'ब्लॉग माझा'चा निकाल जाहीर

» शनिवार, २१ नोव्हेंबर, २००९


अखेर ज्या गोष्टीची कित्येक दिवसांपासून उत्सुकता होती, त्या स्टार माझाच्या 'ब्लॉग माझा २००९ सिझन २' या स्पर्धेचा निकाल जाहीर झालायं. माझ्या या ब्लॉगला तसं उत्तेजनार्थ विजेत्यांमध्ये देखील स्थान नाहीये, पण मला त्याबद्दल काहीच दुःख नाहिये, मी तर या माहितीच्या महाजालावर अजुन नवखा आहे. बाकी काहीही असो, लेखक अच्युत गोडबोलेंनी जे काय ब्लॉग्ज निवडलेत, ते खरेचं स्तुतीसाठी १०१ टक्के पात्र आहेत.
सर्वात उत्कृष्ट तीन ब्लॉग्ज (क्रमवारी आवश्यक नाही):
अनिकेत दादाचा http://manatale.wordpress.com, दिपक दादाचा http://bhunga.blogspot.com अन नीरजा पटवर्धन यांचा http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com असे हे तीन ब्लॉग्ज सर्वोत्कृष्ट म्हणून निवडले गेलेत. यातील अनिकेत दादा व भुंगा दादाचं वेब डिझाइनिंग, व्यवस्थित टेम्प्लेटची निवड आणि वाचायला उत्सुकता येईल असे लेखन व आकर्षक मांडणी या गोष्टींमुळे कोणीही भारावून जातं. त्यातील मी सुद्धा एक!

उत्तेजनार्थ विजेत्यांमध्ये सलील चौधरींचा http://netbhet.com हा इंग्लिश-मराठी ब्लॉग बहुतेकांच्या परिचयाचा असेलच. अजुनही काही उत्तेजनार्थ विजेत्यांच्या ब्लॉग्जची यादी स्टार माझाच्या वेबसाईटवर लागलेली आहे, ती बघण्यासाठी http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1439 या लिंकवर टिचकी मारावी.
या सर्व विजेत्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन व त्यांचे वर्चस्व असेच अबाधित रहावे ही सदिच्छा....!

महेंद्र काकांचा http://kayvatelte.wordpress.com ह्या ब्लॉगचा समावेश विजेत्यांमध्ये झाला नाही याबद्दल मात्र मनात थोडीशी खंत आहे....

माझ्यासारखे काही नवखे व जुने-पुराने मंडळीदेखील आहेत, ज्यांचा सुद्धा या विजेत्यांमध्ये समावेश झालेला नाही, त्यांनी काळजी करण्याचं किंवा निराश होण्याचं मुळीच कारण नाही. उलट यापुढे आपणही काहीतरी नविन करून दाखवू या उद्देशाने व नव्या जोमाने पुढील तयारीला लागूया. पुढील वर्षाच्या ब्लॉग माझा स्पर्धेसाठी माझ्या सर्व मराठी ब्लॉगर्संना शुभेच्छा!


जय महाराष्ट्र...

8 प्रतिक्रिया:

रविंद्र "रवी" म्हणाले...

अभिनंदन
Aniket म्हणाले...

dhanyawad vishal
भानस म्हणाले...

विशाल मन:पूर्वक अभिनंदन व अनेक शुभेच्छा!:)
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@रविंद्र @अनिकेत दादा @भानस, मंडळी आभार आणि शुभेच्छा.
आनंद पत्रे म्हणाले...

माझ्या ब्लॉगच्या अनुभवावरून मला वाटते की महेंद्रजीचा काय वाटेल ते हा जरूर विजेता असायला पाहिजे होता...
एनिवे विजेत्याचं अभिनंदन!!
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@Anand, हो नक्कीच, महेंद्र काकांच्या ब्लॉगची त्यांनी दखल तरी घ्यायला हवी होती. कमेन्टबद्दल धन्यवाद.
Salil Chaudhary म्हणाले...

Thanks Vishal
Salil
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@सलिल चौधरी, नक्कीच... सेम टू यू... :)

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre