महाराष्ट्राचा भारत-पाकिस्तान?

» शनिवार, १६ जानेवारी, २०१०

तेलंगानाचा मुद्दा गेल्या दिड-दोन महिन्यांपासून खुपच गाजतोय. या तेलंगानाच्या विभक्त करण्याच्या मुद्दयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही याच प्रकारची हवा वाहतांना दिसतेय. कोणाला याविषयी जास्त माहिती नसल्याने बहुतेकजण या मुद्दयाला टाळतांना दिसताहेत. मलाही याविषयाशी निगडित जराशीही माहिती नाही की का विदर्भाला विभक्त करण्याची मागणी जोर धरतेय ते... पण माझा या गोष्टीला विरोध आहे. मी मराठवाड्यातला आहे, पण मला नाही वाटत की स्वतंत्र विदर्भ असावा म्हणून....

२०१० हे महाराष्ट्रासाठी स्वर्णमहोत्सवी वर्ष आहे. शेकडो हुतात्म्यांच्या रक्ताने आपला संयुक्त महाराष्ट्र १ मे, १९६० ला निर्माण झाला. त्यावेळी जर या वीरमरण आलेल्या मराठी भूमीपुत्रांना ही गोष्ट माहित असती की  आपण ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी लढतोय तोच महाराष्ट्र भविष्यात फाळणीकरता फासावर चढवला जाईल, तर नक्कीच त्यांनी आपले प्राण कदापि दिले नसते. आजवरच्या या घडामोडी पाहता त्यांचे प्राण व्यर्थ गेले असेच म्हणावे लागेल. यापासून असा बोध घ्यावा का की यापुढे आपल्या लोकांसाठी काहीच करू नये, कारण तीच लोकं भविष्यात आपल्याच पाठीत खंजीर खुपसतात. आज ज्या कोणी स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरलिय, ते बहुतेकजण विदर्भातील आहेत. त्यात काही उच्च-पदस्थ नेते-मंडळी ते सर्वसाधारण रहिवासी यांचा समावेश आहे.
हे एकदम खरं आहे आणि सर्वांनाच माहित आहे की संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रासाठी केंद्राकडून किंवा राज्य सरकारकडून विकासासाठी, आर्थिक हानी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी पॅकेज जाहीर केले गेले, तेव्हा-तेव्हा विदर्भ हा एकमेव प्रांत या सर्व गोष्टींपासून वंचित राहिला (ठेवला गेला....!) आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात सातारा-सांगली-पुणे अन मराठवाड्यातील नेतेमंडळींनीच आपले वर्चस्व गाजवल्याचे आपला इतिहास सांगतो. विदर्भातील काही थोडेफारच नेते महाराष्ट्राच्या राजकारणात उतरू शकले. आणि जे कोणी उतरले ते इतर मंडळींकडून नेहमी डावलले गेले. हे एकदम खरंय... आणि याच कारणांमुळे आपापला मतदार-संघ वाचवण्याच्या प्रयत्नांत इतर-प्रांतिय (विदर्भ सोडून) मंडळींनी विदर्भाला मागास ठेवण्याचा अतिशय घाणेरडा अन माणुसकीला आणि माणसाच्या अंगिभूत अधिकारांना काळिमा फासण्याच्या अघोरी प्रकार चालू ठेवला. यामुळे आज विदर्भाची परिस्थिती भूटान या राष्ट्रासारखी झालेली दिसतेय. नागपूरसारखी महाराष्ट्राची उप-राजधानी असलेली राजधानी मिळालेल्या विदर्भात अजुनही औद्योगिक-क्रांती तर सोडाच, सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणार्‍या मूलभूत सुविधाही येथे क्वचितच पाहायला मिळतील.

यावरून तुम्ही म्हणाल की जर अशी बाब असेल तर विदर्भ नक्कीच विभक्त व्हावा अन त्याला योग्य नेतृत्व मिळावे जेणेकरून विदर्भाचा सर्वांगिण विकास होईल व हा प्रांत मागासवर्गियांमध्ये गणला जाणार नाही. हो मलाही येथे असेच वाटले. पण जर असे घडले तर ही खूप मोठी चूक ठरेल. आपल्यासमोर भरपूर उदाहरणे आहेत ज्यांचा आपण खोलवर विचार करणे गरजेचे मला भासते. मुस्लिम समाजाच्या लोकांनी जास्त असलेला पाकिस्तान(सध्याचा बांग्लादेशही त्यातच होता.) भारत स्वतंत्र होण्याच्या वेळी फाळणीद्वारे विभक्त केला गेला. यात सर्वांत मोठा वाटा होता तो मोहम्मद जिन्ना, जवाहर नेहरू (भारताचे गत-प्रधानमंत्री), तेव्हाचे भारतातील शेवटचे ब्रिटीश जनरल माउंटबेटेन  आणि (मोहनदास गांधी) या विभूतींचा..... भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानचा विकास होईल अशी आशा (काही) पाकिस्तानवासियांना आणि या विभूतींना होती. पण आज आपल्यासमोर निकाल आहेतच. पाकिस्तानव्याप्त पश्चिम-बंगालनजिकचा प्रदेश, म्हणजे आजचा बांग्लादेश ७०च्या दशकात भारताच्या मदतीने पाकिस्तानच्या तावडीतून सोडवण्यात आला. पण तोही अजुनही आपल्या पायांवर उभा राहू शकलेला नसल्याचे दिसते. आत्ताच ९ वर्षांपूर्वी झारखंड हा भारतातील एक प्रदेश विभक्त करण्यात आला, पण तेथे विकास तर सोडाच लोकांचे अगदीच हाल आहेत. माझे या संदर्भात ज्ञान अतिशय कमी आहे, तुम्हाला माझ्यापेक्षा या विषयाशी निगडित खूप खोलवर माहिती असेल, आणि मला नेमके काय म्हणायचे आहे ते तुम्ही समजला असालच....

आता एक उदाहरण आहे आपल्या संयुक्त महाराष्ट्राचे... संयुक्त महाराष्ट्र उदयास आल्यापासून आपला [विदर्भ सोडून :-(...] खुप (सर्वांगिण म्हणता येणार नाही...) विकास झाला. आपल्याकडे शिक्षितांचे प्रमाण खुप वाढले, औद्योगिक क्रांती झाली, अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या... इत्यादी.... शेवटी काही का असेना, आपण संयुक्त आहोत, त्याचाच सर्वांत जास्त फायदा या गोष्टींना कारणीभूत आहे. मुद्दा हा आहे की वरील उदाहरणे पाहता आपल्या असे लक्षात येईल की विभक्त होण्याने काही होऊ शकेल हा विचार फोल ठरलेला आहे. यांस जबाबदार तेथील नेतृत्व आहे, कारण भ्रष्टाचारच एवढी घाणेरडी बला आहे की ती आनंदाने फुलणार्‍या अन वाढणार्‍या समाजाला, प्रांताला, राष्ट्राला अगदी रसातळाला नेवू शकते. माझी ही कळकळीची निःस्वार्थ अन निष्पक्ष अशी विनंती आणि मागणी आहे की विभक्त विदर्भाची मागणी करणार्‍यांनी जरा व्यवस्थित विचार करावा. कारण एकदा का पायावर कुर्‍हाड मारली की पाय तुटलाच म्हणून समजा, अन भरपाईची तर आशाच सोडा मग..... आणि जी नेतेमंडळी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीस दुजोरा देताहेत, त्यांचा यात काही फायदा नसेल हे कशावरून??? उलट स्वतंत्र विदर्भानंतर यांना सध्यापेक्षा १००पटीने जास्त खायाला मिळेल.... विचार करा राव....

विदर्भाचा विकास होवू शकतो... यासाठी आपल्यासारखा सर्वसामान्यांनाच काहीतरी करण्याची गरज आहे. भ्रष्टाचारी लोकांना चौका-चौकात नागडं करून त्यांना फासावर लटकवावं... जेणेकरून यापूढे कोणीही भ्रष्टाचार करण्याची हिंम्मत देखील करणार नाही. शेवटी एकजुटीची हीच एकमेव ताकद आहे. मग बघा, कसा विदर्भाचा कसा सर्वांगिण विकास होत नाही ते.... अजुन एक मुद्दा आहे, ज्याची चर्चादेखील खुपच विरळ दिसते, तो म्हणजे बेळगाव सीमा-प्रश्न.... बेळगावमधील सत्तर टक्के मराठी जनता वाट पाहतेय की कधी ते महाराष्ट्रात येते... पण आपल्या हरामखोर नेत्यांना खाण्याशिवाय दुसरं काही दिसलं तर नवलच....! या स्वर्णमहोत्सवी वर्षात तरी बेळगाव महाराष्ट्रात यावा ही आशा.....

मी पक्का महाराष्ट्रीय आहे आणि या मुद्दयावर मी माझे वैयक्तिक मत मांडले... तुमची खुन्नस, दुजोरा सर्व स्वागतार्ह आहेत. शेवटी चर्चेतूनच हा विषय मार्गी लागेल. त्यामुळे प्रत्येकाचे याविषयीचे मत मोलाचे आहे.

धन्यवाद...

जय महाराष्ट्र......!

4 प्रतिक्रिया:

Swapnil P. Bendekar म्हणाले...

सप्रेम नमस्कार ,
अप्रतिम लेखन !
पण माझे वैयक्तिक मत असे आहे कि जोपर्यंत मुलभूत सुविधांबरोबर औद्योगिक क्रांती होत नाही तोपर्यंत विदर्भ मागेच राहणार. असाच मागासलेला राहणार कारण विदर्भातील एकही नेत्याला विदर्भ विकासाची आवड नाही अथवा इच्छा नाही. त्यांना एवढेच माहित आहे कि एखादा प्रश्न उपस्थित करून एखादी पेट्रोल पंप किंवा एखादी संस्था मिळवणे. परंतु त्यांनी प्रत्येकाने एक नवीन उद्योग विदर्भात आणला तर ६२ + १३ (आमदार + खासदार) उद्योग सुरु होतील. म्हणजे विदर्भातील पदवीधारकांना नोकरीसाठी पुणे / मुंबई / मराठवाडा इकडे येण्याची गरज भासणार नाही.
आणि हे सर्वश्रुत आहे कि एका उद्योगामुळे दुसरा उद्योग सुरु होतो आणि औद्योगिक क्रांती घडून येते.
मी एक पदवीधारक असून मला हे माहिती आहे कि जवळपास ७५ % हून अधिक पदवीधारकांना नाईलाजास्तव का होईना विदर्भ सोडून येणे भाग पडते. या परिस्थितीत बदल करणे अत्यंत गरजेचे असून अन्यथा विदर्भ असाच मागासलेला राहणार .
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@स्वप्निल, तुमच्या अभिप्रायाबद्दल खुप खुप आभार... मीसुद्धा तुमच्या मताशी पुर्णपणे सहमत आहे. औद्योगिक क्रांतीच न झाल्यामुळे विदर्भ मागासलेला आहे, अन त्याला वर आणण्यासाठी तेथे क्रांती घडून येणंही तितकंच महत्वाचं...
कृष्णा.....घोडके म्हणाले...

@ विशल्या,
मस्त लेख लिहाला आहे विशल्या, एकदम आभ्यासपुर्न पध्तिने ,तुझा नविन पैलु आज समजला, असेच लेख लिहित जा

अलिकडच्या दिवसात स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीने पकडलेला जोर पाहुन विदभाच्या काहीच्या (राजकीय मंडळीच्या) महात्वाकांक्षा (राजकीय मंडळीच्या) जागॄत झालेली दीसते. विदभाच्या किति लोकांना खरोखर स्वतंत्र विदभ हवा आहे याचा आभ्यास न करता,राजकीय मंडळी आपली पोळी भाजत आहे हे दीसते .आपण जरी मराठवाड्यातील असलो तरी मुदा विचार करन्यासारखा आहे.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@कृष्णा, बरोबर आहे. मुद्दा आपलाच आहे अन याच्यावर चर्चा करणं नक्कीच आपलं कर्तव्य समजून मी हा लेख लिहिलाय. अभिप्राय नोंदविल्याबद्दल धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre