आम्ही "शिरसोली"ला (ता/जि. जळगाव) होतो, ते जळगावपासून १० किमी लांब होते. अन "पद्मालय" (ता. एरंडोल, जि. जळगाव) हे जळगावपासून ४०-४२ किमी दूर आहे. म्हणजे आम्हाला तरी पण ३० ते ३२ किमी जायचे होते. जातेवेळी रस्त्यात गाडी पेट्रोलची टंकी फुल केली. साला रस्ता एकदम हाय-वे टाईप अन रस्त्यावर एवढी वर्दळ पण नव्हती, पण प्रविण भाऊजींची "हिरो होंडा करिज्मा" ३०-४०kmph च्या पुढे जातच नव्हती, अन अनिल भाऊजींची (ज्यांच्या पाठीमागे मी बसलो होतो), "हिरो होंडा स्प्लेण्डर प्लस" ७०-८०kmph या स्पीडने पळत होती. आम्ही पाच-पाच मिनिटांनी मागे वळून पाहू, तर ते आम्ही एखाद्या ठिकाणी थांबल्यावर दहा-एक मिनिटांनी दिसत होते, अन गाडी चालवत असतांना तर ते आम्हांला दिसतच नव्हते, एवढी त्यांची करिज्मा "फास्ट" पळत होती.....!
भटकंती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
भटकंती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
स्वगृह » भटकंती
जळगावची सफर - पद्मालय


दिवाळीनंतरची ट्रेक...


सन २००९ म्हणजे ह्या वर्षाची दिवाळी एवढी कंटाळवाणी गेली ना की बस्स....! एवढा बोअर मी कधीच झालो नव्हतो. दिवाळी अन भाऊबीजला माझ्या मामांच्या मुलाला (गौरवला) घरी बोलवून घेतले. पण तो घरी आल्यावर पण काही कंटाळा जात नव्हता. सलग ते दोन दिवस आम्ही ज्युस पीणं, पिक्चर्स पाहणं, अन पत्ते खेळणं यासारख्या कामांमध्ये घालवले. तो जातेवेळी म्हणाला की यार खुप बोअर होतयं आणि लगेच दुसर्या दिवसापासून कॉलेज चालू होणार असल्याने अजुनच खुपच बोअर होईल, त्याकरता आपण गावाकडे २-३ दिवस जाऊन येऊ. तसा मला त्याचा विचार पटला, पण यावेळी मी कुठेही फिरण्याची प्लॅनिंग केलेली नव्हती. पण दोघांनी घरच्यांशी विचारविनिमय करून जायचे पक्के केले. आमचे, मामांचे आणि मावश्यांची गावे ही सर्व जालना अन विदर्भाच्या (बुलडाणा) बॉण्ड्री वर आहेत. त्यामुळे सगळ्यांकडे जाणे तसे खुपच सोयिस्कर होते. लगेच दुसर्या दिवशी आम्ही दोघे गावाकडे निघालो. मामांनी सांगितले होते की जमले तर अजिंठा (अजंता केव्ह्ज), लोणार (खार्या पाण्याचे सरोवर) आणि जर जावसं वाटलचं तर शेगावला (गजानन महाराज) जाऊन या. सोबत ६००-७०० रूपये घेऊन आम्ही लगेच दुसर्या दिवशी प्रवासास निघालो. वेळेवर बस मिळाली. औरंगाबाद - बुलडाणा/मलकापूर/शेगाव गाड्या असतातच. सगळ्यांचा रूट एकच, तो म्हणजे औरंगाबद-सिल्लोड-भोकरदन-धाड-बुलडाणा-शेगांव/मलकापूर! आम्ही शेगाव गाडीत बसलो अन जायला निघालो. आम्ही या गाडीने डायरेक्ट शेगावला गेलो असतो, पण दोघेही प्रथमच चाललो असल्याने बिगर-माहितीचे तिथे जाणे योग्य नव्हते अन नातलगांकडे गेलो नाही तर त्यांना राग यायचा फुकटच, म्हणून डायरेक्ट शेगावला जाण्याचं कॅन्सल केलं. दोन-अडीच तासांनी धाड या स्थानकावर उतरून आम्ही आमची पुढची वाट धरली.
Blogger द्वारे प्रायोजित.