[डिस्क्लेमर: पुढील कथानकातील कुठल्याही प्रसंगाचा/पात्राचा/स्थळाचा/वचनांचा कशाशीही कसलाही संबंध नाहीये. यातील "मी" हे पात्र देखील काल्पनिक आहे. कसल्याही बाबतील जर तुम्हाला हे तुमच्याशी घडलेल्या घटनेशी संबंधित आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा.]
पहिलंच लेक्चर... तसं सगळेच लेक्चर्स आम्ही म्हशीसारखे उदास मुस्कटं करुन कसे-बसे मार्गी लावत असतो, कुठलंही लेक्चर त्याला अपवाद नसतंच मुळी! आज मुलांना जरा हूरूपच चढलेला दिसत होता बहुदा, नाही नाही... मला तर दाट शंकाच होती की कित्येकांनी डायलूट (विरल ~ पिण्याच्या पाण्यात मिक्स करुन) ढोसलेली होती... खासकरुन आमचे एमबीबीएस (बॅक बेंचर्स हो!) इंजिनिअर्स...
मॅऽमनी लेक्चरला सुरुवात केली... एखाद्यावेळी गच्चीवर रात्री झोपतांना १२ वाजता अतिशय कर्कश आवाजात बाजुच्याच मंदिरावरील खडूस पुजार्याने झोपेच्या सुरात म्हणलेली "वट पाहे सदना" च्या जागी "वाट पाही सजनी" अशाप्रकारची मॉडिफाइड स्वरूपातली गणपतीची आरती ऐकणं चालेल, पण मॅऽमचं लेक्चर म्हणजे वर्गांच्या खिडक्या डोक्याने आपटून-आपटून फोडाव्या की काय, अशी स्थिती निर्माण करणारं कंटाळवाणं पारायण...! असो... नशिबी पडलंय, ते भोगावं तर लागणारंच... अर्धा तास झाला, मॅऽमचं भारूड चाललंय, पोरा-पोरांची तोंड तर अशी दिसत होती की कोणी जोर-जोरात त्यांच्या थोबाडींत भडकावल्या असाव्यात... पिन-ड्रॉप-सायलेंट का काय जे म्हणतात ना, त्याचा आम्ही तना-मनाने अवलंब केलेला... फळ्यावर मॅऽमनी कसलातरी तक्ता काढला. तक्त्यात मॅऽमनी नावे विचारली... ज्याने-त्याने त्यांची -त्यांची सांगितली देखील. च्यायला, पहिल्या कॉलममध्ये मुलांची नावे भरल्यावर दुसर्या कॉलमकडे मॅऽम वळाल्या... मुलींची नावे विचारणं मॅऽमनी चालू केलं... पहिल्या बेंचपासून... हा हा... मनात नसूनही कित्येकींना त्यांची नावे सांगावी लागली. मुली सांगत होत्या, मॅऽम लिहित होत्या...
स्वगृह » ऑक्टोबर 2010साठी आर्काईव्ह्ज
गोष्ट समाप्त!
लेखक: विशाल तेलंग्रे » सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०टॅग्ज: प्रेम कथा
अशीही एक लव्ह स्टोरी - भाग ३ पासून पुढे...
काही वैयक्तिक कारणांमुळे ही कथा यापुढे लिहिणे मला शक्य नसल्याने या कथेचे उर्वरीत लिखान कायमस्वरुपी स्थगीत करीत आहे.
काही वैयक्तिक कारणांमुळे ही कथा यापुढे लिहिणे मला शक्य नसल्याने या कथेचे उर्वरीत लिखान कायमस्वरुपी स्थगीत करीत आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.