"जय महाराष्ट्र ! करा कष्ट अन् खा उष्ट-पाष्टं ! "

» शनिवार, ४ जुलै, २००९


काय मित्रहो, मजेत ना की...!
तसा जरा तुम्हां वाचकांवर जरा नाराज आहे, कारण माझ्या यापूर्वीच्या "मी शिवाजीराजे"ला म्हणावा तसा प्रतिसाद नाही मिळाला, हो पण सबब पण तशीच होती, माझं मराठी काही एवढं सुसंस्कृत नाहिये हं!
बरं, पण माझा लेखन करण्याचा छंद तरी मला जोपासायला हवाच ना, त्याकरिता मी हा नविन लेख लिहितोय, महाराष्ट्राच्या वर्तमान हवामानाचा आढावा!


तर मित्रांनो, आपला प्रिय महाराष्ट्र देश नेमक्या कोणत्या परिस्थितींशी व महाराष्ट्रद्वेष्ट्या कंटकांशी झुंज देत आहे व त्यामुळे कसा पिछाडीवर पडला आहे, हे जाणून घेण्याची ऊत्सुकता आपल्याला असेलच, त्यात नवल तरी काय हो, प्रत्येक मराठी माणूस हेच अनुभवतोय आजच्या घडीला!

१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, शेकडो हुतात्म्यांचे सांडलेले रक्त अखेर कामी आले. मुंबईसारखी आर्थिकदृष्ट्या प्रबल व सर्वगुणसंपन्न अशी राजधानी मिळाली. भाषावर रचना झाल्यामुळे शिवरायांची मराठी साम्राज्याची स्वप्नपूर्ती झाल्यासारखेच वाटले होते त्या काळी, पण आता मला तरी तसे वाटत नाही राव!

कारण माझ्यामते तरी महाराष्ट्र हा अजुनसुद्धा सार्विकदृष्ट्या मागासलेलाच आहे. अहो महाराष्ट्राला कशाची कमी आहे, हं तुम्ही म्हणाल की महाराष्ट्र खूपच प्रगतिशील राज्य आहे भारतातील, अहो फक्त भारतातलचं ना! जगाशी तुलना करता आपली लायकी पण नाही, हे म्हणायची की आमचा देश किंवा राज्य १९२० पर्यंत सर्व दृष्टीने महासत्ता बनेल म्हणून!


हो तर मी म्हणत होतो की महाराष्ट्राला कमी तरी कशाची आहे, अहो माझ्यामते दीडदमडीची सुद्धा नाही! दीड हजार किमीचा अरूंद असा समुद्रकिनारा, दख्खन पठारी मैदानी माळरान, सह्याद्रिच्या अखंड पर्वतरांगा ही झाली प्राकृतिक रचना, ना कुठे वाळवंट अन् ना कुठे हिमभाग, म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच म्हणावा लागेल महाराष्ट्राला!


गोदावरी, कृष्णा, भिमा या नद्या महाराष्ट्राचे नंदनवन करण्यासाठीच तर अवतरलेल्या आहेत. शेतीला असे अनुकूल वातावरण असल्यावर महाराष्ट्राचा शेतकरी कुठे असायला हवा? पैशात खेळायला हवा ना! अहो जगातील रेकॉर्डब्रेक आत्महत्या (शेतकऱ्‍यांच्या) या आपल्या महाराष्ट्रात झाल्यात! किती लाजिवाणी गोष्ट आहे. ते आपल्याला समजायला हवं आता.
जिंजी पर्यंत जिंकत गेलेल्या शिवरायांचे मराठी राज्यच आज परप्रांतियांनी काबिज करत आणलेले आहे, आणि तरीही आम्ही अजून झोपलेलोच आहोत, काय कारण हो, मला तरी कळू द्या या भस्मासूरी झोपेचे रहस्य? हं...

औद्योगिक क्रांति तर झालेली आहे पण बोटावर मोजण्याएवढेच आदर्श उद्योजक दिसतात मला.
कोणाला राग येईल पण मला महाराष्ट्राचे राजकारणीच या सर्व गोष्टींचे दोषी दिसतात. ते आपण आता येत्या विधानसभा निवडणूकीत दाखवालच! ठीक आहे.


मुंबईचा ९/११ दहशतवादी हल्ला, बेळगाव प्रश्न, परप्रांतियांची वाढती मनमानी, बेरोजगारी, केंद्रसरकारकडून महाराष्ट्रावर अपमानाचे वार, हिंदी व इंग्रजी प्रसारमाध्यमांची प्रांतवादिय भूमिका इत्यादी गोष्टिंवर विचार करण्याची वेळ बहुतेक हिच आहे, व आत्ताच काहीतरी पाऊल ऊचलले नाही तर, नुसता विचारच करण्याची वेळ हाती पडेल.


तर माझ्या मराठी बांधवांनो, मी विशाल तेलंग्रे आपणा सर्वांना संबोधुन हे आवाहन करतो की मला जसे हे वाटते, जर तुम्हाला सुद्धा या गोष्टी योग्य वाटत असतील तर आपले रक्त खवळू द्या आणि या आपल्या लाडक्या महाराष्ट्राची महती वाढण्यासाठी प्रयत्न करा.



॥जय महाराष्ट्र॥

(Tuesday, May 12, 2009)

1 प्रतिक्रिया:

अनामित म्हणाले...

Ekdum Zakaas..........

टिप्पणी पोस्ट करा

»»»» नमस्कार मित्रहो, आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय हे सर्वांसाठी खुप अमुल्य आहेत. नम्र विनंती आहे की, लेखातील विषयाला अनुरूप अशीच प्रतिक्रिया नोंदवावी.
»»»» आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत टाका.

मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!

Vishal Telangre