आवाहन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आवाहन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पाणी डोक्यावरून गेलंय आता...!

» रविवार, ७ फेब्रुवारी, २०१०

स्वतंत्र भारताच्या संविधानाने भारतवर्षाच्या प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, हे पुन्हा सांगावे लागू नये व माझ्या अश्या पोस्ट्सवर कसलीही बंधने येऊ नयेत, यासाठी आधीच हे नमूद करतो. पण आजकाल या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणारे भरपूर लोकं नजरेस पडताहेत. काय या लोकांना लोकशाही नकोशी झाली आहे (तसं लोकशाही पद्धती असण्यावर माझासुद्धा विरोध आहे.), या लोकांना अगदीच माज चढलाय की यांचा महाराष्ट्र या एकाच प्रांतावर तिरपा डोळा आहे...??? या प्रश्नांना या नेतेमंडळींकडूनच उत्तरे मिळाली तर माझ्या महाराष्ट्राला या सुवर्णमहोत्सवी वर्षातही पीडत असेलेले बरेचसे प्रश्न मार्गी लागू शकतील, असं माझं स्पष्ट मत आहे. महाराष्ट्राचा एक सुजाण नागरिक म्हणून मला ज्या गोष्टींबद्दल आक्षेप आहे, त्या मी या ब्लॉगच्या स्वरूपाने जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. कित्येकांचा मी मांडलेल्या मुद्द्यांवरही आक्षेप असू शकतो, पण चर्चेने हा विषय-लेख बराचसा परिणामकारक होईल अशी आशा आहे. वाचकांनी आपल्या सद्सदविवेकबुद्धीने प्रतिक्रिया नोंदवावी.

माझे मुद्दे, आक्षेप, सुचना इत्यादी खालीलप्रमाणे:

१) संयुक्त महाराष्ट्राचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. सुमारे १०५ हुतात्म्यांनी आपल्या जीवाची कसलीही तमा न बाळगता संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी (मराठीभाषिकांना एकत्र करण्यासाठी) "संयुक्त महाराष्ट्र लढा" चालू केला, अन आपल्या प्राणांची आहूती देऊन (त्यांचे प्राण कसे व का गेले, कोणी घेतले, त्यांच्या हत्यांमागचा मुख्य सुत्रधार कोण या गोष्टी अजुनही सामान्य मराठी माणसाला अज्ञातच आहेत.) संयुक्त १ मे, १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली . हे वर्ष त्यांच्या बलिदानाचे ५०वं वर्ष, पण आपल्या नेत्यांना, इलेक्ट्रॉनिक मिडियाला थोडी जरी लाज, शरम असती तर भव्य अन दिव्य असे कार्यक्रम आणि उत्सव साजरी केले असते. नाही काही तर हुतात्म्यांच्या मागासलेल्या व सुख-सुविधांपासून वंचित राहिलेल्या परिवारांना भरघोस आर्थिक मदत तरी देऊ केली असती. पण जिंकल्याचा माज सध्याच्या सरकारकडून सध्या तरी उतरेल, असं दिसत नाही. आपण आपल्या खिशातून सरकारच्या तिजोरीत पैसे खाली करतो तो अशा सदुपयोगी अन समाजपयोगी कामांसाठीच ना....! नेतेमंडळी १ मे ची वाट पाहत असणार... १ मे ला सकाळी १०-११च्या सुमारास प्रत्येक शासकिय कार्यालयात झेंडावंदन करायचं... अन बाकी काय, झाला महाराष्ट्र दिन साजरी...

नविन वर्ष - माझं रीझोल्युशन...

» शुक्रवार, १ जानेवारी, २०१०

दोन दिवसांपासून मी जरा खुपच घाईत(गरबडीत) होतो, अन आता सुद्धा आहे. कारण तसं फॅमिलीशी मॅटरशी संबंधित आहे. असो... माझ्या मागील वर्षांच्या आठवणी (अमुल्य??? किंवा असतीलच असेही नाही...!) ३१st ला शेअर करण्याची संधी यावेळी तरी मी गमावली, कारण मी अगोदरच त्यावर लिहून ठेवायला हवं होतं.. एक-अर्धा जण चुकून तरी माझ्या या ब्लॉगकडे फिरकलं असेलच, या आशेने की या पोराने काहीतरी लिवलं असेल म्हणून... पण...

काल रात्री मी घराबाहेर होतो, मामांच्या घरी, मामांच्या मुलासोबत कालची ३१st ची रात्र मी सेव्हन अप च्या बर्फ झालेल्या बाटलीवर सेलिब्रेट केली. असो, असं सेलिब्रेशनही मी पहिल्यांदाच करत होतो, कारण याअगोदर तरी मी कधीच ३१ला घराबाहेर पडलो नव्हतो. रात्री डोक्यात विचार येत होते की आपण ३१ला नेमकं काहीतरी संकल्प नक्कीच करूया. ठरलं, रात्री २ नंतर जेव्हा फटाक्यांचा आवाज कमी झाला तेव्हा माझ्या डोक्यात असंख्य विचार येत होते.(आश्चर्य वाटतंय की मला अजुनही आठवतंय!!) सर्वात पहिले तर माझ्या आयटी फिल्ड संबंधित मी खुप विचार केला.. शेवटी माझं लक की मला आयटी मिळाली, कारण मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी आयटीतच जाणार हे पक्कं केलं होतं, तसं झालंही. पुढच्या पायर्‍या तर मला स्वतःच पार करणं आहेत... नंतर इतिहास, अन शेवटी सध्याचा अन या नविन वर्षातला सर्वात मोठा प्रश्न "दुष्काळ" हा माझ्या नजरेसमोर आला. आतापर्यंत मी अनुभवलेलं, ऐकलेलं, पाहिलेलं, वाचलेल्यावरून या टॉपिकशी रीलेटेड सर्व गोष्टींबाबत मी माझ्या मानाने खुप विचार केला. मला डोकं दुखणं म्हणजे काय हे अजुनही कळलेलं नाहिये, म्हणून बहुतेकांना होणारा प्रॉब्लेम मला अडवत नव्हता.

पेट्रोल महागलं हो!

» शनिवार, ४ जुलै, २००९


अवघे १०० दिवस पुर्ण केलेल्या नपुंसक सरकारची कमजोरी त्यांनी आज पुन्हा दाखवली तर...! यात नवल तरी काय म्हणा...!

देशद्रोही काँग्रेसी गांधी घराण्याने भारताला जे मागासत ठेवले आहे त्याची आज पुन्हा त्यांनी पुनरावृत्ती केली.

मागील ३ ते ४ महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाचे भाव जागतिक बाजारपेठेत १६० डॉलर प्रति बॅरेल वरून ३९ डॉलर प्रति बॅरेल एवढे घसरले होते (त्यावेळी डॉलरमागे फक्त ३९ एवढेच रूपये मोजावे लागत होते), आठवतयं ना! आणि हो त्यावेळी पेट्रोलचा भारतातील भाव अंदाजे ४५ रूपये प्रति लिटर एवढा होता.
म्हणजे अंदाजे ३००% (१६० वरून ३९ डॉलर प्रति बॅरेल) भाव घसरून सुद्धा आपल्या नासमजंस काँग्रेसी सरकारने का त्यावेळीच पेट्रोल व इतर तेलांचे भाव त्यापटीने कमी केले नाही? काय झोपले होते की मेले होते ते केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवडा (बेवडाच म्हणा की त्या नपुंसकाला)....? अहो १ रूपयाने तरी किमती कमी कराव्यात की नाही हो त्या बावळटाने? पण नाही, त्यांचा घसा कोरडाच हो .......!!!

काही दिवसांत पुन्हा आश्वासनांचा पाऊस (यावर्षीचा मॉन्सूनचा पाऊस तर कोरडाच गेला हो) म्हणजे नविन वित्तिय बजेट आपले नपुंसक सरकार सादर करणार, तेवढ्यात आज ही बातमी, याचा अर्थ असाच होतो ना की आज किमती वाढल्या त्या बजेटच्या वेळी कमी (४ रूपये नव्हे तर २ रूपये तरी समजा) केल्या जातील व जनतेच्या उघड्या डोळ्यांत सरकार भुरळ पाडण्यास यशस्वी होईल.


Vishal Telangre