"Lazarus" - नेव्हर लुज एनिथिंग यु टाइप इन्टू अ वेब फॉर्म अगेन !

» गुरुवार, १० सप्टेंबर, २००९

जर तुम्ही मोझिला फायरफॉक्स वापरत असाल तर ही खुप महत्वाची गोष्ट मी इथे नमूद करू इच्छितो. नेटवर असताना आपण कित्येक वेळा अनेक ठिकाणी कॉमेन्ट, पोस्ट, नोंदणी फॉर्म इत्यादींच्या स्वरूपात काहीना-काही लिहीत असतो. कोणाला असे वाटेल की आपण जे एवढे काही इथे लिहीतोय (माहिती भरतोय), ती डिलीट होऊन (किंवा ऊडून) जावी ! कोणालाच वाटणार नाही...!!! पण असं नेहमी होतं.... आपल्याला नको असलं तरी आपल्यासोबत दैनंदिन असे प्रसंग घडतातच.....!!! लाइट गेली म्हणा, बॅटरी संपण, सर्वर टाइम्ड आऊट, सर्वर नॉट फाउन्ड, मोझिला क्रॅश, किंवा अन्य अजुन काही कारणे असतील, जर असं आपल्या बाबतीत घडलं, आणि तेही जर काही इम्पॉर्टंट डेटा भरताना... तर मग ? हं, मान्य आहे काही ठिकाणी जसे की ब्लॉगर वर ब्लॉग एडिटर मध्ये ड्राफ्टच्या रूपात बॅक-अप असतो... हा तर एक अपवाद आहे. पण जर ब्लॉग टेम्प्लेटच्या एच.टी.एम.एल. एडिटर मध्ये काही चेन्जेस करायचे झाले, तर परत-परत टेम्प्लेट कॉपी डाऊनलोड करणं जरा अवघड आणि कंटाळवाणं असतं... आणि आपल्याला आत्ताच केलेले बदल पुर्ववत स्थितीत आणायचे झाल्यास पुढील प्रोसेसेस अजुनच वेळ-खाऊ आणि कठिण होत जातात.

पण, जर तुम्हाला कोणी सांगितले, की तुम्ही जिथे असाल, आणि जे हवं असेल त्याचा लिखाणाचं बॅक-अप एका क्लिकसह परत मिळवू शकता...! तुम्ही विश्वास ठेवाल काय...? कदाचित प्रथमदर्शनी नाही ठेवणार तुम्ही विश्वास...! अहो, पण हे सत्य आहे.... तुम्ही असे एका टिचकीसरशी करू शकता. आणि ते पण कुठेही न जाता... तिथल्या तिथे... लगेच... ऑन दि स्पॉट...!!!


आता तुम्ही विचार करत असणार ते नेमकं कसं शक्य आहे...? म्हणूनच तर सुरूवातीला मी तुम्ही जर मोझिला फायरफॉक्स वापरत असाल, तर खास तुमच्यासाठीच आहे... म्हणून नमूद केलयं.... तर यासाठी तुमच्याकडे मोझिला फायरफॉक्स वेब ब्राउजर असणे गरजेचे आहे. तर त्यात तुम्हाला माहित असेलच नविन ऍड-ऑन कसे प्रस्थापित करायचे असते ते ? बरं जाऊ द्या, सर्वांनी, खास करून नवख्या मंडळींनी खालील कृती व्यवस्थित करा:


) आपले मोझिला फायरफॉक्स वेब ब्राउजर - -. आवृत्ती असणे आवश्यक. (मोझिला फायरफॉक्स मराठी आवृत्ती . डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.)
२) आता त्यात आपल्या माउसचे राइट-क्लिक बटन दाबून ही लिंक नविन टॅब/विन्डो मध्ये उघडा.
) आता त्यात "Add to Firefox" असे बटन दिसत असेल, त्यावर क्लिक करा.
) नंतर तुम्हाला "Lazarus: Form Recovery" हे ऍड-ऑन स्थापन करायचे का ? असा प्रश्न विचारणारी एक पॉप-अप विन्डो दिसेल, त्यातील स्थापन करा वर क्लिक करा.
) जेव्हा ते ऍड-ऑन स्थापित होईल, त्यानंतर तुमचे मोझिला ब्राउजर बंद करून पुन्हा चालू करा.
) आता तुमचे ते ऍड-ऑन प्रतिष्ठापित झालेले असेल.
) यानंतर एखाद्या ठिकाणी काही तरी लिहा, उदा. एखाद्या ठिकाणी कॉमेंट टाका, आणि ती खोडून टाका.
) आता त्यात आपल्या माउसचे राइट-क्लिक बटन दाबून "Recover form" किंवा "Recover text" क्लिक करून तुम्हाला असलेले बॅक-अप क्लिक करा. (बाजुच्या चित्रात दर्शविले आहे... याबद्दल....)
) आले ना आपले हटवलेले लेखन परत....!!!!!!
१०) आता नो झंजट, नो रोना-धोना... ओन्लि एन्टरटेन अबाउट बॅक-अपिंग युअर इंपॉर्टंट डेटा.... ऍण्ड ब्रीथ साय ऑफ रिलीफ.......!!!!

हो आणि जर याबद्दल तुम्हाला काही अडचणी असतील किंवा आपल्याला ही माहिती आवडली असेल तर त्याबद्दल खालील कॉमेण्ट-बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका.....!!!

आपला विशाल तेलंग्रे...

2 प्रतिक्रिया:

विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

धन्यवाद

उपयुक्त माहिती विशाल
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@विक्रम एक शांत वादळ, धन्यवाद विक्रमजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल...
आता जर लजारस नसलं ना की लिहायला कंटाळा येतो दुसर्‍यांच्या संगणकावरून, त्यामुळे माझचं लॅपटॉप युज करतोय हल्ली यामुळे....

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre