ब्लॉगला 'Favicon' प्रतिमा जोडण्यासाठी मार्गदर्शन...

» गुरुवार, १७ सप्टेंबर, २००९

काय तुम्ही तुमच्या ऍड्रेसबारवर तुमच्या ब्लॉगच्या/साइटच्या अगोदर ब्लॉगरच्या लोगो ऐवजी तुमचा स्वतःचा लोगो, फोटो लावू इच्छिता, जसे की खालील प्रतिमेत दिसतयं....?
 
ठिक आहे, या अशा लोगोला फ़ेविकॉन (Favicon) लोगो म्हणतात. तो टाकण्यासाठी तुमच्या डॅशबोर्डवरून टेम्प्लेट टॅबवरून एडिट HTML मध्ये जाऊन विजेट टेम्प्लेट एक्स्पाण्ड करून घ्या. त्यानंतर ते टेम्प्लेट डाऊनलोड करून बॅक-अप साठी जतन करून ठेवा. म्हणजे जर तुम्हाला नंतर वाटलं की काहीतरी चुकतयं, तेव्हा ते पुन्हा अपलोड करू शकाल.
बरं आता तुमच्या ब्राऊजरमध्ये 'ctrl+F' ही की दाबून पुढील कोड शोधा:
<title><data:blog.pageTitle/></title>

आता त्याखाली लगेच पुढीलपैकी कोणताही एक कोड टाका:




  • <link href='URL of your icon file' rel='shortcut icon' type='image/vnd.microsoft.icon'/>

किंवा

  • <link href='URL of your icon file' rel='shortcut icon' type='image/x-icon'/>

वरील कोडमध्ये लाल रंगाने दर्शविलेल्या ठिकाणी तुमच्या लोगो इमेजचा पत्ता टाका, जेथे तुम्ही ती प्रतिमा साठवली आहे. (प्रतिमा .ico या एक्स्टेन्शनचीच असावी.)

अद्ययावत: जर तुम्हाला इतर एक्स्टेन्शन मध्ये फ़ेविकॉन इमेज टाकायची असेल तर पुढील कोडींग युज करा.
खात्री करा की इमेजची साइज ही १६ x १६ किंवा ३२ x ३२ या डायमेन्शनमध्येच आहे.
      १) जर तुमच्याकडे .png या फॉर्मेटमध्ये इमेज आहे तर पुढील कोड वापरा:
         <link href='URL of your icon file' rel='shortcut icon' type='image/png'/>
      २) जर तुमच्या .gif या फॉर्मेटमध्ये इमेज आहे तर पुढील कोड वापरा:
         <link href='URL of your icon file' rel='shortcut icon' type='image/gif'/>

आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या लाल रंगाने दर्शविलेल्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या इमेज फाइलचा वेब पत्ता टाकायचा आहे, जेथे तुम्ही ती फाइल अपलोड केलेली आहे.

अद्ययावत: या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रकारचे लोगो अन इमेजेस मिळतील जसे की कार्टून्स, हार्ट इमेजेस, नेशन फ्लॅग्ज इत्यादी.... येथुन तुम्हाला हव्या असलेल्या इमेजचा पत्ता कॉपी करून तुम्ही वरील कोडांमधील लाल रंगाने दर्शविलेल्या ठिकाणी पेस्ट करा किंवा तेथे लगेच त्या इमेचा कोड जनरेट करून मिळेल तो <title><data:blog.pageTitle/></title> या कोडखाली पेस्ट करा.

इमेज फाइल अपलोड करण्यासाठी अद्ययावत: हं ही महत्वाची बाब आहे म्हणून मेन्शन करतोय. तुम्हाला तुमच्या फाइल्स अपलोड करण्यासाठी गूगल एक महत्वाची सेवा पुरविते, ती म्हणजे 'Google sites' जी तुम्हाला http://www.sites.google.com/ येथे जाऊन तुमच्या जीमेल आयडीद्वारे रेजिस्टर करता येईल. त्यानंतर तुम्हाला http://sites.google.com/site/yourname अशा प्रकारचा पत्ता दिला जातो. त्यानंतर येथे तुम्ही 'Create page' मधून 'File Cabinet' या पर्यायाद्वारे तुम्ही तुमचे नविन पेज तयार करून घ्या व ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या फाइल्स या तुमच्या नविन तयार केलेल्या गूगल साइटवर अपलोड करण्याची अनुमती असते. आता तुमचे 'Favicon' इमेज अपलोड करा अन त्यानंतर त्याचा वेब पत्ता राइट क्लिक करून मिळवा. किती सोपं आहे ना......!!!!!

बरं अजुनही जर काही अडचणी, शंका असतील किंवा माझे जर काही चुकले असेल, तर त्याबद्दल खाली प्रतिक्रिया जरूर टाका.

जय महाराष्ट्र....!

4 प्रतिक्रिया:

मोगरा फुलला म्हणाले...

हां! हे कसं नीट समजलं. खूप ठिकाणी वाचलीय ही माहिती पण तो रूट फाईल प्रकार काय होता कळलंच नव्हतं. आता समजलं. आभार!
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@मोगरा फुलला, प्रतिक्रियेबद्दल आपले मनापासुन आभार, माझ्या मराठीत लिहिण्याचं काहीतरी सार्थक झालं तर! मी हा एक्सपेरिमेन्ट प्रथम स्वतः सक्सेसफुली करून बघितलाय अन नंतर ही पोस्ट टाकलिय, तेव्हा त्यात काही फॉल्ट असण्याचं कारणदेखील नाही..!
Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

मी आज हे करून पाहिलंय. माझा ब्लॉग बघ.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@कांचन कराई, ताई मी बघितला तुझा ब्लॉग, तु लावलेलं ते हिरव्या रंगाचं "मोगरा फुलला"चं फेविकॉन व्यवस्थित वर्क करतयं! आणखी काही सजेशन्स असतील तर जरूर कळव.

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre