नविन वर्ष - माझं रीझोल्युशन...

» शुक्रवार, १ जानेवारी, २०१०

दोन दिवसांपासून मी जरा खुपच घाईत(गरबडीत) होतो, अन आता सुद्धा आहे. कारण तसं फॅमिलीशी मॅटरशी संबंधित आहे. असो... माझ्या मागील वर्षांच्या आठवणी (अमुल्य??? किंवा असतीलच असेही नाही...!) ३१st ला शेअर करण्याची संधी यावेळी तरी मी गमावली, कारण मी अगोदरच त्यावर लिहून ठेवायला हवं होतं.. एक-अर्धा जण चुकून तरी माझ्या या ब्लॉगकडे फिरकलं असेलच, या आशेने की या पोराने काहीतरी लिवलं असेल म्हणून... पण...

काल रात्री मी घराबाहेर होतो, मामांच्या घरी, मामांच्या मुलासोबत कालची ३१st ची रात्र मी सेव्हन अप च्या बर्फ झालेल्या बाटलीवर सेलिब्रेट केली. असो, असं सेलिब्रेशनही मी पहिल्यांदाच करत होतो, कारण याअगोदर तरी मी कधीच ३१ला घराबाहेर पडलो नव्हतो. रात्री डोक्यात विचार येत होते की आपण ३१ला नेमकं काहीतरी संकल्प नक्कीच करूया. ठरलं, रात्री २ नंतर जेव्हा फटाक्यांचा आवाज कमी झाला तेव्हा माझ्या डोक्यात असंख्य विचार येत होते.(आश्चर्य वाटतंय की मला अजुनही आठवतंय!!) सर्वात पहिले तर माझ्या आयटी फिल्ड संबंधित मी खुप विचार केला.. शेवटी माझं लक की मला आयटी मिळाली, कारण मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी आयटीतच जाणार हे पक्कं केलं होतं, तसं झालंही. पुढच्या पायर्‍या तर मला स्वतःच पार करणं आहेत... नंतर इतिहास, अन शेवटी सध्याचा अन या नविन वर्षातला सर्वात मोठा प्रश्न "दुष्काळ" हा माझ्या नजरेसमोर आला. आतापर्यंत मी अनुभवलेलं, ऐकलेलं, पाहिलेलं, वाचलेल्यावरून या टॉपिकशी रीलेटेड सर्व गोष्टींबाबत मी माझ्या मानाने खुप विचार केला. मला डोकं दुखणं म्हणजे काय हे अजुनही कळलेलं नाहिये, म्हणून बहुतेकांना होणारा प्रॉब्लेम मला अडवत नव्हता.
जगातील पहिले स्टीम(वाफेचे) इंजिन, ज्याच्या पहिल्या परिक्षणात, त्यामधून हवेत मिसळलेले कार्बनचे अंश आजही आपल्या पृथ्वीच्या वातावरणात जसेच्या तसे आहेत. सुर्यापासून येणारे अतिनिल(अल्ट्रा-व्हायोलेट) किरणे आपल्या वातावरणातील ओझोन लेयर शोषून घेते, ज्यामूळे ती अतिनिल किरण पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत सहजासहजी येऊ शकत नाहीत, व आपले तसेच बहुतेक सजीवांचे रक्षण होते. पण वातावरणातील वाढत्या कार्बनच्या प्रमाणामुळे या ओझोनच्या लेयरवर दबाव पडत असावा. काही निवडक संशोधनांद्वारे ही गोष्ट सर्वमान्य झालिय की पृथ्वीच्या वाढत्या तापमानास जबाबदार हे कारण नसावे. तर ते बहुदा असे घडत असावे: पृथ्वीच्या दोन्ही धृवांवरील पांढरा-शुभ्र बर्फ सुर्यापासून निघालेल्या बहुतेक किरणांना परावर्तित करतो. ज्याद्वारे योग्य तापमान राखण्यास मदत होते. पण कार्बनच्या वाढत्या प्रमाणामुळे हे परावर्तित झालेले किरणे ही कार्बनच्या तयार झालेल्या लेयरमुळे पृथ्वीच्या वातावरणातच अडवले जातात. व ही किरणे परत पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे परावर्तित केली जातात. साहजिकच, यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होते. या वाढत्या तापमानाचा पहिला फटका बसतो तो याच धृवांवरील ग्लेशियर्सना... हजारो वर्षांपासून असणारे ग्लेशियर्स आज-काल एकाएकी वितळायला लागलेत, खुप घातक परिणाम होत आहेत, अन होतील या वितळण्याचे... समुद्रांची भौगोलिक रचना पाहता, वातावरणातील बहुतेक कार्बन समुद्रांच्या तळाशी जमा होतो, याचे भरपूर पुरावे मिळालेत. पण कार्बनचे वाढते प्रमाण त्या मानाने खुपच जास्त आहे, काही वर्षांत असा दिवस येईल, जेव्हा समुद्रांची ही शक्तीसुद्धा नष्ट होईल. वाढत्या जागतिक तापमानाचे कीती हानिकारक अन घातक परिणाम होऊ शकतात हे आपण गेल्या काही वर्षांपासून तर पाहतो आहोच. भारतातील सर्वात जास्त वार्षिक पर्जन्यमान असलेले ठिकाण चेरापूंजी गतवर्षी (सन २००९)मध्ये दुष्काळाने ग्रासले होते अन अजुनही आहे. आणि राजस्थान सारख्या वाळवंटाच्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे आलेल्या भयंकर पूरामुळे झालेली हानीही आपल्या स्मरणात असेलच. हा प्रश्न भारतालाच नाही तर पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्राला हैराण करणारा आहे. आता या नविन वर्षातच अजून आपण काय-काय नविन अनुभवू, याचा विचार करवत नाही. माझ्या मनात तर एकच विचार किती वेळपासून गोंघावतोय, तो म्हणजे आपल्या बळीराजाचे(मी सुद्धा शेतकर्‍याचाच पोरगा आहे हं..!!) काय हाल होतील. मागील वर्षीच एवढ्या आत्महत्या झाल्या, आता ह्यावेळी...??? तर विचार करा, त्या काळच्या म्हणजे १९व्या शतकातील नुकत्याच हळू-हळू फैलावणार्‍या औद्योगिक क्रांतीचे दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत, तर आजचे आपले प्रदुषण पाहता, आपली पुढची पिढी(या पिढीत मीसुद्धा आहे!)... काय हाल होतील...???

माझं तरी एवढचं म्हणणं आहे (शेवती मी अजुन असमजंस आहे, वयाने लहान असल्याने माझा अभ्यास खूप कमी आहे, तेव्हा मी जी सांगतोय ते तुम्हाला पटेलच असं तर मुळीच नाही...) की हे आत्ताच वेळ आहे, काहीतरी करण्याची.. असं ना होवो की आपण त्यावर नुसता विचार करत होतो अन जे नेमकं करायची गरज होती, त्यापासूनच अलिप्त राहिलो. जग काहीही करो, मात्र स्व-परीने स्वतःच्या अभ्यासाचं जेवढं चीज करता येईल तेवढं करावं... कारण आज आपण अशा परिस्थितीत आहोत, तेथे करो या मरो हा शेवटचा पर्याय आपल्या हाती असेल. जेवढे जास्त पर्याय तुम्ही जन-माणसांत फैलावाल, पुढील असूचक घटनांपासून वाचण्यासाठी, तेवढं तुमचं स्टेटस वाढेल अन तुमच्या मनाला मिळणारे सुख काही औरच असेल. या लढ्यासाठी (ज्याच्याबद्दल मी वर काहीतरी बोंबलत होतो तो...) आता आपला सर्वांचा असा समज व्हायला पाहिजे की हे नविन वर्ष नविनच असेल आपल्या नव-नविन योजनांसाठी/रीझोल्युशन्ससाठी, पण हेच वर्ष शेवटचंही असू शकतं, आपल्या भावी पिढीसाठी काहीतरी करण्याचं...

तुम्ही जर यासंबंधित अगोदरच किंवा आत्ताच काहितरी ठरवलं असेल तर तुम्ही ते या लेखाच्या वाचकांसोबत अगदी दिलखुलासपणे शेअर करू शकता, ज्याद्वारे या चर्चेला काही वेगळे वळणदेखील येईल.

नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अन तुमच्या नव्या संकल्पांनाही...

12 प्रतिक्रिया:

Mahendra Kulkarni म्हणाले...

माहितीपुर्ण लेख आहे. खुप मेहेनत घेतलेली दिसते आहे यावर. किप इट अप..
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@महेंद्र काका, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. रात्री डोक्यात आलेले विचार जसेच्या तसे खरडलेत इथे... पण ही समस्या मला तरी खुप भयंकर वाटतेय... बाय दि वे, तुम्हाला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

Global warming चा परिणाम सर्वत्रच पाहण्यास मिळत आहे.यासाठी सरकार आपापल्या परीने प्रयत्न करत राहणार आहे परंतु म्हणत आहेस त्या प्रमाणे प्रत्येकाने स्वताहुनही काहीतरी करण्याची गरज आहे.

चला आपण सर्वजण मिळून यासाठी आपापल्यापरीने आपले योगदान देऊ .
आनंद पत्रे म्हणाले...

विशाल, याच विषयावर अनुजाजींनी लेख लिहिला होता...
http://anukshre.wordpress.com/2009/12/21/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D/


तुझे विचार योग्यच आहेत, काहीतरी करने भाग आहे आता.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@विक्रम, तू म्हणतोहेस, ते अगदी बरोबर आहे, सरकार तर प्रयत्न करीत आहेच. पण आपण सरकारच्या भरोश्यावर सगळं काही सोपवलं तर आपलं भलं होईल, हे ठीक नाही. तूझ्या योगदानाबद्दल आभार... (पण नक्की काय करणार आहेस ते सांगितले तर बरे होईल, मलाही अन इतरांनाही...)
अनामित म्हणाले...

खरय विशाल, ग्लोबल वॉरमिंग चे परिणाम दिसत आहेतच,,वातावरणातील हे बदल खूप मोठे संकट आहे आणि ह्या वर अजूनही नुसत्या बैठका होतायत सगळ्या राष्ट्रांच्या पण रिज़ल्ट काहीच नाही निघत हे दुर्दैव
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@आनंद, आभार, मी अनुजा ताईचा तो लेख बघितला, तीने खुपच विस्तृत माहिती दिलीय... अन आताच काहीतरी करण्याची योग्य वेळ आहे, या माझ्या मताशी सहमती दर्शविल्याबद्दल पुनः आभार...
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@सुहास, एकदम बरोबर आणि पुर्णपणे सहमत आहे दादा तुझ्या मताशी मी... कोपनहेगेनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या परिषदेवर मी स्वतःच्या मनाचा जळफळाट येथे करून घेतला होता. शेवटी आता आपणच काय वाट्टेल ते करून हे बदल अन वाढते प्रदुषण थांबवू शकतो, अन तसं करणं आता भाग आहे, वेळ खुपच कमी आहे... चर्चेत योगदान दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार...
अनामित म्हणाले...

अतिशय अभ्यास पूर्ण लेख झाला आहे. मी पर्यावरण व जीओलोजित एम फील केले आहे. त्यामुळे मला हा विषय खूप जवळचा आहे. मला खूप आनंद झाला की तुझा हा लेख एव्हढ्या ताकदीचा आहे. खूप व्यवस्थित भौगोलिक माहिती दिलीस. सहज तुला हे सुचले म्हणजे ग्रेट आहे. असेच लेख लिहित रहा. माझा लेख वयैक्तिक पातळीवर आपण नियोजन कसे करू शकतो. ह्या फोकस ने लिहिलेला आहे. पण तुझ्या सारख्या लेखाची गरज होती. तुझ्या मधील ह्या पैलू ची पण जाणीव झाली. खरच मला समाधान मिळाले एक छान लेख वाचून. आनंद पत्रे चे आभार!
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@अनुजा ताई, प्रतिक्रियेबद्दल खुप खुप आभार ताई... शेवटी माझा हा लेख असाच रात्री विचार आला होता म्हणून माझ्या आजवरच्या अभ्यासाच्या आधारे लिहीलाय... तु जिओलॉजित अन पर्यावरण या अगदी निकडीच्या विषयात एम.फील. केलंय... खुपच अभिमानाची बाब आहे. कोणी चुकूनही या फिल्ड्सकडे जात नाहीत, अन तू यांमध्ये एवढं ज्ञानार्जन केलंय.. शेवटी आपापली आवड असते. तुझ्यासारख्या तज्ञ मंडळींचीच आज गरज आहे. आमच्यासारख्यांना या विषयांत तुटपुंज ज्ञान आहे, अन ते एखाद्या वेळी व्यर्थ तसेच घातकही ठरू शकतं.. तुझ्यासारख्यांची जर अशी साथ असली, तर नक्कीच आपण आपल्या पृथ्वीला वाचवू शकू.. फक्त गरज आहे, ती कठोर जिद्द बाळगण्याची अन आळस फेकून देण्याची... दैनंदिन कामे तर होतच राहतील, पण यांसारख्या सामाजिक कामांसाठी, उदा. गणपतीच्या वेळी जसे आपण कशासाठीही पहिले असतो, तसेच येथेही तीच भूमिका अंगिकारणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे...

ताई, चर्चेत योगदान दिल्याबद्दल तुझेही आभार...
SWAPNIL RUDSAMUDRA म्हणाले...

outstanding tu khupach chan lekh lihila......
mala khup aavadala. asach lihit ja,tula tyasathi hardik subhechya.
(mala mahit navat ki tu itak chan lihu shakato te.......)
nusat lihit jau nako je lihatoy te karat ja......keet it up...outstanding tu khupach chan lekh lihila......
mala khup aavadala. asach lihit ja,tula tyasathi hardik subhechya.
(mala mahit navat ki tu itak chan lihu shakato te.......)
nusat lihit jau nako je lihatoy te karat ja......keet it up...
विशाल तेलंग्रे म्हणाले...

@स्वप्निल, कमेंट मंधी लयच रीपीट-रीपीट तेच-तेच लिहलंय रे त्वा.... जाऊ दे तुला काय म्हणायचं होतं ते कळालं.... थॅकू... ;)

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre