"पद्म"ला ग्रहण...

» शनिवार, ३० जानेवारी, २०१०

कालच मंगेश पाडगावकरांनी संगमनेरमध्ये अशी खंत व्यक्त केली की, त्यांच्यासारख्या ज्येष्ठ कलावंतांना अजून कसं "पद्म" पुरस्कारांपासून डावललं जातं ते... असो. त्यांना अश्या पुरस्कारांची गरज नाही, हे सांगून त्यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवला.

संत चटवाल सारख्या एनाआरआय उद्योगपतीला (मोठ-मोठाली हॉटेलं आहेत त्याची विदेशात..), जो मागेच बॅंकेतील ९० लाख डॉलर्सची गफलत करण्याच्या गुन्ह्यामुळे तुरूंगवास भोगून आला आहे. त्याचं मागेच वक्तव्य आलं होतं की भारतात पण तो काही हॉटेलं काढणार आहे म्हणे.. त्याला खुष करण्याच्या नांदात तर त्याला "पद्म" दिला गेला नाही ना, अशी तीव्र नाराजी समाजाच्या प्रत्येक वर्गातून तसेच इंटरनेटवरील ट्विटरसारख्या सोशल साईट्सवर व काही ब्लॉग्जवर लोकांनी जाहीर केलेली दिसतेय... तसेच सैफ अली खान, लोकप्रिय आहे पण अजून तशी लायकी नसलेला अन सध्या सिनेमांमध्ये बिभत्स कृत्ये करणारा माणूस "पद्म"चा हक्कदार कसा होऊ शकतो याबद्दलही तीव्र साशंकता आहे.

मंगेश पाडगावकर, वि.दा. करंदीकर (ज्येष्ठ कवी), डॉ. श्रीराम लागू, अशोक सराफ (ज्येष्ठ अभिनेते) आणि अश्याच प्रत्येक क्षेत्रातील काही नामवंत व्यक्तींना अजूनही "पद्म"ने गौरवण्यात आलेले नाही.. याचं मला तीव्र दुःख आहे.. "पद्म" पुरस्कार प्रक्रियेवर गालबोट लागलंय, अन या पुरस्कारांवरून माझा समुळ विश्वासच उडालाय हे नक्की... शेवटी जो माणूस त्या-त्या क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अहोरात्र जगला, अन कष्टाचे चीज केले, त्याला त्याचे मानधन अन गौरव मिळत नसेल तर अश्या पुरस्कारांची नेमकी गरजच काय???

नुकत्याच हाती आलेल्या बातम्या...

» शुक्रवार, २२ जानेवारी, २०१०

ठळक घडामोडी पुढीलप्रमाणे:

१) तीव्र शीतलहरीचा फटका काही मराठी ब्लॉगर्संना... अनेकांचे ब्लॉग थंडीमुळे मृतावस्थेत आढळले...
२) चोरांचा धूमाकूळ सुरूच... महेंद्रजींच्या ब्लॉगवरील लाखो रूपये किंमतीची मालमत्ता दिवस-ढवळ्या लंपास...
३) मराठी ब्लॉग विश्व, मिसळपाव, उपक्रम, अन मनोगत यांचा पुढील "मराठी ब्लॉगर्स" स्नेह मेळाव्यास तीव्र विरोध...
४) ब्लॉगर अन वर्डप्रेस यांनी एकत्रितपणे फक्त मराठी ब्लॉगर्ससाठी आजपासून चालू केलेल्या नविन ब्लॉग-डोमेन "xyz . marathi . com" सेवेला तीव्र प्रतिसाद...
५) भुंग्या - एक सामाजिक किडा, यांच्या ब्लॉगवर वाचकांच्या वाढत्या प्रमाणामुळे त्यांच्या ब्लॉगची एक साईडबार कालच्या रात्री तुटली...
६) वाढत्या महागाईमुळे अनेक वाचकांचा ब्लॉगवर प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय...
७) पंक्या, यांच्या ब्लॉगवरील भाषेबद्दल अन फोटोंवर काही वाचकांचा आक्षेप...


****************************************************

आता बातम्या सविस्तरपणे....

पहिला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा

» मंगळवार, १९ जानेवारी, २०१०


सुरेश पेठे काकांनी आयोजित केलेला:

»» रविवार, १७ जानेवारी २०१० रोजी पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, बिग
बाझार जवळ, पुणे येथे पहिला-वहिला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा अगदी
आनंदात पार पडला.

»» पुणे खुप लांब असल्याने मी या मेळाव्यात सहभागी होवू शकलो नाही, पण पुढच्या वेळी सहभागी होण्याचा पुर्णपणे प्रयत्न करीन.

»» अनेक ब्लॉगर्स मित्रमंडळींनी या मेळाव्यात मनसोक्त आनंद लुटला.

»» त्याविषयीचे सर्व लेख व फोटोज बघण्यासाठी: भुंग्या दादा (एक सामाजिक किडा!),   दुसरा
भुंग्या दादा (डोक्यात भुणभुणणारा!)
, सुरेश
काका
पंक्या दादाप्रभास
सर
  यांच्या ब्लॉग्जवर बघा.

»» येथे वैभव भोसले यांनी टाकलेले फोटोज मस्त आहेत.

»» तसेच इ-सकाळ
DNA वरील बातम्या सुद्धा बघा!

महाराष्ट्राचा भारत-पाकिस्तान?

» शनिवार, १६ जानेवारी, २०१०

तेलंगानाचा मुद्दा गेल्या दिड-दोन महिन्यांपासून खुपच गाजतोय. या तेलंगानाच्या विभक्त करण्याच्या मुद्दयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही याच प्रकारची हवा वाहतांना दिसतेय. कोणाला याविषयी जास्त माहिती नसल्याने बहुतेकजण या मुद्दयाला टाळतांना दिसताहेत. मलाही याविषयाशी निगडित जराशीही माहिती नाही की का विदर्भाला विभक्त करण्याची मागणी जोर धरतेय ते... पण माझा या गोष्टीला विरोध आहे. मी मराठवाड्यातला आहे, पण मला नाही वाटत की स्वतंत्र विदर्भ असावा म्हणून....

२०१० हे महाराष्ट्रासाठी स्वर्णमहोत्सवी वर्ष आहे. शेकडो हुतात्म्यांच्या रक्ताने आपला संयुक्त महाराष्ट्र १ मे, १९६० ला निर्माण झाला. त्यावेळी जर या वीरमरण आलेल्या मराठी भूमीपुत्रांना ही गोष्ट माहित असती की  आपण ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी लढतोय तोच महाराष्ट्र भविष्यात फाळणीकरता फासावर चढवला जाईल, तर नक्कीच त्यांनी आपले प्राण कदापि दिले नसते. आजवरच्या या घडामोडी पाहता त्यांचे प्राण व्यर्थ गेले असेच म्हणावे लागेल. यापासून असा बोध घ्यावा का की यापुढे आपल्या लोकांसाठी काहीच करू नये, कारण तीच लोकं भविष्यात आपल्याच पाठीत खंजीर खुपसतात. आज ज्या कोणी स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरलिय, ते बहुतेकजण विदर्भातील आहेत. त्यात काही उच्च-पदस्थ नेते-मंडळी ते सर्वसाधारण रहिवासी यांचा समावेश आहे.

नविन वर्ष - माझं रीझोल्युशन...

» शुक्रवार, १ जानेवारी, २०१०

दोन दिवसांपासून मी जरा खुपच घाईत(गरबडीत) होतो, अन आता सुद्धा आहे. कारण तसं फॅमिलीशी मॅटरशी संबंधित आहे. असो... माझ्या मागील वर्षांच्या आठवणी (अमुल्य??? किंवा असतीलच असेही नाही...!) ३१st ला शेअर करण्याची संधी यावेळी तरी मी गमावली, कारण मी अगोदरच त्यावर लिहून ठेवायला हवं होतं.. एक-अर्धा जण चुकून तरी माझ्या या ब्लॉगकडे फिरकलं असेलच, या आशेने की या पोराने काहीतरी लिवलं असेल म्हणून... पण...

काल रात्री मी घराबाहेर होतो, मामांच्या घरी, मामांच्या मुलासोबत कालची ३१st ची रात्र मी सेव्हन अप च्या बर्फ झालेल्या बाटलीवर सेलिब्रेट केली. असो, असं सेलिब्रेशनही मी पहिल्यांदाच करत होतो, कारण याअगोदर तरी मी कधीच ३१ला घराबाहेर पडलो नव्हतो. रात्री डोक्यात विचार येत होते की आपण ३१ला नेमकं काहीतरी संकल्प नक्कीच करूया. ठरलं, रात्री २ नंतर जेव्हा फटाक्यांचा आवाज कमी झाला तेव्हा माझ्या डोक्यात असंख्य विचार येत होते.(आश्चर्य वाटतंय की मला अजुनही आठवतंय!!) सर्वात पहिले तर माझ्या आयटी फिल्ड संबंधित मी खुप विचार केला.. शेवटी माझं लक की मला आयटी मिळाली, कारण मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी आयटीतच जाणार हे पक्कं केलं होतं, तसं झालंही. पुढच्या पायर्‍या तर मला स्वतःच पार करणं आहेत... नंतर इतिहास, अन शेवटी सध्याचा अन या नविन वर्षातला सर्वात मोठा प्रश्न "दुष्काळ" हा माझ्या नजरेसमोर आला. आतापर्यंत मी अनुभवलेलं, ऐकलेलं, पाहिलेलं, वाचलेल्यावरून या टॉपिकशी रीलेटेड सर्व गोष्टींबाबत मी माझ्या मानाने खुप विचार केला. मला डोकं दुखणं म्हणजे काय हे अजुनही कळलेलं नाहिये, म्हणून बहुतेकांना होणारा प्रॉब्लेम मला अडवत नव्हता.
Vishal Telangre