परवा रात्री थोडाफार अभ्यास केल्यानंतर टिव्ही पाहत होतो... नेहमीप्रमाणे बातम्यांचे चॅनेल्स अन मग डिस्कव्हरी, नॅट जिओ अशी सर्फिंग चालू केली... बाकी कोणत्याच चॅनेलांवर बोअर प्रोग्रॅम्स चालू हो्ते, म्हणून डिस्कव्हरीवर ट्यून केलं.. सर्वात पहिले तर नेमकं कळालं नाही की चालू असणारी डॉक्युमेण्ट्री फिल्म कोणत्या विषयावर आहे ते... पण हळू-हळू कळायला लागलं. दि. २६ डिसेंबर, २००४ ची ती काळी पहाट, ’अ’पासून ’ज्ञ’पर्यंत सर्व माहिती बघितली, फक्त डिस्कव्हरी अन नॅट जिओवर... नाताळाच्या अन ३१st च्या रंगात लोक आनंदात होते, पण सुमात्रा बेटांजवळ झालेल्या टेक्टॉनिक प्लेटांच्या ओव्हरलॅपिंगमुळे व त्यामूळे निर्माण झालेल्या भूकंपामुळे (सलग ७ मिनिटे चालला होता हा भूकंप - रिश्टर स्केलवर याची तिव्रता ९.५ एवढी मोजली गेली होती...!), हिंदी महासागरात सुमारे १६०० किमी एवढा भुखंड चिरत गेला.... अन त्यामूळे निर्माण झालेल्या ९ ते १० मजली इमारतींएवढ्या उंच लाटांनी लाखो लोकांचे प्राण घेतले...
दोन्ही चॅनेलांवर यावरील डॉक्युमेण्ट्री फिल्म्स रात्री ९ ते ११ (दोन तास) चालू होत्या, पण कुठलेच न्युज चॅनेल, मराठी, हिंदी, इंग्रजी, किंवा अन्य कोणतेही... कूठेच याविषयी "ब्र"सुद्धा बघायला तर सोडाच, ऐकायलाही मिळाला नाही... घटना आपल्या देशाला शोककळेत लोटणारी होती, पण आपले हे न्युज चॅनेल्स... जरा तरी लाज वाटायला हवी यांना... स्मृती पाळणं किंवा जनतेला त्याची जाणीव करून देणं हे यांचं कर्तव्य असतं, पण त्यांना त्या गोष्टीचा विसर पडलायं कि काय, असा प्रश्न उपस्थित होतो... अन बिचारे, बाहेरील चॅनेल्स (डिस्कव्हरी अन नॅशनल जिओग्राफिक) यांनी यासाठी एवढे कष्ट घेऊन सविस्तरपणे डॉक्युमेण्ट्री फिल्म बनवावी... जास्त काही संबंध नसतांनाही... आतातरी आपल्या मिडियाने या चॅनेलांपासून काहीतरी शिकावे, असे मला वाटते... शेवटी हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या भावनेशी निगडित आहे...
मला त्यावेळी(त्सुनामी आली होती, त्यावेळी) जास्त समज नव्हती, कारण मी तेव्हा त्यामानाने लहान होतो अन आमच्याकडे लाईव्ह न्युज बघायला टिव्ही पण नव्हती... म्हणून मलाही आठवण राहिली नाही... आता उशिरा का होईना, पण आपण सर्वजण मिळून त्यात अनामिकपणे मेलेल्या लाखो जीवांना श्रद्धांजली अर्पण करू...
जय हिंद...
स्वगृह » स्मृती » २००४ च्या त्सुनामीचा सगळ्यांना विसर पडला की काय??
२००४ च्या त्सुनामीचा सगळ्यांना विसर पडला की काय??
लेखक: विशाल तेलंग्रे » सोमवार, २८ डिसेंबर, २००९टॅग्ज: त्सुनामी, नाताळ, विसर, श्रद्धांजली, संबोधन, स्मृती
Blogger द्वारे प्रायोजित.
8 प्रतिक्रिया:
लाज आणि मिडीयाला???..अशक्य.
आता मिडीयाबद्द्ल जास्त बोलणे म्हणजे केवळ तोंडाची वाफ दवडणे.. काहिही फर्क पडणार नाही.
माझ्यातर्फ़े श्रद्धांजली..
@आनंद, खरंय, पण तसं नको व्हायला हवं होतं...
अभिप्रायाबद्दल आभार...
श्रध्दांजली.. बरं झालं आठवण करुन दिलीस ते..
@महेंद्र काका, धन्यवाद, माझ्यापण आत्ताच डोक्यात आलं अन पटापट लिहून मोकळा झालो... आपल्या तत्पर प्रतिक्रियेसाठी पुनः एकदा आभार...
२६ माझा जन्मदिवस त्यामुळे मी विसरलो :(
आता उशिरा का होईना, पण त्यात अनामिकपणे मेलेल्या लाखो जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली .
»» विक्रम एक शांत वादळ नक्कीच काका, मला रहावलं नाही, म्हणून त्यात मेलेल्या त्या लाखो निरपराध जीवांसाठीच ही पोस्ट टाकलिय...
»» या योगाने तुमचा जन्मदिवस तरी कळाला...
»» अभिप्रायाबद्दल आभार...
ही गोस्ट कधीही विसरन्या सारखी नाही.......
@दिलीप, हो नक्कीच ती घटना अविस्मरणीयच आहे. निसर्गाचे दुसरं(रौद्र) रूप पाहायला मिळालं होतं त्सुनामीच्या वेळी... बाय द वे, प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल धन्यवाद...
टिप्पणी पोस्ट करा
»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.
मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!
लिहिण्या आगोदर, मराठी लिखाण चालु - बंद करा!
टिप्पणी देण्यासाठी, वरती लिहिलेले लिखाण खालच्या बॉक्समध्ये कॉपी-पेस्ट करा.