२००४ च्या त्सुनामीचा सगळ्यांना विसर पडला की काय??

» सोमवार, २८ डिसेंबर, २००९

परवा रात्री थोडाफार अभ्यास केल्यानंतर टिव्ही पाहत होतो... नेहमीप्रमाणे बातम्यांचे चॅनेल्स अन मग डिस्कव्हरी, नॅट जिओ अशी सर्फिंग चालू केली... बाकी कोणत्याच  चॅनेलांवर बोअर प्रोग्रॅम्स चालू हो्ते, म्हणून डिस्कव्हरीवर ट्यून केलं.. सर्वात पहिले तर नेमकं कळालं नाही की चालू असणारी डॉक्युमेण्ट्री फिल्म कोणत्या विषयावर आहे ते... पण हळू-हळू कळायला लागलं. दि. २६ डिसेंबर, २००४ ची ती काळी पहाट, ’अ’पासून ’ज्ञ’पर्यंत सर्व माहिती बघितली, फक्त डिस्कव्हरी अन नॅट जिओवर... नाताळाच्या अन ३१st च्या रंगात लोक आनंदात होते, पण सुमात्रा बेटांजवळ झालेल्या टेक्टॉनिक प्लेटांच्या ओव्हरलॅपिंगमुळे व त्यामूळे निर्माण झालेल्या भूकंपामुळे (सलग ७ मिनिटे चालला होता हा भूकंप - रिश्टर स्केलवर याची तिव्रता ९.५ एवढी मोजली गेली होती...!), हिंदी महासागरात सुमारे १६०० किमी एवढा भुखंड चिरत गेला.... अन त्यामूळे निर्माण झालेल्या ९ ते १० मजली इमारतींएवढ्या उंच लाटांनी लाखो लोकांचे प्राण घेतले...

दोन्ही चॅनेलांवर यावरील डॉक्युमेण्ट्री फिल्म्स रात्री ९ ते ११ (दोन तास) चालू होत्या, पण कुठलेच न्युज चॅनेल, मराठी, हिंदी, इंग्रजी, किंवा अन्य कोणतेही... कूठेच याविषयी "ब्र"सुद्धा बघायला तर सोडाच, ऐकायलाही मिळाला नाही... घटना आपल्या देशाला शोककळेत लोटणारी होती, पण आपले हे न्युज चॅनेल्स... जरा तरी लाज वाटायला हवी यांना... स्मृती पाळणं किंवा जनतेला त्याची जाणीव करून देणं हे यांचं कर्तव्य असतं, पण त्यांना त्या गोष्टीचा विसर पडलायं कि काय, असा प्रश्न उपस्थित होतो... अन बिचारे, बाहेरील चॅनेल्स (डिस्कव्हरी अन नॅशनल जिओग्राफिक) यांनी यासाठी एवढे कष्ट घेऊन सविस्तरपणे डॉक्युमेण्ट्री फिल्म बनवावी... जास्त काही संबंध नसतांनाही... आतातरी आपल्या मिडियाने या चॅनेलांपासून काहीतरी शिकावे, असे मला वाटते... शेवटी हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या भावनेशी निगडित आहे...

मला त्यावेळी(त्सुनामी आली होती, त्यावेळी) जास्त समज नव्हती, कारण मी तेव्हा त्यामानाने लहान होतो अन आमच्याकडे लाईव्ह न्युज बघायला टिव्ही पण नव्हती... म्हणून मलाही आठवण राहिली नाही... आता उशिरा का होईना, पण आपण सर्वजण मिळून त्यात अनामिकपणे मेलेल्या लाखो जीवांना श्रद्धांजली अर्पण करू...

जय हिंद...

टॅगा - टॅगी

» शुक्रवार, २५ डिसेंबर, २००९

दोन दिवसांपासून मी बिगर अंघोळीचा शिर्डी, शिंगणापूर वगैरे वगैरे करत (आय मीन ह्या ठिकाणी मित्रांसोबत फिरत होतो), अन आत्ता मी घरी आल्यावर कुठे अंघोळ केली अन नेट उघडलं, तेव्हा माझ्या ब्लॉगवर कांचन ताईनं मला टॅगलंय, अशी प्रतिक्रिया दिसली... ही टॅग-टॅगीची नेमकी भानगड काय आहे, ते मला आत्ता (म्हणजे ही पोस्ट लिहीत असतांना) देखील कळलेली नाहिये, तरी पण हौस म्हणून इतरांच्या टॅगा-टॅगीच्या पोस्टची मी ही कॉपी मारतोय.... कोणाच्या प्रतिक्रिया मिळाल्यावर कळेलचं....

***********************************************************************************

1.Where is your cell phone?
 खिडकीत आहे, आमच्या घरी रेंज फक्त खिडकीतच येते.... अन नेहमी तेथेच असतो, खालून दोन पिना जोडलेल्या असतात.. एक २४ घंटे चार्जिंग करण्यासाठी अन दुसरी युएसबी थ्रु माझ्या लॅपटॉपला जोडण्यासाठी! (कारण मी मोबाईलवरून डायल-अपद्वारे इंटरनेट वापरतो...)

2.Your hair?
कटिंग करायला एक ते दिड महिना झाला असेल, केसं पोरींवानी दिसताहेत वाटतं... संध्याकाळीच येतो बारीक करून...  अन या वयातच माझे केसं ढवळे (आय मीन पांढरे) व्हायला लागलेत... चाटी (आय मीन "चप्पी") करावसं वाटतंय...!! ;)

3.Your mother?
झेड टीव्हीवरील ’त्या’ एकता कपूरच्या भंगारचोट मालिका पाहून पाहून आता झोपलियं, हं, पण मला नुसतं एकट्यालाचं भाजी-पोळी करूनच झोपलियं...

4.Your father?
थंडी वाजत होती म्हणून मोठी जाड-जूड रग अंगावर घेऊन आत्तापर्यंत म्हण्जे दुपारच्या अडीच वाजेपर्यंत झोपलेले होते, आता गच्चीवर ऊन्हात जाऊन बसलेत... त्यांना दादा कोंडक्याचे गाणे अन जास्तकरून लावण्या आवडतात...

5.Your favorite food?
दाबेली... त्यातले काय ते भाजलेले शेंगदाणे, डाळींबाचे दाणे अन सोबतची टमाट्याची चटणी (केच-अप)... अह्ह्हा... काय टेस्ट असते... अन सुगंध पण तसाच... ;)

6.Your dream last night?
लास्ट नाईटला आम्ही (मी अन माझा मित्र दिपक) फुल नाईट मारली, त्यानं काल तोशिबाचा मस्त लॅपटॉप घेतला (तसा मीच घेऊन दिला त्याला...!) अन त्यावरच रात्रभर आम्ही प्ले-स्टेशनचे गेम्स खेळत बसलो... आता डोळ्यांची एवढी आग होतेय ना.... बरं झालं, नाहीतर पप्पा म्हटले असते की, ढोसून तर आलं नसेल हे पोरगं... कारण माझे डोळे झोप न झाल्याने लालभडक झालेत... अन यामुळे स्वप्नाचा तर इथे काही संबंधच येत नाही...!

7.Your favorite drink?
 सगळे कोल्ड-ड्रिंक्स... आत्ता हिवाळ्यात थंडगार बर्फ झालेल्या कोल्ड-ड्रिंकच्या बाटल्या तोंडाला लावायची मजा काही औरच.....

8.Your dream/goal?
झोप येऊन राहीली, अन कुठं पाहता ड्रिम अन गोल.... तरी पण स्पेसमध्ये जायचं किंवा नावाजलेला सॉफ्टवेअर इंजिनिअर बनणं, हे माझे एक्स्ट्रीम गोल्स आहेत... पण अशीच जर कामगीरी राहीली, तर मात्र एखाद्या झेरॉक्सवाल्याच्या दुकानावर काम करावं लागेल....!!! ;)

ब्लॉगरवरील "टॉप नेव्हिगेशन बार (Navbar)" कशी लपवावी आणि काढून टाकावी?

» मंगळवार, १५ डिसेंबर, २००९

ब्लॉगरच्या "XXX.ब्लॉगस्पॉट.कॉम" डोमेनवर किंवा ब्लॉगरने होस्ट केलेल्या पण कस्टम डोमेन असलेल्या साईटवर ब्लॉग तयार केल्यानंतर तेथे ब्लॉगच्या सर्वात वर नॅव्हबार किंवा नेव्हिगेशन बार किंवा बॅनर दिसते. या नॅव्हबार वर "सर्च ब्लॉग" टेक्स्टबॉक्स, "फ्लॅग ब्लॉग" - अपरिहार्य ब्लॉग कन्टेन्ट बद्दल सुचित करण्यासाठी, "पुढील ब्लॉग" - ब्लॉगरवरील दुसर्‍या एखाद्या ब्लॉगला भेट देण्यासाठीची रॅण्डम लिंक येथे असते, तसेच नविन ब्लॉग तयार करण्यासाठी आणि साइन इन साठीच्या लिंक्स या नॅव्हबार असतात. (खालील प्रतिमा पहा.)



तुमच्या साईटला/ब्लॉगला भेट देणार्‍या बहुतेकांना ती नॅव्हबार मुळीच उपयोगी ठरत नाही. उलट त्या बारमुळे तुमचा ब्लॉग विचित्र दिसतो किंवा त्या बारसाठी अनावश्यक जागा गेलेली असते. पण तुमच्या ब्लॉग टेम्प्लेटच्या CSS मध्ये थोडेफार बदल करून तुम्ही ती नॅव्हबार, तुमच्या ब्लॉगवर लपवू शकता. हे अगदी १ मिनिटात होणारे आहे आणि यात अवघड असे काहीही नाही.

Vishal Telangre