टॅगा - टॅगी

» शुक्रवार, २५ डिसेंबर, २००९

दोन दिवसांपासून मी बिगर अंघोळीचा शिर्डी, शिंगणापूर वगैरे वगैरे करत (आय मीन ह्या ठिकाणी मित्रांसोबत फिरत होतो), अन आत्ता मी घरी आल्यावर कुठे अंघोळ केली अन नेट उघडलं, तेव्हा माझ्या ब्लॉगवर कांचन ताईनं मला टॅगलंय, अशी प्रतिक्रिया दिसली... ही टॅग-टॅगीची नेमकी भानगड काय आहे, ते मला आत्ता (म्हणजे ही पोस्ट लिहीत असतांना) देखील कळलेली नाहिये, तरी पण हौस म्हणून इतरांच्या टॅगा-टॅगीच्या पोस्टची मी ही कॉपी मारतोय.... कोणाच्या प्रतिक्रिया मिळाल्यावर कळेलचं....

***********************************************************************************

1.Where is your cell phone?
 खिडकीत आहे, आमच्या घरी रेंज फक्त खिडकीतच येते.... अन नेहमी तेथेच असतो, खालून दोन पिना जोडलेल्या असतात.. एक २४ घंटे चार्जिंग करण्यासाठी अन दुसरी युएसबी थ्रु माझ्या लॅपटॉपला जोडण्यासाठी! (कारण मी मोबाईलवरून डायल-अपद्वारे इंटरनेट वापरतो...)

2.Your hair?
कटिंग करायला एक ते दिड महिना झाला असेल, केसं पोरींवानी दिसताहेत वाटतं... संध्याकाळीच येतो बारीक करून...  अन या वयातच माझे केसं ढवळे (आय मीन पांढरे) व्हायला लागलेत... चाटी (आय मीन "चप्पी") करावसं वाटतंय...!! ;)

3.Your mother?
झेड टीव्हीवरील ’त्या’ एकता कपूरच्या भंगारचोट मालिका पाहून पाहून आता झोपलियं, हं, पण मला नुसतं एकट्यालाचं भाजी-पोळी करूनच झोपलियं...

4.Your father?
थंडी वाजत होती म्हणून मोठी जाड-जूड रग अंगावर घेऊन आत्तापर्यंत म्हण्जे दुपारच्या अडीच वाजेपर्यंत झोपलेले होते, आता गच्चीवर ऊन्हात जाऊन बसलेत... त्यांना दादा कोंडक्याचे गाणे अन जास्तकरून लावण्या आवडतात...

5.Your favorite food?
दाबेली... त्यातले काय ते भाजलेले शेंगदाणे, डाळींबाचे दाणे अन सोबतची टमाट्याची चटणी (केच-अप)... अह्ह्हा... काय टेस्ट असते... अन सुगंध पण तसाच... ;)

6.Your dream last night?
लास्ट नाईटला आम्ही (मी अन माझा मित्र दिपक) फुल नाईट मारली, त्यानं काल तोशिबाचा मस्त लॅपटॉप घेतला (तसा मीच घेऊन दिला त्याला...!) अन त्यावरच रात्रभर आम्ही प्ले-स्टेशनचे गेम्स खेळत बसलो... आता डोळ्यांची एवढी आग होतेय ना.... बरं झालं, नाहीतर पप्पा म्हटले असते की, ढोसून तर आलं नसेल हे पोरगं... कारण माझे डोळे झोप न झाल्याने लालभडक झालेत... अन यामुळे स्वप्नाचा तर इथे काही संबंधच येत नाही...!

7.Your favorite drink?
 सगळे कोल्ड-ड्रिंक्स... आत्ता हिवाळ्यात थंडगार बर्फ झालेल्या कोल्ड-ड्रिंकच्या बाटल्या तोंडाला लावायची मजा काही औरच.....

8.Your dream/goal?
झोप येऊन राहीली, अन कुठं पाहता ड्रिम अन गोल.... तरी पण स्पेसमध्ये जायचं किंवा नावाजलेला सॉफ्टवेअर इंजिनिअर बनणं, हे माझे एक्स्ट्रीम गोल्स आहेत... पण अशीच जर कामगीरी राहीली, तर मात्र एखाद्या झेरॉक्सवाल्याच्या दुकानावर काम करावं लागेल....!!! ;)


 9.What room are you in?
वरच्या मजल्यावरची पुढची रूम... झोपायला मात्र आम्ही सगळे एकाच रूममध्ये झोपतो...

 10.Your hobby?
कुठतरी नुसती खटपट, काड्या करत राहणं, जेणेकरून बोअर होणार नाही, जसं की मी नेहमी भुंग्याच्या ब्लॉग-टेम्प्लेटची कॉपी मारण्याच्या मागे लागलेलो असतो...!!! ;)

11.Your fear?
यावेळेस केटी बसणारच... महेंद्र काकांनी मला आधीच बजावलं होतं, पण जे व्हायचं ते होणारच... भिती वाटतेयं....

 12.Where do you want to be in 6 years?
 मम्मी-पप्पा, गुड्डी (माझी लहान बहीण, प्रियंका, तिला आम्ही पहिले बई म्हणत होतो, आता गुड्डी/गुड्ड्या/बुड्ढ्या काहीपण म्हणतो...!!!) यांच्यासोबत.....

13.Where were you last night?
दिप्याबरोबर.... त्याच्या होस्टेलवर...

14.Something that you aren’t diplomatic?
मित्र-मंडळी.....

15.Muffins?
 चहातच मजा येते, बिना-चहाचं नुसतं बेचव लागतं.... काय योगा-योग, चहा पण आला अन डिलक्सचे ब्रेड पण.....!!!! ;)

 16.Wish list item?
नॉट मच इंटरेस्टेड, पण नोकियाचा ई-सिरीज चा एखादा मोबाईल, नविन लॅपटॉप मिळालं तर कीती बेस्ट होईल ना....???

 17.Where did you grow up?
गावाकडं, मु.पो. भारज बु.॥, जाफ्राबाद तालुका अन जालना जिल्हा.....

18.Last thing you did?
मोबाईलवरून आलेला गुगल ग्रुपचा भंगार मॅसेज वाचला.... डीलीट पण मारला...!!

19.What are you wearing?
भोंगळा थोडीच बसणार हे.... काहीतरी घालणं पडणचं ना....!!!(?) ;)

20.Your TV?
म्हणजे काय, टीव्हीची कंपनी की आवडते कार्यक्रम....?? जाऊ द्या, दोन्ही सांगूनच टाकतो... फिलीप्सची "वरदान" हे मॉडेल नाव असलेली आय-फाय अन फ्लॅट टीव्ही... --- नॅट जिओवरील "नेकेड सायन्स", "जेल्ड ऍब्रॉड", डिस्कव्हरी वरील "मॅन व्हर्सेस वाईल्ड", "सर्व्हायवरमॅन" "डिस्कव्हरी शोकेस", स्टार माझावरील "सात-बाराच्या बातम्या", हंगामा वरील चुहे’बिल्ली का ३डी हंगामा- "ट्विस्टेड व्हिस्कर्स शो", निकवरील ते ढेबर्‍या अस्वलाचं कार्टून, चॅनेल व्ही वरील "डेअर टू डेट" हे कार्यक्रम आपले फेवरिट आहेत....

 21.Your pets?
 माझ्याकडे नाहीत... :( हं, तसं रोज जेवण करत असतांना एक मांजड्ड नुसतं म्याव म्याव करत येतं, अन त्येला किती पण शुक शुक केलं तरी ते पळत नाही अन घाबरत पण नाही... त्यालाच पाळायचा माझा विचार चालू आहे.....!!! ;)


 22.Friends?
मलाच माहित नाहीत.... तुम्ही माझे मित्र असाल तर तुम्हीच मला लक्षात ठेवा, मी गजनीचा दूरचा रीश्तेदार आहे....!! ;)

23.Your life?
एन्जॉईंग एवरी मुमेन्ट ऑफ लाईफ.....

 24.Your mood?
 उह्ह्हूं.... चहात साखर खुपच कमीय, तोंड पांचट झालंय...!!!

25.Missing someone?
 येह्ह, मिसिंग समवन फ्रॉम हार्ट....

26.Vehicle?
आपुण के पास कोई भी खटारा नहीं हे....!!!

27.Something you’re not wearing?
करदोडा... भाऊबिजेला मिळतो ना, तो...!!! हं मी हिंदूच आहे, पण तो कमरेत लयच टोचतो, अन बेल्ट घातल्यावर तर लयचं.... त्याची गाठ......!!!!

28.Your favorite store?
बुटं मिळण्याचं दुकान, जिथं नाईकी, अदिदास, पुमा, रीबोक अशा ब्रॅंडेड कंपन्यांचे शुज मिळतात... बिग बजारमध्ये अन विशाल मेगा मार्टमध्ये तर आल्तू-फाल्तू ब्रॅंडचे अन थर्ड क्लास शुज असतात... :)


29. Your favorite color?
भगवा....!!! (शेवटी माझं रक्त त्याच्याशी रिलेटेड आहे...!)

 30.When was the last time you laughed?
परवा, शिर्डीला, मंदिराच्या संस्थानात जेवन केल्यानंतर हात धुवायला बेसिन शोधत होतो, वर लिहीलेलं असतांनासुद्धा, जिथे भांडे धुतात, तिथे हात धुवायला गेलो, एक मित्र (संदिप) अन ड्रायव्हर मामांसोबत... (म्हणजे तसं मीच त्यांना नेलं होतं...!!!) अन हात धुवून आल्यावर टॉयलेट जायचं होतं, संदिप अन मी ह्या हात धुवायच्या घटनेबद्दल हासत होतो, लक्ष नसतांना आम्ही "लेडिज टॉयलेट" घुसणार, तोच दरवाजातून येणारी मुलगी पाहून तर माझी दातखिळीच बसणार होती....  काय सांगू.... खुप हसलो होतो आम्ही(मी)....!!!! ;)


 31.Last time you cried?
मम्मीनं दहावीत पप्पांच्या दगडी बुटाखाली अन बेल्टखाली मला बदडलं होतं, तेव्हा.....!!! ;)

 32.Your best friend?
माझा आयटम नोकिया ३११० क्लासिक फोन.... गडी माझ्यासाठी खुप काही करतो, त्याची बॅटरी खुपच फुगलियं, बदलणं पडती वाटतं....!

33.One place that you go to over and over?
माझा जीमेलचा इनबॉक्स..... ब्लॉगवर नविन कॉमेन्ट कधीही येऊ शकते, तेथूनच मला सगळे काही नोटिफिकेशन्स कळतात.

 34.One person who emails me regularly?
no-reply@xyz.com.......!!!!! ;)

35.Favorite place to eat?
थाट बाट.... चांदीच्या ताटात कितीमोठे राजस्थानी पक्वानं खायला भेटतात... औरंगाबादेत विवेकानंद कॉलेजला खेटूनच आहे... अन समर्थनगरच्या नोकिया केअरसमोरील वडा-पाव सेंटरवाला, याच्याकडची दाबेली आपली पहिली पसंद आहे....


***********************************************************************************

हुश्श्श, झालं वाटतं... आता मी पण कोणाला तरी टॅगणार..... आणि ती भाग्यवान लोकं आहेत.....
कांचन ताई, भुंग्या दादा, महेंद्र काका, मंदार [भाऊ!], पंक्या, अनिकेत दादा, सलिल कुलकर्णी, प्रभास गुप्ते, दीपक परूळेकर, आनंद पत्रे, अक्षय दादा, दिप्या......

26 प्रतिक्रिया:

Veerendra म्हणाले...

मस्त रे सहीच लिहिलयस .. प्रभास कडून लिंक मिळाली तुझ्या ब्लॉगची .. भेटू परत .. :)
╚» विशाल तेलंग्रे «╝ म्हणाले...

»» @वीरेंद्रजी, अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार...
ही पोस्टमी तशीच टाईमपास म्हणूनच लिहीलीयं... बरं आहे, जरा हटके असल्यामुळे तुम्हाला आवडली...
»» प्रभास काकांमुळे आपली ओळख झाली, यापुढे आपली ट्विटरवर मैत्री वाढेलच, यात शंका नाही...
अनामित म्हणाले...

फार छान टॅग..मराठीब्लोग्स.नेट वर ब्लॉग सापडला तुझा खूप छान लिहलय..Keep it up
(Hope u don mind are ture kela mhanun..savay aahe mala ashi ekeri naav haak marayachi)
╚» विशाल तेलंग्रे «╝ म्हणाले...

»» @सुहास काका, येथे बहुतेकजण मराठीब्लॉग्ज.नेट वरूनच येतात, अन मला येथे बहुतेकजण "विश्ल्या" म्हणतात (म्हणूण ओळखतात...!!!) अन मी तसा लहान आहे आणि त्याच लायकीचा पण आहे...
»» अभिप्रायाबद्दल धन्यवाद! ;)
अनामित म्हणाले...

लय भारी लिहवलात कि राव तुमी! लई बेस झालय बर का? दाबेली तर लई भारी लागते. मला बी लई आवड्तीय बगा. ताई चा ह्यो भाऊ झिपऱ्या वाढवून राह्यला म्हनं. विशल्या कोनाला तरी मिस का काय ते करितो म्हने तू. आर गावाकड ये बग झिपरी कशी बदाबदा रडतीया तू हे लीवलेस
त्यासाठी.....आर आर शहरात जाऊन नको त्या फंदात पडू नकोस बाबा!!! गप गुमान घरी रहाव.. मस्त लिवलस, झिपरी पण खुश झाली बग. ताई म्हणून
मीच पटीवल तिला.. आता असाच लिवत राहा.
╚» विशाल तेलंग्रे «╝ म्हणाले...

»» @अनुक्षरे, ताई, मी तं हैराण झालो तोही अशी भाषा वाचून, मला वाटलं मस्कतला जाऊन मस्त फाड फाड पुण्याच्या लोकायसारखी शुद्ध भाषा बोलत असशिल, पण त्वा तं कमालचं केली... ;)
»» अन ती झिपरी..., ती गावाकडची नहिये, इकडचीच हाये... पण मी तिला कहून मिस करू, आत्ता मव्हं सेकंड ईयर चालूय, अन तिला मी दहावी(मॅट्रिक) झाल्यापसून पाह्यलं बी नहीये... मी दुसरंच कोणाला तरी मिस करत होतो, अन मपलं अजुन वय नहिये हे, झिपर्‍या-झुपर्‍या पोरींला मिस करत बसाचं... आता मी बी कटिंग करून आलोय तव्हाचं (मी झिपरा नही, चाटी हाये)...!! ;) अन तशी एखांदी भेटली बी ना, तं तिला पहिले तुलाच बोलायला लाविन...
»» प्रतिक्रिया टाकल्याबद्दल थांकू_(मनःपूर्वक आभार...!!!) ;)
अनामित म्हणाले...

छान लिहिलंय.. :)
╚» विशाल तेलंग्रे «╝ म्हणाले...

»» @महेंद्र काका, अभिप्रायाबद्दल आभार...
»» तुमच्या ब्लॉगवर टॅगिंगबद्दल तुम्ही पोस्ट टाकलेली आहे का? असेल तर त्या पोस्टची लिंक मला हवी होती...
Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले...

जमलंय बरं...
(कधी कधी आयुष्याकडे सीरियसली पण पाहत जा रे).
╚» विशाल तेलंग्रे «╝ म्हणाले...

»»@पंक्या! तुझा आदेश आत्तापासूनच पाळतो... मला या अतिशय वाईट असणार्‍या जगात आपण जोपर्यंत याप्रमाणे सोबत आहोत, तोपर्यंत असंच जागं राहण्यास मदत करत जा...
»» तुझ्या अनमोल अभिप्रायाबद्दल अभिप्रायाबद्दल धन्यवाद...
Anand म्हणाले...

फ़र्मास! मला टॅगल्याबद्दल धन्स!!!
इथे पोस्टलयं
http://manatkayaahe.blogspot.com/2009/12/blog-post_24.html
╚» विशाल तेलंग्रे «╝ म्हणाले...

@आनंद पत्रे काका, प्रतिक्रियेबद्दल धन्स...!!! ;)मी आत्ताच वाचतो तुमची पोस्ट...
Anand म्हणाले...

काका ?
अरे मी तुझ्या पेक्षा मोठा असलो तरी काका ? अरे - तुरे चालेल मला.
प्लीस :)
╚» विशाल तेलंग्रे «╝ म्हणाले...

@आनंद, शेवटी तुम्ही माझ्या वडिलांसारखे, मान राखण्याच्या हेतूने मी तूम्हाला परस्पर काका संबोधले. तसा मी महेंद्रजींना पण काकाच संबोधतो. हां पंकज दादाने तुमच्यासारखा त्याला दादा म्हणण्यावर आक्षेप घेतला होता, तेव्हापासून मी त्याला पंक्या म्हणतो. हं जर तुमची अशी इच्छा असेल, तर नाइलाजाने तुम्हाला पण मी एकेरी नावाने संबोधेल, शेवटी तुमची(आय मीन तुsssझी???) खुशी/समाधानचं माझं कर्तव्य आहे... :)
अपर्णा म्हणाले...

विश्ल्या...लै झ्याक लिवलंस...
असंच फ़िरत फ़िरत आले आणि म्हटलं अरे ह्यो पन एक टॅगवालाच दिसतोय..... आनि हो लै गोंधळ व्हायच्या आत सांगते तू बी मला अपर्णाच म्हन....त्येच बरं वाटतं.....
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@अपर्णा, आभारी हे, इथे सरळ-सरळ म्हराठी कोणालाच बोलता यत नही वाटतं... अपर्णा..(???) तु बी त्यायच्यामंधलीच एक बरं... अशी म्हराठी कोणाला कळ्ळी तर नवलच...!!! ;)
shinu म्हणाले...

खुपच छान.....भुंग्याच्या ब्लॉगवरून ही लिंक मिळाली. मस्त झालाय टॅग. वाचताना धमाल आली. आता नियमित भेट देत जाईन ब्लॉगला.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@शिल्पा (शिनू) ताई, अभिप्रायाबद्दल आभार... तुझे नेहमीच स्वागत आहे... मी ही तुझ्या ब्लॉगला भेट देत जाईन.. भुंग्या दादामुळे आपली लिंकिंग झाली, दादाचेही आभार...
shinu म्हणाले...

तू काय रे सगळ्याम्ना "ताई", "दादा" बनवून टाकतोयस? असं इतक्या झपाट्यानं करशिल तर "मामा" बनशिल नां बाबा. तेंव्हा जरा उत्साह आवर. :) गंमत केली रे. गंमत मानून घे.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@शिल्पा ताई(!), ;-) खरंय...!!! ;-D
कांचन कराई म्हणाले...

रोज जेवण करत असतांना एक मांजड्ड नुसतं म्याव म्याव करत येतं, अन त्येला किती पण शुक शुक केलं तरी ते पळत नाही अन घाबरत पण नाही.त्यालाच पाळायचा माझा विचार चालू आहे.

आवडलं. फक्कड टॅग लिवलेत.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@कांचन ताई, ते मांजड्ड सालं दिसतच नही आजकाल... कुठं मेलं काय महित...! जाऊ दे... तुला आवडलं बरं झालं... थॅंकू... ;)
Bhushan म्हणाले...

"समर्थनगरच्या नोकिया केअरसमोरील वडा-पाव सेंटरवाला," म्हणजे भोला वडा पाव का ?
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@भुषण,

ह्म्म, त्योच त्यो भोला वडा-पाव वाला... शिवाय लकी ज्युस सेंटरवालाही माहित असेलच की?
tejas.chimate म्हणाले...

मस्त मिव्हतो राव विशल्या तु...
बाकिचे तुला हेच म्हणतात म्हणुन मि पण म्हटल ..
.
बाकि मि नविनच आहे ..ह्या तुमाच्या bolg नामक जगतात .त्यामुळे आता हि पोस्ट वाचायला जमल..
छान लिव्हतो राव तु...आवडल आपल्याला..
हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)a म्हणाले...

हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)aहे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)aहे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)aहे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)aहे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)aहे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)aहे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)aहे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)aहे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)aहे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)aहे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)aहे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)aहे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)aहे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)aहे एकदम भारी . डोळ्यास

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre