"पद्म"ला ग्रहण...

» शनिवार, ३० जानेवारी, २०१०

कालच मंगेश पाडगावकरांनी संगमनेरमध्ये अशी खंत व्यक्त केली की, त्यांच्यासारख्या ज्येष्ठ कलावंतांना अजून कसं "पद्म" पुरस्कारांपासून डावललं जातं ते... असो. त्यांना अश्या पुरस्कारांची गरज नाही, हे सांगून त्यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवला.

संत चटवाल सारख्या एनाआरआय उद्योगपतीला (मोठ-मोठाली हॉटेलं आहेत त्याची विदेशात..), जो मागेच बॅंकेतील ९० लाख डॉलर्सची गफलत करण्याच्या गुन्ह्यामुळे तुरूंगवास भोगून आला आहे. त्याचं मागेच वक्तव्य आलं होतं की भारतात पण तो काही हॉटेलं काढणार आहे म्हणे.. त्याला खुष करण्याच्या नांदात तर त्याला "पद्म" दिला गेला नाही ना, अशी तीव्र नाराजी समाजाच्या प्रत्येक वर्गातून तसेच इंटरनेटवरील ट्विटरसारख्या सोशल साईट्सवर व काही ब्लॉग्जवर लोकांनी जाहीर केलेली दिसतेय... तसेच सैफ अली खान, लोकप्रिय आहे पण अजून तशी लायकी नसलेला अन सध्या सिनेमांमध्ये बिभत्स कृत्ये करणारा माणूस "पद्म"चा हक्कदार कसा होऊ शकतो याबद्दलही तीव्र साशंकता आहे.

मंगेश पाडगावकर, वि.दा. करंदीकर (ज्येष्ठ कवी), डॉ. श्रीराम लागू, अशोक सराफ (ज्येष्ठ अभिनेते) आणि अश्याच प्रत्येक क्षेत्रातील काही नामवंत व्यक्तींना अजूनही "पद्म"ने गौरवण्यात आलेले नाही.. याचं मला तीव्र दुःख आहे.. "पद्म" पुरस्कार प्रक्रियेवर गालबोट लागलंय, अन या पुरस्कारांवरून माझा समुळ विश्वासच उडालाय हे नक्की... शेवटी जो माणूस त्या-त्या क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अहोरात्र जगला, अन कष्टाचे चीज केले, त्याला त्याचे मानधन अन गौरव मिळत नसेल तर अश्या पुरस्कारांची नेमकी गरजच काय???

12 प्रतिक्रिया:

Mahendra म्हणाले...

नेमेची येतो पावसाळा, प्रमाणेच साला बादा प्रमाणे सरकारने काही लोकांची धुण्यासाठी म्हणुन (जगभर घाण करुन झाल्यावर त्यांना स्वच्छ करणे हे सरकारने स्वतःच्या अंगावर घेतले आहे) पुरस्कृत केलेला हा एक सोहळा आहे.
अगदी थोडे फार लोकं सोडता, एकही हकदार नाही या पुरस्काराचा. मग तो गेल्या वर्षीचा धोनी, हरभजन, हेलन किंवा या वर्षीचा चटवाल असो..
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@महेंद्र काका, अगदी बरोबर.. मला पण हेच म्हणायचं होतं...! बाय द वे, त्वरित अभिप्राय नोंदविल्याबद्दल आभार.
आनंद पत्रे म्हणाले...

काही दिवसांनी चांगल्या माणसांना हा पुरस्कार मिळाला तर लाज वाटेल त्यांना स्वत:ची :(
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@आनंद, बरोबर आहे... हा हा! ;)
सिद्धार्थ म्हणाले...

चटवालसारख्या लोकांना पद्म पुरस्कार दिला गेला आहे त्यामुळे ह्या पुरस्काराची किंमत आधीच खालावली आहे. आत्ता जर का मंगेश पाडगावकर, वि.दा. करंदीकर, डॉ. श्रीराम लागू, अशोक सराफ आणि अश्याच प्रत्येक क्षेत्रातील काही नामवंत व्यक्तींना ह्या लोकांना पद्म पुरस्कार मिळाला तर त्यांना चटवालसारख्या लोकांमध्ये बसवल्यासारखे होईल आणि तो त्यांचा अपमान आहे. बाबा आमटे जर भारत-रत्नचे मानकरी ठरू शकत नसतील तर ह्या पुरस्कारांची निवड करणार्‍या समितीची काय लायकी आहे हे कळते.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@सिद्धार्थ, मीसुद्धा पुर्णपणे सहमत आहे तुझ्या मताशी.. या पुरस्कारांचॆ जे मुळ हक्कदार होते, त्यांनाच डावलून नालायक लोकांना त्या पुरस्कारांनी गौरवल्याने त्या पुरस्कारांची गुणवत्ता अन प्रतिष्ठा कमी झालिय... त्यामुळे यापुढे ज्येष्ठ मंडळींना अशा पुरस्कारांनी गौरवनं म्हणजे त्यांचा अपमानच होईल!

प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल खुप आभार!
कांचन कराई म्हणाले...

पुरस्काराचा दर्जा घसरला आहे, हे खरेच पण पाडगांवकरांसारख्या ज्येष्ठ साहित्यिकाला आपल्या ज्येष्ठ्त्वाबद्दल सांगावं लागतं, हे खरं दुर्दैव! भारत एकीकडे आधुनिकतेने समृद्ध होता होता, दुस-या बाजूला सांस्कृतिकतेमधे दरिद्री होत चालला आहे कीकाय?
विशाल तेलंग्रे म्हणाले...

कांचन ताई, तू नमूद केलेला मुद्दा अतिशय गंभीर वाटतोय, यावर समजंस लोकांकडून चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

बाय द वे, अभिप्राय नोंदविल्याबद्दल खुप खुप आभार!
विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

'पद्म' ला पहिल्यासारखी शान राहिली नाही रे
आजकाल लायकी नसणाऱ्या लोकांनाही ते दिले जाते
यावेळीही तसच झालय
जीवनमूल्य
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@विक्रम, शानची गोष्टच सोड, आता तो पुरस्कार काही महान विभूतींना शोभेल तरी कसा यावर प्रश्नचिन्ह लागलंय... नविन पुरस्कार पद्धती चालू करावी लागेल बहुतेक आता...

प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल धन्यवाद!
PJ म्हणाले...

mala baryachada hech kaLat naahee kee sarakaracha aani puraskarancha kaay sambandh.

ameriket oscar jase film industry related association aahe ... tase bhaarataat asarakare sanghatana kaa naahee asale puraskar det.

sarakarala konatya chorana puraskar dyayachaa te deu det.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@PJ, एकदम सही बोललात... अशी सर्किटरी निर्माण होणं गरजेचं आहे ज्याद्वारे नेतेमंडळींचा अशा बाबतींमध्ये झिरो टक्के सहभाग असेल आणि अशा सर्किटरीच्या हातातच सर्व काही निर्णय घेण्याची संपुर्ण मुभा असेल.. अशी सर्किटरी तरी ट्रान्सपरण्ट कामे करतील का, याबद्दल तरी साशंकता आहेच...!

एनि वे, प्रतिसादाबद्दल आभार!

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre