आम्ही "शिरसोली"ला (ता/जि. जळगाव) होतो, ते जळगावपासून १० किमी लांब होते. अन "पद्मालय" (ता. एरंडोल, जि. जळगाव) हे जळगावपासून ४०-४२ किमी दूर आहे. म्हणजे आम्हाला तरी पण ३० ते ३२ किमी जायचे होते. जातेवेळी रस्त्यात गाडी पेट्रोलची टंकी फुल केली. साला रस्ता एकदम हाय-वे टाईप अन रस्त्यावर एवढी वर्दळ पण नव्हती, पण प्रविण भाऊजींची "हिरो होंडा करिज्मा" ३०-४०kmph च्या पुढे जातच नव्हती, अन अनिल भाऊजींची (ज्यांच्या पाठीमागे मी बसलो होतो), "हिरो होंडा स्प्लेण्डर प्लस" ७०-८०kmph या स्पीडने पळत होती. आम्ही पाच-पाच मिनिटांनी मागे वळून पाहू, तर ते आम्ही एखाद्या ठिकाणी थांबल्यावर दहा-एक मिनिटांनी दिसत होते, अन गाडी चालवत असतांना तर ते आम्हांला दिसतच नव्हते, एवढी त्यांची करिज्मा "फास्ट" पळत होती.....!
स्वगृह » नोव्हेंबर 2009साठी आर्काईव्ह्ज
जळगावची सफर - पद्मालय
लेखक: विशाल तेलंग्रे » शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २००९टॅग्ज: ट्रेकिंग, प्रवास, फोटोब्लॉग, भटकंती, मजा, माहितीपर लेख, वर्णन, विनोदी
नमस्कार मित्रहो, तर याआधीच्या "दिवाळीनंतरची ट्रेक..." मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही (म्हणजे मी अन गौरव) दोघांनी "पद्मालय"ला जायची तयारी केली. त्या दिवशी माझ्या धाकट्या मावसबहिणीकडे गोड-धोड जेवण करून छोट्या भाऊजींनी आम्हां दोघांना मोठ्या भाऊजींकडे नेले. तेथे माझी मोठी ताई ऑल्रेडि शेतात गेलेली होती व मोठे भाऊजी घरासमोरील छोट्याश्या बदामीच्या झाडाला कूंपन करीत होते. त्यावेळी मस्त ऊन पडले होते, दूपार होती ना.....! त्यातच अर्धा तास किंवा जरा जास्तच वेळ गेला. फूल जेवण अन त्यातच ते गोड होतं, त्यामूळे मी, गौरव अन छोटे भाऊजी, तिघांनाही सुस्ती आली, अन तिघेही तिथेच जरासं लोळलो...(!) मोठ्या भाऊजींचे जेव्हा काम आटोपले, तेव्हा बहुतेक दुपारचा सव्वा झालेला असावा. लगेच त्यांनी एकदम फास्ट मध्ये आम्हाला उठवलं अन फ्रेश होऊन पटकण रेडी व्हायचं सांगितलं. आम्ही घाई-घाईत रेडी झालो अन जायला निघालो. गौरव छोट्या भाऊजींच्या (प्रविण भाऊजींच्या) तर मी मोठ्या (अनिल भाऊजींच्या) गाडीवर पाठीमागे बसलो. एक गोष्ट सांगायची राहिलीच, हसू नका, कारण मला अजुनही गाडी चालवता येत नाही......! त्यामूळे भाऊजींच्या हातातून गाडी घेण्याचा प्रश्नच नव्हता, बस्स... पाठीमागे बसून आपलं चुप-चाप बसायचं अन ऐश करायची, ती पण अगदी आरामात.....!
'ब्लॉग माझा'चा निकाल जाहीर
लेखक: विशाल तेलंग्रे » शनिवार, २१ नोव्हेंबर, २००९टॅग्ज: ब्लॉग माझा, मराठी ब्लॉगर्स, शुभेच्छा, स्टार माझा
अखेर ज्या गोष्टीची कित्येक दिवसांपासून उत्सुकता होती, त्या स्टार माझाच्या 'ब्लॉग माझा २००९ सिझन २' या स्पर्धेचा निकाल जाहीर झालायं. माझ्या या ब्लॉगला तसं उत्तेजनार्थ विजेत्यांमध्ये देखील स्थान नाहीये, पण मला त्याबद्दल काहीच दुःख नाहिये, मी तर या माहितीच्या महाजालावर अजुन नवखा आहे. बाकी काहीही असो, लेखक अच्युत गोडबोलेंनी जे काय ब्लॉग्ज निवडलेत, ते खरेचं स्तुतीसाठी १०१ टक्के पात्र आहेत.
सर्वात उत्कृष्ट तीन ब्लॉग्ज (क्रमवारी आवश्यक नाही):
अनिकेत दादाचा http://manatale.wordpress.com, दिपक दादाचा http://bhunga.blogspot.com अन नीरजा पटवर्धन यांचा http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com असे हे तीन ब्लॉग्ज सर्वोत्कृष्ट म्हणून निवडले गेलेत. यातील अनिकेत दादा व भुंगा दादाचं वेब डिझाइनिंग, व्यवस्थित टेम्प्लेटची निवड आणि वाचायला उत्सुकता येईल असे लेखन व आकर्षक मांडणी या गोष्टींमुळे कोणीही भारावून जातं. त्यातील मी सुद्धा एक!
सर्वात उत्कृष्ट तीन ब्लॉग्ज (क्रमवारी आवश्यक नाही):
अनिकेत दादाचा http://manatale.wordpress.com, दिपक दादाचा http://bhunga.blogspot.com अन नीरजा पटवर्धन यांचा http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com असे हे तीन ब्लॉग्ज सर्वोत्कृष्ट म्हणून निवडले गेलेत. यातील अनिकेत दादा व भुंगा दादाचं वेब डिझाइनिंग, व्यवस्थित टेम्प्लेटची निवड आणि वाचायला उत्सुकता येईल असे लेखन व आकर्षक मांडणी या गोष्टींमुळे कोणीही भारावून जातं. त्यातील मी सुद्धा एक!
दिवाळीनंतरची ट्रेक...
लेखक: विशाल तेलंग्रे » शनिवार, ७ नोव्हेंबर, २००९टॅग्ज: ट्रेकिंग, प्रवास, भटकंती, मजा
सन २००९ म्हणजे ह्या वर्षाची दिवाळी एवढी कंटाळवाणी गेली ना की बस्स....! एवढा बोअर मी कधीच झालो नव्हतो. दिवाळी अन भाऊबीजला माझ्या मामांच्या मुलाला (गौरवला) घरी बोलवून घेतले. पण तो घरी आल्यावर पण काही कंटाळा जात नव्हता. सलग ते दोन दिवस आम्ही ज्युस पीणं, पिक्चर्स पाहणं, अन पत्ते खेळणं यासारख्या कामांमध्ये घालवले. तो जातेवेळी म्हणाला की यार खुप बोअर होतयं आणि लगेच दुसर्या दिवसापासून कॉलेज चालू होणार असल्याने अजुनच खुपच बोअर होईल, त्याकरता आपण गावाकडे २-३ दिवस जाऊन येऊ. तसा मला त्याचा विचार पटला, पण यावेळी मी कुठेही फिरण्याची प्लॅनिंग केलेली नव्हती. पण दोघांनी घरच्यांशी विचारविनिमय करून जायचे पक्के केले. आमचे, मामांचे आणि मावश्यांची गावे ही सर्व जालना अन विदर्भाच्या (बुलडाणा) बॉण्ड्री वर आहेत. त्यामुळे सगळ्यांकडे जाणे तसे खुपच सोयिस्कर होते. लगेच दुसर्या दिवशी आम्ही दोघे गावाकडे निघालो. मामांनी सांगितले होते की जमले तर अजिंठा (अजंता केव्ह्ज), लोणार (खार्या पाण्याचे सरोवर) आणि जर जावसं वाटलचं तर शेगावला (गजानन महाराज) जाऊन या. सोबत ६००-७०० रूपये घेऊन आम्ही लगेच दुसर्या दिवशी प्रवासास निघालो. वेळेवर बस मिळाली. औरंगाबाद - बुलडाणा/मलकापूर/शेगाव गाड्या असतातच. सगळ्यांचा रूट एकच, तो म्हणजे औरंगाबद-सिल्लोड-भोकरदन-धाड-बुलडाणा-शेगांव/मलकापूर! आम्ही शेगाव गाडीत बसलो अन जायला निघालो. आम्ही या गाडीने डायरेक्ट शेगावला गेलो असतो, पण दोघेही प्रथमच चाललो असल्याने बिगर-माहितीचे तिथे जाणे योग्य नव्हते अन नातलगांकडे गेलो नाही तर त्यांना राग यायचा फुकटच, म्हणून डायरेक्ट शेगावला जाण्याचं कॅन्सल केलं. दोन-अडीच तासांनी धाड या स्थानकावर उतरून आम्ही आमची पुढची वाट धरली.
Blogger द्वारे प्रायोजित.