ब्लॉगरवरील "टॉप नेव्हिगेशन बार (Navbar)" कशी लपवावी आणि काढून टाकावी?

» मंगळवार, १५ डिसेंबर, २००९

ब्लॉगरच्या "XXX.ब्लॉगस्पॉट.कॉम" डोमेनवर किंवा ब्लॉगरने होस्ट केलेल्या पण कस्टम डोमेन असलेल्या साईटवर ब्लॉग तयार केल्यानंतर तेथे ब्लॉगच्या सर्वात वर नॅव्हबार किंवा नेव्हिगेशन बार किंवा बॅनर दिसते. या नॅव्हबार वर "सर्च ब्लॉग" टेक्स्टबॉक्स, "फ्लॅग ब्लॉग" - अपरिहार्य ब्लॉग कन्टेन्ट बद्दल सुचित करण्यासाठी, "पुढील ब्लॉग" - ब्लॉगरवरील दुसर्‍या एखाद्या ब्लॉगला भेट देण्यासाठीची रॅण्डम लिंक येथे असते, तसेच नविन ब्लॉग तयार करण्यासाठी आणि साइन इन साठीच्या लिंक्स या नॅव्हबार असतात. (खालील प्रतिमा पहा.)



तुमच्या साईटला/ब्लॉगला भेट देणार्‍या बहुतेकांना ती नॅव्हबार मुळीच उपयोगी ठरत नाही. उलट त्या बारमुळे तुमचा ब्लॉग विचित्र दिसतो किंवा त्या बारसाठी अनावश्यक जागा गेलेली असते. पण तुमच्या ब्लॉग टेम्प्लेटच्या CSS मध्ये थोडेफार बदल करून तुम्ही ती नॅव्हबार, तुमच्या ब्लॉगवर लपवू शकता. हे अगदी १ मिनिटात होणारे आहे आणि यात अवघड असे काहीही नाही.


स्टेप बाय स्टेप प्रोसिजर:
  • ब्लॉगरला लॉग-इन व्हा.
  • डॅशबोर्ड वरून लेआउट सेटिंग्ज > Edit HTML या टॅबवर क्लिक करा.
  • आता तुमच्या इंटरनेट ब्राउजरच्या 'Edit' मध्ये जाऊन 'Search' वर क्लिक करा किंवा 'ctrl+F' ही शॉर्टकट की वापरा आणि त्या पुढील कोड शोधा.
                           ]]>

                             किंवा

                           /* Variable definitions
====================


                           किंवा

                           </style>
  • वरीलपैकी कोणताही कोड असलेल्या लाईनच्या आधी किंवा लगेच वर पुढील कोड टाका.
                          #navbar { display: none; }

                          किंवा

                           #navbar-iframe { display: none !important; }
  • आता 'Save Template' वर क्लिक करण्यापुर्वी 'Preview' वर क्लिक करून तुम्ही केलेले बदल व्यवस्थित झालेत का ते बघा, म्हणजेच तुमच्या ब्लॉगव्रील नॅव्हबार नाहिशी झालिय का ते बघा.
  • काही वेळा जर तुम्ही ब्लॉगरने दिलेल्या क्लासिक टेम्प्लेट्स पैकी एखादे वापरत असाल तर नॅव्हबार लपवल्यानंतर त्या नॅव्हबारच्या ठिकाणी गॅप (मोकळी जागा) तसाच राहतो. तो गॅप लाल, पांढरा, काळा, निळा, हिरवा किंवा अन्य कोणत्याही रंगाचा असू शकतो. हा गॅप काढून टाकण्यासाठी पुढील कोड शोधा:
                               body {
  • वरील कोड असलेल्या लाईनच्या खाली किंवा लगेच नंतर पुढील कोड टाका:
                               position: relative;
top: -32px;

  • पुन्हा एकवेळ 'Preview' वर क्लिक करून चेन्जेस व्यवस्थित झाल्याची खात्री करा.
  • जर सर्व काही व्यवस्थित झाले असेल, तेव्हाच 'Save Template' वर क्लिक करून तुम्ही केलेले बदल जतन करा.

>>>>> काही अडचण आल्यास प्रतिक्रिया पोस्ट करा...

1 प्रतिक्रिया:

विशाल तेलंग्रे म्हणाले...

@कांचन ताई, थॅंक्स... ;)

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre