मराठीत लिहिणे अगदी सोपे.......!!!

» रविवार, १२ जुलै, २००९

आता माहितीजालावर मराठीत लिहिणे अगदी सोपे झाले आहे ना की विचारूच नका, तरी सुद्धा काही लोकं नुसते विचारत राहतात की मी देवनागरी लिपीमध्ये कसे लिहू?
तुम्हाला सांगतो, अहो आता कुठेही सहजच मराठीमध्ये लिहिता येऊ शकते! त्याला कारण पण तसेच आहे, आपल्या मराठी भूमीत एवढे मौल्यवान रत्न तयार होत आहेत, ज्यांच्या नसल्यामुळे कदाचित आजचे जग जरा वेगळेच (मागासलेलेच म्हणा ना!) दिसले असते! त्यांच्यासाठीच बहुतेक जगानेच मराठी जणांना हा सन्मान देऊ केलाय जणू...!
तर मी तुम्हाला सांगत होतो की मराठीत आता नेटवर कसे लिहायचे ते?
खुप साधे आणि सोपे पर्याय नेटवर उपलब्ध आहेत, ते पुढीलप्रमाणे आहेत, आपण ते सर्व किंवा आपल्या गरजेप्रमाणे थोडेफार वापरू शकता :

मराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय.......!

» शनिवार, ११ जुलै, २००९

(हा लेख सलिल कुलकर्णींच्या नेटभेट.कॉम या साईटवरील आहे!)

 इंटरनेटवर मराठी गाणी कुठुन डाउनलोड करायची किंवा मराठी गाणी डाउनलोड करण्यासाठी सर्वोत्तम वेब साइट कोणती हा प्रश्न मला बर्याच वाचकांनी विचारला आहे. दुर्दैवाने अशी एकही साइट मला इंटरनेटवर सापडली नाही, जी सर्वच (जुनी आणि नविन) मराठी गाणी एका ठीकाणी उपलब्ध करुन देइल. म्हणुनच मी वाचकांसाठी पाच अशा वेबसाइट्सची यादी बनवीली आहे ज्यावर गाणी डाउनलोड करता येतील किंवा हवे असलेले गाणे इंटरनेटवर नक्की कुठे आहे ते शोधता येइल.खाली उल्लेखीलेल्या पाचही साइट्स व्हायरस आणि मालवेअर (संगणकामध्ये लपुन बसणारे काही खोडसाळ प्रोग्राम्स) यांपासुन अतीशय सुरक्षीत आहेत त्यामुळे येथुन डाउनलोड केलेल्या गाण्यांमुळे संगणकास कोणताही धोका नाही. वाचकांना ही यादी उपयुक्त ठरेल आणि आवडेल अशी अपेक्षा !


१. कुलटोड्.कॉम - Cooltoad.com - (याच साइटला कुलगुज्.कॉम Coolgoose.com असे नाव देखील आहे.)


नावावरुन विचित्र वाटत असली तरी कुलटोड ही एक कामाची साइट आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी, इंग्लीश आणि इतर बर्याच भारतीय भाषांमधील गीतांचा हा एक खजीना आहे. कुलटोड वरुन गाणी डाउनलोड करण्यासाठी आधी त्यांचे सभासद व्हावे लागते. एकदा मोफत रजिस्ट्रेशन केले की मग तुम्ही पाहीजे तितकी गाणी डाउनलोड करु शकता.
कुलटोड वरुन मराठी गाणी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
कुलटोडवर कलाकाराचे नाव, गाण्याचे नाव, गाण्याची प्रसिद्धी (Popularity) तसेच कुलटोडवर गाणे कीती जुने आहे या निकषांद्वारे (Filters) गाणे शोधता येते.


पेट्रोल महागलं हो!

» शनिवार, ४ जुलै, २००९


अवघे १०० दिवस पुर्ण केलेल्या नपुंसक सरकारची कमजोरी त्यांनी आज पुन्हा दाखवली तर...! यात नवल तरी काय म्हणा...!

देशद्रोही काँग्रेसी गांधी घराण्याने भारताला जे मागासत ठेवले आहे त्याची आज पुन्हा त्यांनी पुनरावृत्ती केली.

मागील ३ ते ४ महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाचे भाव जागतिक बाजारपेठेत १६० डॉलर प्रति बॅरेल वरून ३९ डॉलर प्रति बॅरेल एवढे घसरले होते (त्यावेळी डॉलरमागे फक्त ३९ एवढेच रूपये मोजावे लागत होते), आठवतयं ना! आणि हो त्यावेळी पेट्रोलचा भारतातील भाव अंदाजे ४५ रूपये प्रति लिटर एवढा होता.
म्हणजे अंदाजे ३००% (१६० वरून ३९ डॉलर प्रति बॅरेल) भाव घसरून सुद्धा आपल्या नासमजंस काँग्रेसी सरकारने का त्यावेळीच पेट्रोल व इतर तेलांचे भाव त्यापटीने कमी केले नाही? काय झोपले होते की मेले होते ते केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवडा (बेवडाच म्हणा की त्या नपुंसकाला)....? अहो १ रूपयाने तरी किमती कमी कराव्यात की नाही हो त्या बावळटाने? पण नाही, त्यांचा घसा कोरडाच हो .......!!!

काही दिवसांत पुन्हा आश्वासनांचा पाऊस (यावर्षीचा मॉन्सूनचा पाऊस तर कोरडाच गेला हो) म्हणजे नविन वित्तिय बजेट आपले नपुंसक सरकार सादर करणार, तेवढ्यात आज ही बातमी, याचा अर्थ असाच होतो ना की आज किमती वाढल्या त्या बजेटच्या वेळी कमी (४ रूपये नव्हे तर २ रूपये तरी समजा) केल्या जातील व जनतेच्या उघड्या डोळ्यांत सरकार भुरळ पाडण्यास यशस्वी होईल.


"जय महाराष्ट्र ! करा कष्ट अन् खा उष्ट-पाष्टं ! "

»


काय मित्रहो, मजेत ना की...!
तसा जरा तुम्हां वाचकांवर जरा नाराज आहे, कारण माझ्या यापूर्वीच्या "मी शिवाजीराजे"ला म्हणावा तसा प्रतिसाद नाही मिळाला, हो पण सबब पण तशीच होती, माझं मराठी काही एवढं सुसंस्कृत नाहिये हं!
बरं, पण माझा लेखन करण्याचा छंद तरी मला जोपासायला हवाच ना, त्याकरिता मी हा नविन लेख लिहितोय, महाराष्ट्राच्या वर्तमान हवामानाचा आढावा!


तर मित्रांनो, आपला प्रिय महाराष्ट्र देश नेमक्या कोणत्या परिस्थितींशी व महाराष्ट्रद्वेष्ट्या कंटकांशी झुंज देत आहे व त्यामुळे कसा पिछाडीवर पडला आहे, हे जाणून घेण्याची ऊत्सुकता आपल्याला असेलच, त्यात नवल तरी काय हो, प्रत्येक मराठी माणूस हेच अनुभवतोय आजच्या घडीला!

१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, शेकडो हुतात्म्यांचे सांडलेले रक्त अखेर कामी आले. मुंबईसारखी आर्थिकदृष्ट्या प्रबल व सर्वगुणसंपन्न अशी राजधानी मिळाली. भाषावर रचना झाल्यामुळे शिवरायांची मराठी साम्राज्याची स्वप्नपूर्ती झाल्यासारखेच वाटले होते त्या काळी, पण आता मला तरी तसे वाटत नाही राव!

कारण माझ्यामते तरी महाराष्ट्र हा अजुनसुद्धा सार्विकदृष्ट्या मागासलेलाच आहे. अहो महाराष्ट्राला कशाची कमी आहे, हं तुम्ही म्हणाल की महाराष्ट्र खूपच प्रगतिशील राज्य आहे भारतातील, अहो फक्त भारतातलचं ना! जगाशी तुलना करता आपली लायकी पण नाही, हे म्हणायची की आमचा देश किंवा राज्य १९२० पर्यंत सर्व दृष्टीने महासत्ता बनेल म्हणून!


हो तर मी म्हणत होतो की महाराष्ट्राला कमी तरी कशाची आहे, अहो माझ्यामते दीडदमडीची सुद्धा नाही! दीड हजार किमीचा अरूंद असा समुद्रकिनारा, दख्खन पठारी मैदानी माळरान, सह्याद्रिच्या अखंड पर्वतरांगा ही झाली प्राकृतिक रचना, ना कुठे वाळवंट अन् ना कुठे हिमभाग, म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच म्हणावा लागेल महाराष्ट्राला!


१ मे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

»


जय महाराष्ट्र मित्रांनो...!

आगामी १ मे दिनाच्या आपणा सर्व मराठी बाधवांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी म्हणून हा लेख लिहित आहे.

दरवर्षी आपण शिवजयंती (१ नाही तर ३ वेळा) अगदी धुमधामात साजरी करतो, पण महाराष्ट्र दिनाच्या दिवशी असे काहीच वातावरण दिसत नाही, ना जास्त काही कार्यक्रम योजिले असतात, ना काही समारंभ असतात.

जाऊ द्या, माझ्यामते यंदा तरी महाराष्ट्र दिन अत्यंत धूमधडाक्यात साजरा होण्याची चिन्हे दिसताहेत. त्याला कारण पण तसेच आहे ना हो...

मा. राजसाहेबांनी जसे यूपीवाल्यांना त्यांचा राज्यदिन, सण वगैरे त्यांच्याच राज्यात साजरे करण्याची ताकिद दिली होती, त्यामुळे यंदा मनसे कडून महाराष्ट्र दिनाचा सोहळा पाहण्यासारखा असेल.
तसेच शिवसेनेकडूनही त्याचप्रकारच्या अपेक्षा असतील आपल्या...


मी शिवाजीराजे भोसले बोलतोय...!

»


सुखविंदर सिंगचे "हे राजे" व रक्त खवळवणारा पोवाडा या रोमांचकारी गोष्टींमुळे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ची महती सहज सोप्या शब्दांत सांगणं माझ्यासारख्याला तर जमायचं नाही, तरी तुमच्यासाठी म्हणून या चित्रपटाचे स्तुतिगाण तुम्हाला सांगतो.(समजलं तर आवडेल).

तर महेश मांजरेकरांचा व एरोस इंटरनॅशनलचा पहिला वहिला मराठी बिग बजेट चित्रपट रिलिज झाल्याच्या पहिल्या खेळापासून रोज हाऊसफुल आहे व राहिल यात तिळमात्र शंका असण्याचे कारण नाही.

सचिन खेडेकरची दिनानाथ भोसले या दुबळ्या माणसाची भुमिका बिग स्ट्रेंजच म्हणावे लागेल.(13B नंतर तसा खुप भाव आलाय त्यांना...) जाऊ द्या, सिद्धार्थ जाधवची ऊस्मान पारकर, तसेच शिवाजी राजांचे सहकारी असलेले मकरंद अनासपुरे यांची पोट धरून हसवणारी कॉमेडी आणि भरत जाधवचा अफजल खाँ व शिवाजी राजांच्या भेटीवरील पोवाडा यामुळे बोअर होण्याचा चान्सच नाही...

शिवरायांचे "...वीर दौडले सात, फक्त सातच का? बाकिचे कुठे गेले?" हे डायलॉग्ज ऐकुन मराठीपणाची भावना त्वेषाने जागी होते.

हो पण एक सांगायचे राहिले की या चित्रपटात जात-पात, वर्ण-भेद, परप्रांतियांवर टीका इत्यादि कुठेही दिसले नाही वा वाटले नाही, त्यामुळे चित्रपटात आक्षेपार्य असा कोणताही सीन नाही त्यामुळे चित्रपटाचा विरोध बिल्कुल झाला नाही हे चांगले!

हो पण चित्रपटात जे महाराष्ट्र सोडून जाऊन मराठीला धरून राहिले (जसे विक्रम पंडित, सिटी बँकेचे सिईओ) व जे मराठीला विसरले (जसे दक्षिण भारतिय चित्रपटांचे सुपरहिरो रजनिकांत ज्यांचे मुळ नाव शिवाजीराव गायकवाड आहे) यांच्यातील मराठेपण दाखविण्याचा प्रयत्न मांजरेकरांनी केल्याचे दिसते.

जाऊ दे, हा झाला चित्रपटाचा भाग आता तुम्हाला आमची गंम्मत सांगतो, मी आणि माझा मित्र दिपक दोघे औरंगाबादच्या गोल्डि चित्रपटगृहात हा चित्रपट पाहायला गेलो होतो, तो पण फर्स्ट शो आणि बाल्कनि, एकदम मस्त! नंतर आम्ही थिएटरमध्ये गेल्यानंतर चकितच झालो ना! अहो आमच्या पुढच्या रोमध्ये चक्क फॉरेनर कपल होते, विचारपूस केल्यानंतर ते सॅनफ्रॅन्सिस्कोचे आहे व भारतातील किल्ले व लेण्या पाहायला आल्याचे कळाले. त्यांनी चित्रपट संपल्यानंतर चित्रपटाला हॉलिवुड फिल्म लाईक एक्शन मुवि म्हणुन चित्रपटाचे नाव इंग्रजीमध्ये आमच्याकडून लिहून घेतले.
आणखी मजा नंतर चित्रपट चालु झाल्यानंतर आली, झाले काय आम्ही बसलो होतो तेथे ना एसीची ना पंख्याची हवा! गरमीने किती बेहाल झालो होतो म्हणून सांगू!
अजुन दुसरा प्रॉब्लेम, आवाज एवढा कमी आणि तो पण बाल्कनिमध्ये आतापर्यंत मी कधिच अनुभवला नव्हता! Bassच नव्हता हो...


Vishal Telangre