अनेकांचे ब्लॉग थंडीमुळे मृतावस्थेत आढळले...
२) चोरांचा धूमाकूळ सुरूच... महेंद्रजींच्या ब्लॉगवरील लाखो रूपये किंमतीची मालमत्ता दिवस-ढवळ्या लंपास...
३) मराठी ब्लॉग विश्व, मिसळपाव, उपक्रम, अन मनोगत यांचा पुढील "मराठी ब्लॉगर्स" स्नेह मेळाव्यास तीव्र विरोध...
४) ब्लॉगर अन वर्डप्रेस यांनी एकत्रितपणे फक्त मराठी ब्लॉगर्ससाठी आजपासून चालू केलेल्या नविन ब्लॉग-डोमेन "xyz . marathi . com" सेवेला तीव्र प्रतिसाद...
५) भुंग्या - एक सामाजिक किडा, यांच्या ब्लॉगवर वाचकांच्या वाढत्या प्रमाणामुळे त्यांच्या ब्लॉगची एक साईडबार कालच्या रात्री तुटली...
६) वाढत्या महागाईमुळे अनेक वाचकांचा ब्लॉगवर प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय...
७) पंक्या, यांच्या ब्लॉगवरील भाषेबद्दल अन फोटोंवर काही वाचकांचा आक्षेप...


****************************************************

आता बातम्या सविस्तरपणे....

१) उत्तर भारतात आलेल्या शीतलहरीचा तीव्र फटका काही आता मराठी माहितीजालावर पण पसरलाय... दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार असे दिसून आले की मराठी ब्लॉग विश्वावर नियमित लेखन करणार्‍या काही ज्येष्ठ मंडळींचे ब्लॉग तसेच ओसाड पडून आहेत... भुंग्या - एक सामाजिक किडा अन डोक्यात भुणभुणणारा सामाजिक किडा यांच्या ब्लॉगवर विरळ प्रमाणात अपडेट्स दिसले. तसेच बहुतेक मराठी ब्लॉगर्सचे ब्लॉग तसेच गारठलेल्या अवस्थेत पाहण्यात आले.... यावर अनेक विचारवंतांनी अन काही वाचकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रोज काहीतरी खरपूस वाचायला मिळावं, या उद्देश्याने काही वाचक मंडळी उद्या विधानपरिषदेवर मोर्चा नेणार आहेत अशी गुप्त बातमी काही हेरांमार्फत मिळाली आहेत. यांची प्रमुख मागणी अशी असणार आहे: "प्रत्येक मराठी ब्लॉगरने नित्यनियमाने दररोज काहीना-काहीतरी लिहावेच... असा नियम सरकारने संविधनात तयार करावा. अन या नियमाचे उल्लंघन करणार्‍या ब्लॉगरचा ब्लॉग समूळ नष्ट करावा अन त्याला नविन ब्लॉग तयार करण्यासाठी माहितीजालावर कुठेही परवानगी दिली जाऊ नये." यासंदर्भात आमच्या बातमीदारांनी काही ब्लॉगर्संना याबद्दल विचारले असता त्यांनी ऊत्तरे देण्यास टाळाटाळ केली... याबाबत पुढे काय घडेल, हे उद्याच कळेल...


२) आत्ताच संक्रांतीच्या दुसर्‍या दिवशी पार पडलेल्या पहिल्या-वहिल्या मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यात "ब्लॉगवरील लिखानाची चोरी" या विषयावर खुप चर्चा झाली होती... त्यावेळी आमचे प्रतिनिधी तसेच काही खाजगी चॅनेल आणि वृत्तपत्रांचे पत्रकार उपस्थित होते. त्यावेळी अनेक शक्कली लढवण्यात आल्या. पण चोरांपासून वाचण्यासाठी योग्य मार्ग काही निघू शकला नाही. आत्ताच हाती आलेल्या ताज्या वृत्तानुसार आमचा प्रतिनिधी अखिल बोंबले, जो की सध्या महेंद्रजींच्या ब्लॉगवर उपस्थित आहे, त्याच्याकडून अशी सविस्तर माहिती मिळाली आहे की महेंद्रजी आज सकाळीच बाहेरगावी गेल्याचा फायदा उचलित काही चोरट्यांनी दुपारी लाखो रूपयांची मालमत्ता महेंद्रजींच्या "काय वाट्टेल ते"वरून लंपास केली. त्यात अनेक प्रकारचे दूर्मिळ साहित्य होते असे महेंद्रजी यांनी आमच्याशी फोनवर बोलतांना सांगितले आहे. महेंद्रजी यांनी यासंबंधी जळकी फाट्यावरील पोलिस चौकीत तक्रार नोंदविली आहे. पुढील तपास जळकी फाटा चौकीचे पोलिस उप-निरिक्षक श्री चोरटे करीत आहेत. तपास अजुन चालूच आहे, अशी माहिती त्यांनी आमच्याशी फोनवर बोलतांना दिली आहे. चोरट्यांचा आय.पी. ऍड्रेस हस्तगत केला गेला असून ते चोरटे बहुतेक येसगावच्या नजिकच्या परिसरातील असल्याची तीव्र शंका वर्तवली जाते आहे. आमचा प्रतिनिधी अखिल बोंबले याने आत्ताच सांगितल्याप्रमाणे, "काय वाट्टेल ते" वरील दिनांक २२ जानेवारी, २०१० अन ३१ जानेवारीचे काही लाख-मोलाचे लेख चोरी गेले आहे... उद्यापर्यंत खरे चोरटे गजाआड होतील, अशी आशा "काय वाट्टेल ते" च्या शेजारी राहणार्‍या मंडळींनी अखिल बोंबले यांच्याकडे व्यक्त केली आहे.


३) आमच्या काही अधिकृत गुप्तहेरांना मिळालेल्या काही गुप्त कागदपत्रांवरून असा खुलासा झाला आहे की पुणे येथील काही मराठी ब्लॉगर्स मंडळींनी त्यांचे-त्यांचे, सर्व मराठी ब्लॉगर्संना सामवेल असे संकेतस्थळ निर्माण केले जात आहे. त्यावर पुण्यानजिकच्या कही खेड्यांमध्ये जोरदार काम चालू आहे. पण यामागे नेमका खरा सुत्रधार कोण आहे, याबद्दल मात्र अजुनही अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
याबद्दल आमचा प्रतिनिधी विकास ब्लॉगतोडे यांनी मनोगत, मराठी ब्लॉग विश्व, उपक्रम, मिसळपाव अन अन्य संस्थाळांच्या कार्यवाहकांशी बातचित केली. या सर्वांनी पुनरोच्चार करीत आमच्याशी बोलताना असे सांगितले की हा कट यावेळी पार पडलेल्या पहिल्या मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यातच रचला गेला आहे. अन तो कट उधळून लावण्यासाठी त्यांनी सर्व तयार्‍या आधिच करून ठेवल्या आहेत. तथापि शेवटी सर्वांनी एकत्रितपणे पुढील मराठी ब्लॉगर्स मेळावा होण्यास तीव्र विरोध दर्शविला.


४) आज सकाळीच लॉंच झालेल्या "xyz . marathi . com" या संकेतस्थळावर ब्लॉग तयार करण्यास उत्सुक मराठी ब्लॉगर्संनी "marathi . com" या ठिकाणी सकाळपासून खुपच गर्दी केली होती. नावाजलेल्या ब्लॉगर आणि वर्डप्रेस या मोफत ब्लॉग तयार करणार्‍या संकेतस्थळांनी एका कराराद्वारे फक्त मराठी ब्लॉगर्संना त्यांचे ब्लॉग्ज एका नविन संकेतस्थळावर तयार करण्यासाठी ही सुविधा भारतिय प्रमाणवेळेनुसार सकाळी २ वाजेच्या सुमारास लॉच केली. मराठी ब्लॉगर्सच्या लक्षणिय वाढीमुळे हा करण्यात आल्याचे आमचे प्रतिनिधी कडूबा अडाणी यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या वेळी ते हजर होते, पण सर्व भाषणे इंग्रजीतून झाल्यामुळे त्यांना काहीही उमगले नाही. त्यामुळे याविषयी आम्ही तुम्हाला शिल्लकची माहिती देण्यास दिलगीर आहोत. तथापि कडूबा अडाणी यांनी इंग्रजी शिकण्यास स्पष्ट नकार दिला आहे. फक्त मराठीतच पत्रकारिता करण्याचा त्यांचा निर्धार आहे व त्यांच्या या निर्धाराचा बहुतेक राजकिय मंडळींनी राजकिय फायदा घेतल्याचे आज दिवसभर दिसून आले.


५) माहितीजालावर मराठी ब्लॉग विश्वात सर्वांत लोकप्रिय ब्लॉगर भुंग्या - एक सामाजिक किडा, यांच्या ब्लॉगवर काल रात्री अचानकच काही वाचकांची संख्येने खुप मोठी टोळी आली. त्यातील बहुतेक वाचक हे साईडबारच असल्यामुळे भुंग्याने थर्माकॉलपासून बनवलेली अन काही आभूषणांनी आभूषित केलेली साईडबार, जी की लोखंडाची असल्याची जाणवत होती, ती एकदमच तुटली... यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. पण भुंग्याच्या ब्लॉगचे खुप मोठे नुकसान झाले आहे. दुरूस्तीसाठी हा ब्लॉग काही दिवस बंद राहील, अशी माहिती भुंग्याने आमच्याशी फोनवर बोलतांना दिली आहे. तथापि डोक्यात भुणभुणणार्‍या भुंग्याने ही बातमी कळताच खदा-खदा हसायला सुरूवात केली... पण त्यामुळे त्याचे गाल खुपच फुगले... उपचारासाठी त्याला सध्या आय.सी.यू. मध्ये ठेवण्यात आले आहे, अन त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती आमच्या प्रतिनिधींकडून आम्हाला कळाली आहे.


६) हल्ली वाढत्या महागाईमुळे अनेक वाचकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. साखरेचे भाव वाढले म्हणून चहाचे भाव वाढले, त्यामुळे आमची विचारशक्ती कमी झालीय, आणि त्यामुळे आम्ही ब्लॉग्जवर प्रतिक्रिया देणार्‍यांवर अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मराठी ब्लॉगर्स संघटनेच्या अध्यक्षांनी आमच्याशी फोनवर बोलतांना दिली. याबद्दल काही वाचकांच्या प्रतिक्रिया आम्ही (मोफत) जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, असे दिसून आले की सर्वच वाचकांनीदेखील यापुढे कोणत्याही ब्लॉगवर प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच खायचे वांधे आहेत, अन प्रतिक्रिया देण्यासाठी वाचकांनी पैसे मोजावेत.... हा खुळचट प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या.


७) पंक्या, यांच्या "भटकंती - अनलिमिटेड, फ्रेम्स ऑफ माईंड" या ब्लोगवरील अर्वाच्य भाषेबद्दल अन तेच-तेच फोटो दाखवित असल्याबद्दल काही नियमित ब्लॉग-वाचक मित्रांनी आक्षेप घेतला आहे. "खाज", "माज", "च्यायला" अशा अर्वाच्य शब्दांचा वापर "पंक्या" यांनी थांबवावा, अशी या वाचकांची मागणी आहे. तसेच तेच-तेच फोटोज बघायला मिळत असल्यामुळे कधीतरी नविन अन वेगळ्या-वेगळ्या विषयांशी संबंधित फोटोज टाकण्याचीही मागणी हे वाचक मंडळी करत आहे. जर हे प्रकरण लवकर थांबले नाही, तर अखिल मराठी वाचक मंडळाने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे.


आतापर्यंत हाती आलेल्या या काही मोजक्या बातम्या होत्या. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी पाहण्यासाठी कृपया वर बघा. बातम्या संपल्या.

**************************************************

या बातम्या प्रसारित करण्याचे सर्वाधिकार श्री गजानन महाराज यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहे...!

19 प्रतिक्रिया:

विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

हा हा हा लयच भारी भावा
सकाळपासून कामाने वैतागून गेलो होतो पण
हि पोस्ट वाचली आन सगळा शीनच निघून गेला बघ

धन्यवाद विशल्या :)
हेरंब म्हणाले...

लय भारी, विशल्या :)
Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले...

च्यायला, लईच खाज आहे तुला.
वेगवेगळ्या विषयांशी संबंधित फोटो म्हणजे कसले रे भाऊ? तू तरी सांग एकदा.

आणखी ताज्या घडामोडी: तो चोरटा लवकरच सापडेल. शिक्षीसाठी कायद्यातच दुरुस्ती करावी लागेल. डोक्यातला भुंगा त्याच्या गालांचा उपचार सायकल मारुन मारुन करणार आहे. सर्व मराठी ब्लॉगर्संना सामवेल असे संकेतस्थळ लवकरच प्रसृत होण्याच्या अवस्थेत आहे. जरा कळ काढा. आता लगेच "आल इज वेल" म्हणू नका. सगळ्यांना बरोबर घेऊन चालेल असेच हे संकेतस्थळ असणार आहे.
अपर्णा म्हणाले...

विशल्या चांगली हेरगिरी चाललीय.....आम्हाला असा बातमीदार हवाच होता....
Mahendra म्हणाले...

अरे काय मस्त लिहिलं आहेस?? सकाळी उठुन तु काय लिहिलं हे चेक करायला इथे आलो, तर हे दिसलं.. खरंच खुप छान लिहिलंय... मजा आली वाचायला.. :) नुसता हसतोय केंव्हाचा वाचतांना
भुंग्याच्या ब्लॉगची कडा तुटली हे वाचुन तर हसुन हसुन पुरेवाट झाली.. :)
अनामित म्हणाले...

सही है भिडू... मस्त झालीय पोस्ट... by the way.. गजानन महाराज तुला दर्शन द्यायला लवकरच औरंगाबादेत अवतरणार आहेत... अरे.. ट्रिप प्लान करतो आहे..
विशाल तेलंग्रे म्हणाले...

»» @विक्रम, अच्छी बात हाय... आमची पोस्ट तुमको पसंद आई आणि तुम जोर-जोर्‍यात हॅंसी, हे ऐकून बहूत अच्छा लगी हमकू... खुप खुप शुक्रिया!

**********

»» @हेरंब, थॅंकू थॅंकू भाईलोग...!


**********

»» @पंक्या, मला तर काहीच माहित नाहीये भाऊ, आमच्या वार्ताहाराने ती बातमी आणली अन ती आम्ही लगेच इथं छापली... तुला त्याबद्दल काही तक्रार करायची असेल तर आमच्या नावाने या ब्लॉगच्या पत्त्यावर एक लेखी निवेदन पाठव. तुझ्या तक्रारींवर विचार केला जाईल.
बाकीच्या (अपडेटेड) बातम्या आमच्या च्यायनल वर द्याची कहीच गरज नव्हती, नुसती ऍडोटाईझमेंट नको आमच्या च्यानलवर, तू तुझ्या च्यायनलवर टाकल्या तर बरं हुईन... काय??? ;) पण तुला ह्या बातम्यांचा कसा काय सुगावा लागला रे, ऑंss...??? ;)


**********
विशाल तेलंग्रे म्हणाले...

»» @अपर्णा, आमचे व्हर्च्युअल दुनियेचे व्हर्च्युअ पत्रकार श्रीमान कडूबा अडाणी यांना आम्ही नोकरीवरून काढून टाकलंय.. त्यांच्यामुळे पब्लिकमध्ये आमची अतिशयोक्ती झाली. तूला जर अस्सल मराठी बातमीदाराची आवश्यकता असेल तर तू त्यांच्याशी बोलू शकते. माफ कर, पण त्यांचा पत्ता आमच्याकडे सध्या अव्हेलेबल नाहिये, कृपया गुगलवर सर्च मारणे...! ;)

**********

»» @महेंद्र काका, हसण्याचं काही-एक कारण नाहिये, ही घटना शेवटी खरी आहे. पण आत्ताच मिळालेल्या अपडेट्सनुसार माहिती मिळाली आहे की, भुंग्याने ब्लॉगची ती तुटलेली कडा दुरूस्त केली आहे... पण त्यासाठी त्याने १०लाख रू कर्ज काढले होते, असे आमच्या गुप्तहेर-पत्रकार सौ. रातकिडे यांनी सांगितले आहे. ते कर्ज रद्द करण्यासाठी भुंग्याने पुण्याच्या कलेक्टर ऑफिससमोर आमरण उपोषण सूरू केले आहे... पण त्याच्या सौ. ने त्याला बळजबरीने घरी नेल्यामुळे त्याची भयंकर पंचाईत झाली आहे.. तरी त्याने सर्व ब्लॉगर्संना मदतीसाठी आवाहन केले आहे...

**********

»» @गजानन महाराज, धन्यवाद महाराज... येतेवेळी आम्हाला एकवेळ दुरध्वनीद्वारे एक "सुटलेला कॉल" करण्याची तसदी घ्यावी ही विनंती... बाय दि वे, तुम्ही कधी अवतरणार आहात ते आम्हाला आमच्या गुप्त विरोप पत्त्यावर पाठविणे, कारण आजकाल येथे खुपच हेर वाढले आहेत.

**********
mandar म्हणाले...

तू खुपच कॉमेडी लिहिल आहेस यार...... हैट्स ऑफ़ टू यु :-)
भुंगा म्हणाले...

सॉलिडच रे!
अगदी ७.१२ च्या "ठ़ळक बातम्या" आणि "आता बातम्या सविस्तर" असं वाचल्यासारखं [ऐकल्यासारखं] वाटलं! कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये असाच एक ""बातमीपत्राचा" कार्यक्रम असायचा, त्याची आठवण करुन दिलीस. लिहित रहा.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

»» @मंदार, खुप खुप आभारी आहे भावा...! धन्यवाद..
**********

»» @भुंग्या दादा, अरे तुझीच तर वाट बघत होतो की कधी तू कमेंट देतो म्हणून... ;) शेवटी आत्ता कुठे दिली... खुप खुप आभार रे भाऊ...! बरं तु तुझ्या ब्लॉगची साईडबार दुरूस्त करण्यासाठी काढलेलं कर्ज फेडण्यासाठी तुला कोण्या ब्लॉगर कडून मदत आली की नाही अजुन? वर महेंद्र काकांसाठी असलेल्या रीप्लायमध्ये याची माहिती आम्ही जनसामान्यांत पसरवली आहे. तरी तुला काही दयाळू मंडळी मदत करतील ही आशा...! ;) बाय द वे, थॅंक यू फॉर कमेंट...

**********

"बरंय त्या दुरदर्शनच्या सातच्या बातम्या माझा चालू करण्याचा विचार आहे. तसेच ऍन्करिंग(निवेदन) करण्यासाठी एक (फक्त) महिला निवेदिका (ऍन्कर) हवी आहे... इच्छुकांनी लेखी अर्ज तुमच्या ब्राउजरच्या ऍड्रेस बार मधील पत्त्यावर माझ्या नावाने पाठविणे...!"
आनंद पत्रे म्हणाले...

विशाल भाऊ,
छान (शालीतुन) जोडे.
हसता हसता पुरेवाट झाली.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@आनंद, धन्स भाऊ, तुमचीच किर्पा हाये...! ;)
कांचन कराई म्हणाले...

चांगल्या होत्या बातम्या :))

:))
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@कांचन ताई, थॅंकू थॅंकू... बातम्या चांगल्या होत्या?? मला नाही वाटत तसं... शेवटी आमच्या पत्रकार टीमचं वर्क ऑफ फिक्शन आहे हे!
अनामित म्हणाले...

मस्तच रे......
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@तन्वी जी, प्रतिसाद नोंदविल्याबद्दल मनःपूर्वक आभार! :)
अनामित म्हणाले...

बाबा रे ’ताई’ म्हणं ना....’जी’ जरा काय फारच जास्त होतय असं नाही का वाटतं!!!!!
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@तन्वी ताऽऽई, जो हुक्म, त्त्त्त्त्तऽऽऽऽऽन्वी त्त्त्त्त्त्ताऽऽऽऽई...!!!! ;-D

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre